टॉप न्यूज

ब्युरो रिपोर्ट, पुणे
कुस्तीत ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याची जिद्द बाळगून असणारा नरसिंग यादव या मुंबईतील पठ्ठ्यानं सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकावला. भोसरीतील लांडगे क्रीडानगरीत लाखभर कुस्तीप्रेमींच्या साक्षीनं नरसिंगनं मुंबईच्याच सुनील साळुंखेवर 7-0 असा दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्र केसरी किताबाच्या इतिहासात सलग तीन वेळा विजेतेपद पटकावणारा नरसिंग यादव हा पहिलाच मल्ल आहे. या हॅटट्रिकमुळं त्याचं नाव कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं जाणार आहे.
 
ब्युरो रिपोर्ट
शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंदचा फटका पंढरपुरातील उत्पत्ती एकादशीला बसलाय. आळंदीला जाणारे वारकरी पंढरीत येवून विठुरायाचे दर्शन घेतात. त्या नंतर भाविक आळंदीला वारीला जातात. मात्र शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बंद मुळे एसटी सेवा बंद आहे. याचा फटका या वारकऱ्यांना बसलाय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई/कोल्हापूर/सांगली
उसाला पहिला हप्ता किमान तीन हजार रुपये द्या, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेल्या आंदोलनानं आता उग्र स्वरुप धारणं केलंय. खा. राजू शेट्टी यांनी 48 तास बंदची हाक दिल्यानं सांगली, सातारा, कोल्हापूर ही शहरं आणि पश्चिम महाराष्ट्रातील गावोगावी कडकडीत बंद पाळला जातोय. कार्यकर्त्यांनी पेटते टायर टाकून रस्ते बंद केल्यानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालीय. एस. टी. वाहतूकही ठप्प आहे. या आंदोलनाकडं सरकारनं लक्ष द्यावं, असा दबाव आता वाढत चाललाय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन आज (17 नोव्हेंबर) एक वर्ष झालं. बरोबर वर्षापूर्वी आजच्या दिवशी...'बाळासाहेबांशिवायचा महाराष्ट्र' ही कल्पनाही सहन होत नव्हती. त्या शोकाकुल वेदनेचा हुंकार अवघ्या मऱ्हाटी मुलूखातून बाहेर पडत होता. काळ कुणासाठी थांबत नाही. आता बाळासाहेब परत येणार नाहीत, हे वास्तव स्वीकारत त्यांच्या अफाट कर्तृत्वाची सावली अंगाखांद्यावर घेऊन महाराष्ट्र पुढं जातोय. नव्हे, त्याला तसंच पुढं जावं लागेल. त्यामुळंच त्यांच्या आजच्या प्रथम स्मृतीदिनी 'अमर रहे, अमर रहे बाळासाहेब अमर रहे' असा जयघोष शिवसैनिक करतोय. आम आदमीही आठवणींनी गलबलून गेलाय.
 
ब्युरो रिपोर्ट
बाळासाहेब ठाकरे हे केवळ देशपातळीवरचं नेतृत्व नव्हतं तर जगभर त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आकर्षण होतं. म्हणूनच तर त्यांच्या मृत्यूची बातमी जगभरातील मीडियानं दिली. त्यातील  काही महत्त्वाच्या दैनिकांच्या अशा होत्या हेडलाईन्स...
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
17 नोव्हेंबर 2012. वेळ दुपारची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्याची बातमी आली आणि अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. राज्यभरातील शिवसैनिक आणि त्यांचे चाहते यांनी मिळेल ती गाडी पकडून मुंबईत धाव घेतली. या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देताना मुंबई सुन्न झाली होती आणि सर्वांच्याच अश्रूंचा बांध फुटला होता. त्यांच्या अंतिम महायात्रेची ही एक आठवण...!
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
भारत आणि इंडिया यांच्यातील दरी कमी होऊन त्यांच्यात संवाद, सहकार्य आणि सन्मान प्रस्थापित व्हावा, या उद्देशानं सुरू झालेल्या 'भारत4इंडिया'नं (14 नोव्हेंबर) एक वर्षाची यशस्वी कारकीर्द पूर्ण केली. हे आमच्यासाठी मिशन असून त्यासाठी नव्या दमानं आणि उत्साहानं आम्ही सज्ज आहोत. गेल्या वर्षभरात डोंगराएवढ्या अडचणी आल्या. परंतु त्यामुळं खचून न जाता आम्ही झुंजलो. ही झुंज अजून सुरुच आहे. त्यातूनच आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर हे नव्या पिढीचं नवीन माध्यम झोकात सुरु राहील, हा आत्मविश्वास आलाय.
 
ब्युरो रिपोर्ट, पंढरपूर
आज कार्तिकी एकादशी. 'बा-विठ्ठला'ला भेटण्यासाठी देशभरातून आलेल्या भक्तगणांनी पंढरपूर अक्षरक्ष: फुलून गेलंय. चंद्रभागेच्या काठी भगव्या पताकांची गर्दी झालीय. टाळ, मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा-तुकयाचा जयघोष होतोय. माऊली, माऊली म्हणत वारकरी एकमेकांना अलिंगन देत भेटतायत. दर्शनरांगेतील लाखो भक्तांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागलीय तर दर्शन घेऊन आलेल्या तेवढ्याच भक्तजनांच्या चेहऱ्यावर 'अजि म्या ब्रह्म पाहिले' असा आनंद स्पष्टपणे पहायला मिळतोय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई / कोल्हापूर / सातारा
यंदाच्या गळीत हंगामातही ऊसदराचा मुद्दा घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचं रान पेटवलंय. ऊस दराची पहिली उचल विनाकापात तीन हजार रुपये दिली नाही तर साखर कारखान्यांची धुराडी पेटू दिली जाणार नाहीत, असा इशाला देतानाच येत्या 15 नोव्हेंबरपासून मुख्यमंत्र्यांच्या गावात कराडात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळं पोलीस खात्यासह प्रशासनाची एकचं धांदल उडाली असून धुराडी पेटणार की सीएमचा सातारा जिल्हा, याचीच उत्सुकता राज्यातल्या शेतकऱ्यांना लागून राहिलीय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
गेल्या डिसेंबरमध्ये संसदेनं बहुचर्चित एफडीआयच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सर्वाधिक चर्चेत आली ती अमेरिकेतील बलाढ्य कंपनी वॉलमार्ट! भागिदारीचा करार संपुष्टात आल्यानं आता वॉलमार्ट आणि भारतीय कंपनी भारती एंटरप्राईजेस यांनी 'एकला चलो रे' चा नारा दिलाय. वरवर ही दोन कंपन्यांमधील अंतर्गत बाब वाटत असली तरी नजिकच्या काळात यामुळं बऱ्याच उलाढाली होतील. विशेषत: वॉलमार्टनं भारतातील कृषी क्षेत्रात जी मुसंडी मारलीय तिला व्यसन बसेल, असा दावा अर्थतज्ज्ञ करतायंत.