योजना

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती योजना

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं दहावीनंतरचं शिक्षण आणि परीक्षेची फी भरण्याची योजना समाजकल्याण खात्यातर्फे राबवली जाते. पाहूया या योजनेचं स्वरूप काय आहे...

 

उद्देश - अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

अटी व शर्ती - 

 • विद्यार्थी अनुसूचित जातीचा असावा.
 • वयोमर्यादेची अट नाही.
 • ज्या विद्यार्थ्याच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांच्या आत आहे, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
 • अर्जासोबत जातीचं प्रमाणपत्र / जातीवैधता प्रमाणपत्र जोडणं आवश्यक.
 • अर्जासोबत कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक नाही.
 • अर्जावर प्राचार्यांची सही व शिक्का आवश्यक.

खालील अभ्यासक्रमांना ही योजना लागू होत नाही

 • व्यवस्थापन कोट्यामधून प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
 • अभिमत विद्यापीठात प्रवेश घेणारे विद्यार्थी.
 • सरकारी मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांमधील बी.एड. व डी.एड अभ्यासक्रम.
 • खाजगी संस्थांच्या पातळीवर घेण्यात येणाऱ्या (institutional level quota) परीक्षेद्वारे प्रवेश घेतलेले अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी.

लाभाचं स्वरूप - 

संपूर्ण शिक्षण फी, परीक्षा फीची रकम ही संबंधित विद्यापीठ/ महाविद्यालय/ शिक्षण शुल्क समिती/ प्राधिकरण किंवा परिषदेनं निर्धारित केलेल्या दराप्रमाणं महाविद्यालयाला अदा केली जाते.

संपर्क - संबंधित जिल्हयाचे विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी. 


Comments (1)

 • स्कालरशिप फॉर्म ऑनलाइन website

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.