श्रीरंग गायकवाड
वारकऱ्यांचा देवच मुळी समता, बंधुता, समन्वयाचं तत्त्वज्ञान रुजवणारा आहे. पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभा राहिलेला विठोबा म्हणजे रोजचं जगणं सोपं करणारा, बंधुभावानं जगायला शिकवणारा अनाथांचा नाथ. हा लोकांनी लोकांसाठी उभा केलेला लोकदेव आहे.
 
श्रीरंग गायकवाड
माऊली म्हणजे आई! पंढरीची विठाई ही सर्वांचीच आई. म्हणून तर आजच्या स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीहक्काच्या चर्चेच्या जमान्यातही खेडोपाड्यातल्या लाखो महिला पंढरीच्या वारीत सहभागी होतात. पुरुषांच्या बरोबरीनं जमेल तसं, आपापल्या बोलीभाषेत देवाचं नाव घेतात. गुणगाण गातात. त्यांना हे शिकवलं ज्ञानोबामाऊलींच्या धाकुट्या मुक्ताईनं, तुकोबारायांच्या आवलीनं. नामयाची आई गोणाईनं, पत्नी राजाईनं, दासी जनीनं, चोखोबाची महारी सोयराबाईनं अजून अशा कितीतरी जणींनी!
 
श्रीरंग गायकवाड
विठुराया आणि त्यांच्या भक्तांमध्ये देव-घेवीची भानगड नाही. म्हणजे भक्तानं देवाला भेटवस्तू अर्पण कराव्यात, नवस करावा आणि बदल्यात देवानं प्रसन्न होऊन यांच्या घरीदारी, शेताशिवारात समृद्धी आणावी, असलं काही नाही. बरं एवढे दिवस चालत गेल्यावर देवाची भेट व्हायलाच पाहिजे असंही नाही. मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं तरी वारी पूर्ण! पुन्हा येऊन आपलं रोजचं आयुष्य जगू लागतात. शेताशिवारात राबू लागतात. ही माणसं वारी का करतात? त्यांना त्यातून काय मिळतं? त्यांचा देव त्यांना देतो तरी काय?