टॉप न्यूज

ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली/मुंबई
कोयना धरणापासून ते रायगडमधील सेझ प्रकल्प असो...जमिनी गेलेल्या आणि विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांचा न्यायहक्कांसाठी लढा सुरुच आहे. बऱ्याच जणांचं आयुष्य या लढ्यातच संपून गेलं. पण...लोकसभेनं मंजूर केलेल्या भूसंपादन विधेयकामुळं आता कुणालाही जबरदस्तीनं जमीन बळकावता येणार नाही. कुठल्याही कामासाठी जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. ग्रामीण भागातील जमीन मालकांना बाजारभावापेक्षा चार पटीनं तर शहरी भागातील जमीन मालकांना दुप्पट भरपाई देण्याची तरतूदही यात आहे.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
मानवी मनोरे रचण्याचा नऊ थरांचा विक्रम यंदा मोडला जाणार असं बोललं जात होतं. अनेक गोविंदा पथकांनी 10 थर रचण्यासाठी जीवाचं रान केलंही. पण...ते साध्य झालं नाही आणि नऊ थरांचाच थरार कायम राहिला. मुंबईसह राज्यभरात 'गोविंदा आला रे आला' आणि 'गोविंदा रे गोपाळा' च्या तालात तरुणाईची पावलं सकाळपासूनच थिरकत होती. गावागावात आणि सोसायट्यांमध्ये दहीहंडी फुटल्या. मुंबई, ठाण्यात लाखमोलाच्या दहिहंडी फोडण्यासाठी अनेक पथकांनी नऊ थर रचून सलामी दिली. सेलिब्रिटींची उपस्थिती आणि सोबतीला असणारी सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी हे वैशिष्ट यावेळीही कायम होतं.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई/पुणे
जादूटोणाविरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्यावर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अखेर एकमत झालं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर समाजाच्या सर्व स्तरातून उमटणाऱ्या भावना लक्षात घेऊन सरकारनं गेली १४ वर्षं प्रलंबीत असणारं हे विधेयक मंजूर करण्यासाठी तातडीनं पावलं उचलली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे पुरोगामी संघटनांनी स्वागत केलं असून ...आता मारेकऱ्यांचा शोध घेऊन या भ्याड हत्येमागील शक्तींना समाजासमोर आणा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पोलिसांना काही धागेदोरे मिळाले असले तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 
 
ब्युरो रिपोर्ट, जळगाव
कृषी संस्कृतीशी नातं जोडणारे सणवारं आपल्याकडं मोठ्या उत्साहात साजरे होतात. खानदेशात मोठ्या जल्लोषात साजरा होणारा कानबाई किंवा कानुबाईचा उत्सव त्यापैकीच एक! कानुबाई ही निसर्गदेवता आहे. तिला प्रकृती मानले जाते. वंशवृद्धी व गोधनवृद्धीसाठी या निसर्गदेवतेची पूजा करण्यात येते. नुकताच हा सण मोठ्या जल्लोषात साजरा झाला. त्यानिमित्तानं अवघा खानदेश कानबाईमय झाला होता. घरात आलेल्या कानबाईला गोडधोडं खाऊ घालून, परंपरागत गीतं गातं आहिरांनी तिची भाकणूक केली.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
महाराष्ट्राची विकासातील घोडदौड कायम ठेवण्यासाठी राज्याला पाणीटंचाई मुक्त करुन कोरडवाहू शेती शाश्वत करण्यावर भर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. त्यामुळं येत्या तीन वर्षात नाला सिमेंट बंधारे बांधण्यासह, नदी पुनर्जीवन आणि अपूर्ण सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्याची सुचिन्हे आहेत. या कामासाठी सुमारे ६० हजार कोटींची योजना राबवण्याचा राज्य सरकारचा मानस असून नियोजन आयोगानं राज्याच्या ४९ हजार कोटी रुपयांच्या आराखड्यास यापूर्वीच मंजुरी दिलीय.
 
ब्युरो रिपोर्ट
मुंबई/नाशिक – महागाईत सर्वच खाद्यपदार्थांचे भाव वाढलेत. मात्र, कांद्यानं उचल खायला सुरवात केली, की शहरीवर्गाच्या डोळ्यात पाणी यायला सुरवात झालीय. प्रति किलो दहा रुपयांवरुन कांदा आता ५० ते ६० रुपयांवर पोहोचलाय. नवीन आवक सुरू होत नाही तोपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे, सर्वसामान्य ग्राहक किलोभर कांद्याला ५० रुपयांवर रोकडा मोजत असला तरी शेतकऱ्यांना २५ ते ३० रुपयेच मिळतायत. सध्याचा श्रावण हा व्रतकैवल्याचा महिना असल्यानं कांदा खाण्याचं प्रमाणं खूपच कमी होतं. तरी ही परिस्थिती आहे.
 
मुश्ताक खान
कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं इथलं निसर्ग सौंदर्य. या निसर्ग सौंदर्यात पावसाळ्यात अधिक भर पडते. पावसाळ्यात तर कोकणमध्ये निसर्गाचं नंदनवन पाहायला मिळते. आता पावसाळ्यात नटलेल्या आणि बरहलेल्या कोकणच्या दऱ्या-खोऱ्या, वाड्या-वस्त्या अगदी तुमच्या आमच्या भोवतालची रुपं टिपून ती जगासमोर आणण्याची संधी एका स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली आहे.
 
ब्युरो रिपोर्ट
अवघ्या मऱ्हाटी मुलखातून विविध पालख्यांसमवेत आलेले लाखो वारकरी आणि देशभरातून आलेल्या भक्तांमुळं अवघं पंढरपूर विठ्ठलमय होऊन गेलंय. भगव्या पताकांनी चंद्रभागेचं वाळवंट गजबजून गेलय. तर टाळ-मृदंगाच्या गजरात 'विठ्ठल...विठ्ठल' असा एकच जयघोष कानी पडतोय. दर्शनरांगेत तासन् तास उभं राहून सावळ्या विठूरायाच्या चरणी डोकं ठेवल्यानंतर भक्तांच्या चेहऱ्यावर 'याचसाठी केला होता अट्टाहास...' हा परमानंदाचा भाव लख्खपणे पहायला मिळतोय. आषाढी एकादशीला बा-विठ्ठलाच्या चरणी डोकं ठेवायला मिळणं यापेक्षा दुसरी पुण्याईची गोष्ट कोणती असू शकते, याची प्रचीती इथं उसळलेला भक्तांचा महासागर पहायल्यानंतर अनुभवायला मिळतेय.
 
ब्युरो रिपोर्ट, सोलापूर
पांडुरंगाचं नावं घेत अखंड दोन आठवडे चालणारे लाखो वारकरी पंढरपूर आता हाकेच्या अंतरावर आल्यानं आनंदी झाले आहेत. 'तुका म्हणे धावा । पुढे पंढरी विसावा', असं म्हणत कालचा धावा झाला तरी आजही वारीतील पावलं धावतचं होती. पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेला हा वैष्णवांचा थवा आज टप्पा इथं झालेल्या संत ज्ञानेश्वर आणि सोपानदेव यांच्या बंधुभेटीनं आणखीनच गहिवरुन गेला. आता, उद्या वाखरीत तुकोबारायांसह सर्वच पालख्या एकत्र येणार आहेत. त्यामुळं आपल्या सग्यासोयर्यांची गळाभेट घेता येणार, या कल्पनेनं विविध पालख्यांसमवेत अवघ्या मराठी मुलखातून चारी दिशांनी पंढरपूरकडं
 
मुश्ताक खान, मालगुंड, रत्नागिरी
आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते कवी म्हणजे कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत. मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असं म्हणत आधुनिक मराठी कवितेचं सुंदर लेणं खोदणारे युगप्रवर्तक कवी! अशा या कवी केशवसुतांचं स्मारक आता पर्यटनस्थळ बनलंय. गणपतीपुळेपासून अवघ्या दोन किलोमीटरवरील मालगुंड इथं केशवसुत यांचं स्मारक आहे. गणपतीपुळेला येणारा प्रत्येकजण या स्मारकाला भेट देऊन 'सावध! ऐका पुढल्या हाका!' यासारख्या केशवसुतांच्या ओळी मनात साठवूनच परततो. आज जागतिक काव्य दिनानिमित्त कविवर्यांना 'भारत4इंडिया'चा सलाम!