टॉप न्यूज

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 57व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर उसळलाय. राज्याच्या नव्हे तर देशाच्या कोनाकोपऱ्यातून लेकराबाळांसह लोकं माथा टेकवून त्यांना अभिवादन करण्यासाठी आलीत. पंचशिलेचे झेंडे, फिती यामुळं चैत्यभूमी परिसराला निळाईची भरती आली असून 'जय भीम'च्या घोषणांनी परिसर दुमदुमू्न गेलाय. लोकांना सुविधा ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. यंदाही गर्दीचा उच्चांक गाठला जाईल, असा अंदाज आहे.
 
सुखदा खांडगे, मुंबई
भीमराज की बेटी मैं तो जयभीम वाली हूँ…अशी लाखामध्ये देखणी माझ्या भीमरावाची लेखणी…अशा विविध प्रकारच्या गाण्यांमध्ये डॉ. आंबेडकरांची महती दिसून येते. बाबासाहेबांचा समतेचा लढा या गाण्यांतून लोकांसमोर आला. त्यांच्या कीर्तीचा महिमा सांगणारी ही गीतपरंपरा सुरू झाली १९३२ पासून. बाबासाहेबांना इंग्लंडमध्ये भरणाऱ्या दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी बोलावण्यात आलं. आणि इथं त्यांच्या कार्याला मदतीचा हात मिळाला. शाहीर पत्रकाराची भूमिका करू लागले. तमाशा सोडून भाऊ फक्कड बाबासाहेबांची माहिती सांगणारे पोवाडे गाऊ लागले. त्याचंच रूपांतर आंबेडकरी जलशामध्ये झालं.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
दलित समाजाचं पुनरुत्थान करणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार वंचित समाजाच्या घराघरांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते भीमगीतांनी. पिढ्यान् पिढ्या अक्षरओळख नसलेल्या या समाजाजवळ गाणं होतं. त्यामुळंच बाबासाहेबांचे विचार गाण्यात बद्ध करून ती गाणी भीमगीतं बनून पुढे आली. अशा या भीमगीतांनी समतेचा नारा आजही टिकवून ठेवलाय. त्याचे प्रणेते होते लोकशाहीर, महाकवी वामनदादा कर्डक! माझी आठ भाषणं म्हणजे वामनदादांचं एक गाणं, अशा शब्दात बाबासाहेबांनी त्यांचा गौरव केला होता.
 
विवेक राजूरकर, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा लढा दलित, वंचितांच्या घराघरात पोहोचला तो भीमगीतांमुळं. भीमगीतांचे प्रणेते महाकवी वामनदादा कर्डक यांच्यानंतर भीमगीतांचा हा ठेवा पुढं नेण्याचं काम आजची तरुणाई करतेय. औरंगाबादचा मेघानंद जाधव त्यापैकीच एक. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानं निर्माण केलेला 'भीमगीत रजनी' हा कार्यक्रम महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातही तुफान चालतो. त्यानं लिहिलेली अनेक भीमगीतं लोकप्रिय झाली आहेत. 'भीमराव माझा, रुपया बंदा, आहे कोटी कोटीत' हे आज सर्वांच्या ओठावर असणारं गाणं मेघानंदनंच लिहिलंय. त्याच्या गाण्यांना मिळणारी लोकप्रियता पाहता भीमगीतांचा ठेवा समर्थपणे पुढं जाईल, अशी
 
सागर चव्हाण, मुंबई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! भारतीय घटनेचे शिल्पकार! महामानव! दलित, वंचित समाजाला गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी प्राप्त करून दिला. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असं त्यांनी म्हटलं खरं, पण...पिढ्यान् पिढ्या अक्षर ओळख नसलेल्या समाजाच्या दारापर्यंत ही शिकवण नेणं हे एक आव्हानच होतं. अक्षर ओळख नसली तरी या समाजाकडं गाणं होतं. ते हेरूनच वामनदादा कर्डकांसारख्या समाजधुरीणांनी भीमगीतांची निर्मिती केली आणि बघता बघता त्यांच्या विचारांचा वणवा पेटला. त्यामुळं ही भीमगीतं म्हणजे आंबेडकरी विचारांचा ज्वलंत ठेवा आहे.
 
राहुल रणसुभे, मुंबई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 122 वी जयंती आज सर्वत्र उत्साहानं साजरी होतेय. बाबासाहेबांच्या विचारांचा खरा अंगार पेटवला तो आंबेडकरी जलसा आणि भीमगीतांनी. आजच्या इंटरनेटच्या जमान्यातही भीमगीतांची धून कायम असून त्याला आता सोशल नेटवर्किंगची जोड मिळालीय. आंबेडकरी विचारांच्या समतेची पताका खांद्यावर घेतलेली तरुणाई नेटानं सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांचा प्रसार करत असते. चर्चा घडवून आणत असते. यामुळं समाजातील विविध विचारप्रवाहातील मंडळींचा आंबेडकरी विचारांच्या चळवळीतील सहभाग वाढलाय.
 
सुखदा खांडगे, मुंबई
आज गुढीपाडवा. मऱ्हाटी मुलुखात अगदी आदिवासी पाड्यापासून ते मुंबई-पुण्याच्या उंच उंच बिल्डिंगवर गुढ्या उभ्या राहिल्यात. नवं वस्त्र, कडुनिंबाची डहाळी आणि साखरेची माळ घालून सजल्या-धजल्यात. भल्या सकाळी गुढीची पूजाअर्चा न्  मग साग्रसंगीत नैवद्य...नैवद्याच्या ताटात लहानथोरांच्या तोंडाला हमखास पाणी सोडणारी वस्तू म्हणजे फळांचा राजा अर्थात पिवळाधम्मक आंबा. पाडव्याच्या महूर्तावर हा आम्रराज प्रत्येक घरात असा अगदी रुबाबात प्रवेश करतो. आंब्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेलं नवी मुंबईतलं एपीएमसी मार्केट तर सध्या आंब्याच्या आगमनानं गजबजून गेलंय. 
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवसंवत्सराची सुरुवात. उंच बांबूला नवीन वस्त्र, तांब्याचा, चांदीचा कलश, साखरेची माळ आणि सोबत न चुकता कडुनिंबाचा डहाळा लावून उभारलेली गुढी म्हणजे अभिमानाचं प्रतीक. पाडव्याला अवघ्या महाराष्ट्रात कुठंही जा, गगनाची शोभा वाढवणाऱ्या या गुढ्या घराघरांवर दिसणारच. पण मुलुखाप्रमाणं गुढ्यांचे रंग बदलतात, सण साजरा करण्याच्या परंपरा बदलतात. अर्थात या विविधतेतही आहे अनोखी एकता, समता आणि बंधुता...
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हा दिवस भारतीय नववर्ष दिन म्हणून आपण साजरा करतो. शालिवाहन शके या दिवसापासूनच सुरू झालं. 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा पराभव करून श्रीप्रभुरामचंद्र याच दिवशी अयोध्येला परतले. या पारंपरिक गोष्टी आपणाला माहीतच आहेत. पण आपल्या कृषिप्रधान महाराष्ट्रात गुढीपाडव्याला आणखीन एक महत्त्वाचं स्थान आहे. ते म्हणजे, बळीराजाचं आर्थिक वर्ष (फायनान्शियल इअर) याच दिवशी सुरू होतं. शेतकरी राजा संपलेल्या रब्बी हंगामाची आकडेमोड करून येणाऱ्या खरीपाची बेगमी करण्याचा मुहूर्त गुढीपाडव्यालाच करतो. अगदी सालगड्यापासून ते इतर सर्वांची देणी चुकती
 
विवेक राजूरकर, औरंगाबाद
राज्यात भीषण दुष्काळ आहे. मराठवाडा तर अक्षरक्षः होरपळून निघतोय. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मुख्यमंत्री आणि राज्यातले केंद्रीय मंत्रीच त्याकडं लक्ष वेधून केंद्र सरकारकडं मदतीची याचना करत होते. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानं हे चित्र बदलण्याची आशा निर्माण झालीय.