माझे जिविची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी॥ असे म्हणत लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुराकडे प्रस्थान करतात. पावित्र्याचे प्रतीक असलेल्या स्वच्छ पांढर्या रंगाच्या पोषाखात, कपाळी अष्टगंध, बुक्का लेवून, गळ्यात तुळशीमाळा धारण करून, मुखात अखंड ‘रामकृष्णहरी’ मंत्राचा जप, टाळ-मृदंग-चिपळ्यांच्या साहाय्याने नामाचा गजर करीत, हरिनामाचा झेंडा उंचावत, हजारोंच्या संख्येने वारकर्यांच्या दिंड्या अतिशय शिस्तीने विठूरायाच्या भेटीसाठी असतात. याच नयनरम्य सोहळ्याची सुरुवात संपुर्ण महाराष्ट्रात झालीये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक पंढरपुरच्या दिशेनं येणाऱ्या वारीत सहभागी होतायेत.
पालख्यांचे प्रस्थान
पंढरपुरला विठोबाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून वेगवेगळया संतांच्या 250 ते 300 पालख्या ज्येष्ठ महिन्यात समारंभपूर्वक प्रस्थान ठेवतात आणि पंढरीकडे र्मागक्रमण करतात. यापैकी तुकोबा आणि संत एकनाथांची पालखी उद्या प्रस्थान ठेवणार आहे. तुकोबाची पालखी देहुरोड वरुन तर संत एकनाथांची पालखी पैठणवरुन विधीपुर्वक प्रस्थान ठेवेल आणि पंढरपुरकडे मार्गक्रमन करेल. तर माऊलींची पालखी आळंदीवरुन 20 जुनला प्रस्थान ठेवेल.
तुकोबाची पालखी
उद्या दि. 19 जुनला होणाऱ्या पालखी सोहळ्याची जय्यद तयारी देहुरोडमध्ये करण्यात आलीये. उद्या पालखी पंढरपुरसाठी प्रस्थान ठेवेल, हा सोहळा पाण्यासाठी महाराष्ट्राच्या अनेक भागातुन वारकरी देहुरोडमध्ये दाखल झालेत. यंदाचा सोहळा हा 329 वा पालखी सोहळा आहे.
पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रम
पहाटे 4 : शिळा मंदिरात महापूजा
पहाटे 5.30 : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा
सकाळी 6 : वैकुंठस्थान मंदिरात महापूजा
सकाळी 7 : तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात महापूजा
सकाळी 9 : देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन
दुपारी 4 : पालखी सोहळा प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ
एकनाथाच्या पालखीचे प्रस्थान
19 जुनला संध्याकाळी संत एकनाथांची पालखी पंढरपुरकडे प्रस्थान ठेवेल. त्याआधी दिवसभर भाविकांना पालखीचं दर्शन घेता येणार आहे. १९ दिवसाच्या प्रवासानंतर व मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या भागातील १९ गावांमध्ये मुक्काम केल्यावर ८ जुलैला संत एकनाथ महाराज यांची पालखी पंढरपूरला पोहचेल. ८ जुलैला आषाढी वारीत महोत्सवात सहभागी झाल्यावर, ९ जुलैला पंढरपूर नगर प्रदक्षणा, व ११ जुलै पर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरच्या नाथ मंदिरात राहील.
पालखीचे मार्गक्रमण
चनकवाडी, हादगाव, लाडजळगाव, कुंडल पारगाव, मुंगुसवाडां, राक्षसभुवन, रायमोह, पाटोदा, दिघोळ, खेर्डा, दांडेगाव, अनाले, परंडा, बिटरगाव, कुर्डू, अरण, करकंब, होळे, शिरढोण मार्गे ८ जुलैला मंगळवारी पंढरपूर.
पाच रिंगण सोहळे
१९ जून ते ८ जुलै दरम्यान संत एकनाथ महाराज यांच्या पालखीत पाच रिंगण सोहळे होणार आहेत. २३ जून मिडगाव येथे पहिला, २७ जून पारगाव घुमरे येथे दुसरा, ३० जून नागरडोह येथे तिसरा, ३ जुलै कव्हेदंड येथे चौथा व ८ जुलै रोजी पंढरपूर येथे पादुका आरती व पाचवे उभे रिंगण होणार आहे.
Comments
- No comments found