महाराष्ट्राची निराशा
महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, तर महाराष्ट्र आणि खास करुन मुंबईच्या रेल्वे प्रवाशांना या बजेटकडुन खुप अपेक्षा होत्या. पण मोदी सरकारच्या या पहिल्याच बजेटनं त्यांचा सपशेल अपेक्षाभंग केलाय असंच म्हणावं लागेल कारण अच्छे दिन चं स्वप्न दाखवुन दिड महिन्यापुर्वी सत्तेत आलेल्या मोदी सरकारनं आधीच रेल्वे भाडेवाढ केली आणि आता रेल्वे बजेटमध्येही त्यांच्या पदरात म्हणावं असं काहीच पडलं नाही. खरं तर भारताच्या अर्थकारणाची आत्मा असणारी रेल्वे सध्या तोट्यात सुरु आहे. म्हणुन कोट्यावधी प्रवाशांना मुलभुत सोयीसुविधाही रेल्वेकडुन उपलब्ध करुन दिल्या जाऊ शकत नाहीत. एवढी मोठी प्रवासी संख्या असलेल्या रेल्वेचा खर्च हा उत्पन्नाच्या ९४ टक्के असल्याचं रेल्वे मंत्र्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं रेल्वेला या तोट्यातुन बाहेर काढण्यासाठी वेळीच पावलं उचलायला हवेत असंही मत त्यांनी व्यक्त केलं. पण आता तिकीटाच्या किमतीत वाढ करणं शक्य नाही आणि केवळ तिकीट भाववाढ हा त्यावरचा उपाय नसल्याचंही रेल्वे मंत्र्यांनी कबुल केलंय.
बजेटचं वेगळेपण
असं असलं तरीही अनेक बाबतीत हा रेल्वे अर्थसंकल्प चांगला आहे आणि मोदींनी स्वप्न दाखवलेले अच्छे दिन भविष्यात वास्तवात येणार अशी आशा जागवणारा आहे असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रेल्वेमंत्र्यांनी केलेली मुंबई-अहमदाबात बुलेट ट्रेनची घोषणा. लवकरात लवकर सरकार या बुलेट ट्रेनचा प्रकल्प हाती घेण्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली. 'अ' दर्जाच्या रेल्वे स्थानकांवर वाय-फायची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पुढच्या दोन वर्षात मुंबईकरांना लोकलच्या ४६४ फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. तर लोकलची दारं स्वयंचलित करण्यात येणार आहेत. विमानतळांप्रमाणे स्वच्छता रेल्वे स्टेशन्सवरही ठेण्यात येणार आहे आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर करण्यात येणार आहे. जेवणाचा दर्जा सुधारण्यात येणार आहे.
खाजगीकरणावर भर
रेल्वे बजेटमधली महत्वाची आणि नविन बाब म्हणजे मोदी सरकारनं रेल्वेच्या विकासात खाजगीकरणालाही वाव दिलाय. रेल्वेच्या अनेक योजना ह्या बीओटी आणि पीपीपी तत्वांवर राबवण्यात येणार असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच रेल्वेत एफडीआय लाही प्रवेश देण्याचा मानस रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केलाय.
बजेटमधला विरोधाभास
एका बाजुला सरकार म्हणतंय की रेल्वे तोट्यात सुरु आहे आणि दुसरीकडे एवढ्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्टची घोषणा, यात जरा विरोधाभास वाटतोय. तोट्यात चालणाऱ्या रेल्वेकडे या प्रकल्पांसाठीचा निधी कुठुन येणार असा सहाजिक प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. त्यामुळं या सगळ्या प्रकल्पांसाठी लागणारा पैसा रेल्वेचा किती आणि एफडीआय चा किती हे येणारा काळंच ठरवेल.
काय मिळणार प्रवाशांना-
- ६० हजार कोटींची मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन.
- ९ रेल्वे मार्गांवर हाय स्पीड ट्रेन.
- पाच जनसाधारण ट्रेन.
- पाच प्रिमियम ट्रेन.
- रेल्वे तिकीट पोस्ट ऑफिसमध्येही मिळणार.
- महत्वाची बंदरं जोडण्यासाठी रेल्वे मार्ग.
- महिलांच्या सुरक्षेसाठी ४ हजार महिला आरपीएफची भरती.
- दुध, फळं, भाजीपाला यांच्या वाहतुकीला प्राधान्य.
- शेतमालासाठी वातानुकुलीत गोदामं उभारणार.
- विमानतळांसारखेच रेल्वे स्टेशन्स तयार करणार.
- स्वच्छतेवर विशेष भर.
- 'अ' दर्जाच्या रेल्वे स्टेशनवर वाय-फाय सुविधा उपलब्ध करुन देणार.
- रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पीएफ मध्ये वाढ.
- रेल्वेतील जेवणाचा दर्जा सुधारणार.
बजेटमध्ये घोषणा केलेल्या नविन गाड्या
जनसाधारण गाड्या
1. अहमदाबाद - दरभंगा जनसाधारण एक्सप्रेस व्हाया सूरत
2. जयनगर - मुंबई जनसाधारण एक्सप्रेस
3. मुंबई - गोरखपूर जनसाधारण एक्सप्रेस
4. सहरसा - आनंद विहार जनसाधारण एक्सप्रेस व्हाया मोतीहारी
5. सहरसा - अमृतसर जनसाधारण एक्सप्रेस
प्रीमिअम गाड्या
1. मुंबई सेंट्रल - नवी दिल्ली प्रीमियम एसी एक्सप्रेस
2. शालिमार - चेन्नई प्रीमियम एसी एक्सप्रेस
3. सिकंदराबाद - हजरत निजामुद्दीन प्रीमियम एसी एक्सप्रेस
4. जयपूर - मुदरै प्रीमियम एसी एक्सप्रेस
5. कामाख्या - बेंगळुरू प्रीमियम एसी एक्स्प्रेस
वातानुकूलित एक्सप्रेस गाड्या
1. विजयवाडा - नवी दिल्ली (दैनिक)
2. लोकमान्य टिळक (ट) - लखनऊ (साप्ताहिक)
3 नागपूर - पुणे (साप्ताहिक)
4. नागपूर - अमृतसर (साप्ताहिक)
5. नहरलगून - नवी दिल्ली (साप्ताहिक)
6. निजामुद्दीन - पुणे (साप्ताहिक)
एक्सप्रेस गाड्या
1. अहमदाबाद - पाटणा एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया वाराणसी
2. अहमदाबाद - चेन्नई एक्सप्रेस (आठवड्यात दोन दिवस) व्हाया वसई रोड
3. बेंगळुरू - मंगळूर एक्सप्रेस (दैनिक)
4. बेंगळुरू - शिमोगा एक्सप्रेस (आठवड्यातून दोन दिवस)
5. वांद्रे (टी) - जयपूर एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया नागदा, कोटा
6. बीदर - मुंबई एक्सप्रेस (साप्ताहिक)
7. छपरा - लखनऊ एक्सप्रेस (आठवड्यातून तीन दिवस) व्हाया बलिया, गाजीपुर, वाराणसी
8. फिरोजपुर - चंदिगड एक्सप्रेस (आठवड्यातून सहा दिवस)
9. गुवाहाटी - नहरलगून इंटरसिटी एक्सप्रेस (दैनिक)
10. गुवाहाटी - मुर्कोंगसेलेक इंटरसिटी एक्स्प्रेस (दैनिक)
11. गोरखपूर - आनंद विहार एक्सप्रेस (साप्ताहिक)
12. हापा - विलासपूर एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया नागपूर
13. हुजूरसाहेब नांदेड - बीकानेर एक्सप्रेस (साप्ताहिक)
14. इंदूर - जम्मू तावी एक्सप्रेस (साप्ताहिक)
15. कामाख्या - कटरा एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया दरभंगा
16. कानपूर - जम्मू तावी एक्सप्रेस (सप्ताह में दो दिन)
17. लोकमान्य टिळक (ट) - आझमगड एक्सप्रेस (साप्ताहिक)
18. मुंबई - काजीपेट एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया बल्हारशाह
19. मुंबई - पलिताना एक्सप्रेस (साप्ताहिक)
20. नवी दिल्ली - भटिंडा शताब्दी एक्सप्रेस (आठवड्यातून दोन दिवस)
21. नवी दिल्ली - वाराणसी एक्सप्रेस (दैनिक)
22. पारादीप - हावडा एक्सप्रेस (साप्ताहिक)
23. पारादीप - विशाखापट्टणम् एक्सप्रेस (साप्ताहिक)
24. राजकोट - सेवा एक्सप्रेस (साप्ताहिक)
25. रामनगर - आगरा एक्सप्रेस (साप्ताहिक)
26. टाटानगर - बैय्यप्पसनहली (बेंगळुरू) एक्सप्रेस (साप्ताहिक)
27. विशाखापट्टणम् - चेन्नई एक्सप्रेस (साप्ताहिक)
पॅसेंजर गाड्या
1. बीकानेर - रेवाडी पॅसेंजर (दैनिक)
2. धारवाड - दांडेली पॅसेंजर (दैनिक) व्हाया अलनावर
3. गोरखपूर - नौतनवा पॅसेंजर (दैनिक)
4. गुवाहाटी - मेंदीपठार पॅसेंजर (दैनिक)
5. हटिया - राऊरकेला पॅसेंजर
6. बिंदूर - कासरगौड पॅसेंजर (दैनिक)
7. रंगापाडा नार्थ - रांगिया पॅसेंजर (दैनिक)
8. यशवंतपूर - तुमकुर पॅसेंजर (दैनिक)
Comments
- No comments found