टॉप न्यूज

संघर्षयात्रीच्या प्रवासाची अखेर

ब्युरो रिपोर्ट, परळी, बीड
परळीच्या बैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मैदानात, लोखोंच्या जनसागरानं साश्रु नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. आपल्या लोकनेत्याचं अखेरचं दर्शन घेताना कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. दुपारी १.४५ वाजता पंकजा मुंडे यांनी त्यांना मुखाग्नी दिला आणि महाराष्ट्राचा शेतकऱ्यांसाठी आणि तळागाळातल्या जनतेसाठी लढणारा संघर्षयात्री अनंतात विलीन झाला.


a9

गोपिनाथ मुंडे हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे वाली होते. शेतकऱ्यांच्या समस्या मग त्या ऊस दरवाढीच्या संदर्भात असो की ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न असो. गोपिनाथ मुंडे सर्वच प्रश्नांसाठी धडपडत. आणि ते तडीस नेत. स्वत: कारखानदार असुनही ते शेतकऱ्यांच्या ऊस दरवाढीच्या आंदोलनाला नेहमीच पाठिंबा देत असत. ऊस तोडणी कामगार पैशांसाठी बाहेरच्या राज्यात जातायेत त्यासाठी त्यानी त्यांचं वेतन वाढवुन दिलं. शेतकऱ्यांच्या त्यामुळंच गोपिनाथ मुंडेंच्या जाण्यानं बळीराजाही पोरका झालाय.

सहकार आंदोलनात योगदान
१९८४ मध्ये शरद पवारांनी झोन बंदीचा कायदा आणला. या कायद्यांतर्गत शेतकरी आपला ऊस फक्त २० किमी अंतरात असलेल्या साखर कारखान्यातच पाठवु शकत होता. त्याच्या बाहेर जाण्याची शेतकऱ्याला परवानगी नव्हती. या परिघाबाहेरचा कारखाना ऊसाला जास्त भाव देत असला तरीही शेतकरी आपला ऊस त्या कारखान्यात पाठवु शकत नव्हता. त्यांच्यावर कायदेशिर कारवाई केली जायची. गोपिनाथ मुंडेंनी १९९६ मध्ये सत्तेत आल्यावर सर्वात आधी शेतकऱ्यांच्या पायातील ही बेडी काढुन शेतकऱ्याला मोकळं केलं. झोनबंद्दी कायदा रद्दबातल ठरवला. त्यामुळं आता शेतकरी आपला ऊस त्याला हवा त्या कारखन्यात पाठवु शकतो. अशा अनेक निर्णयांनी त्यांनी सहकार क्षेत्रात असलेली काही पक्ष आणि नेत्यांची मक्तेदारी मोडीत काढली आणि सहकार क्षेत्रं मोकळा श्वास घेऊ लागलं. अनेकदा आंदोलन करणारे शेतकरी मुंडे काही तोडगा काढतील यावर विश्वास ठेवायचे नाहीत कारण तेही कारखानदार होते. पण तरीही त्यांनी शेतकरी आणि ऊस उत्पादक यांच्या बाजुनं आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेतले. कदाचित म्हणुनच त्यांना कारखानदार ही पदवी कधीच चिकटली नाही.


ऊस दरवाढ आंदोलन
२०१०-११ मध्ये जेव्हा ऊस दरवाढीचं आंदोलन पेटलं होतं तेव्हा गोपिनाथ मुंडें सहकार मंत्र्यांना घेऊन स्वत: साखर आयुक्ताना भेटले आणि त्यावर तोडगा काढला होता. आणि पहिल्यांदा त्यांनी ऊसाच्या दरासाठी तीन झोन तयार केले. ऊसाचं उत्पादन जास्त असलेल्या पश्चिम माहाराष्ट्रात जास्त भाव, मराठवाड्यात जिथं ऊस उत्पादन थोडं कमी आहे तिथं थोडा कमी भाव आणि विदर्भात तिथं ऊसाचं उत्पादन अगदी कमीच आहे तिथं कमी भाव अशा पद्धतीनं त्यांनी या प्रशनावर तोडगा काढला. आणि गोपिनाथ मुंडेंमुळंच त्या वेळी हे आंदोलन शांत झालं होतं. त्यांच्या प्रयत्नांनी शेतकऱ्यांना न्याय मिळाला होता.

 

ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न
२०१०-११ मध्ये ऊस उत्पादकांना ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न भेडसावात होता. ऊस पिकवला पण तो तोडायला मजुर मिळत नव्हते. ही समस्या जेव्हा मुंडेंना समजली तेव्हा त्यांनी चौकशी केली आणि त्यावेळी त्यांना समजलं की महाराष्ट्रापेक्षा गुजरात सारख्या राज्यांमध्ये या मजुरांना जास्त पैसे मिळातात म्हणुन ते मजुर महाराष्ट्र सोडुन जातायेत. हे मजुर बाहेरर जाऊ नयेत, इथल्या शेतकऱ्यांची समस्या दुर करण्यासाठी त्यांनी या मजुरांचं वेतन वाढवण्याचा प्रस्ताव साखर संघाकडे ठेवला. आणि त्यांचं वेतन वाढवुन घेतलं. शेतकरी आणि ऊस तोडणी कामगार दोघांच्याही भल्याचा हा निर्णय होता.

चारा छावणीत एक रात्र
२०१३ मध्ये महाराष्ट्र प्रचंड दुष्काळानं होरपळुन निघाला होता. जनावरांसाठी सरकारनं ठिकठिकाणी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. पण चारा छावण्या सुरु केल्यानंतर त्या शेकऱ्यांकडे बघायला कोणत्याही नेत्याला वेळ नव्हता तेव्हा गोपिनाथ मुंडे हे स्वत: त्या चारा छावणीवर एक रात्र त्या शेतकऱ्यांसोबत राहिला. त्यांचे प्रश्न जाणुन घेतले. रात्रभर उघड्या आकाशाखाली ते झोपले. सकाळी उठुन आपल्या नेहमीच्या कामाला लागले.

पक्षापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्या महत्वाच्या
२०१०-११ च्या ऊस प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंडेंनी बारामतीला शरद पवारांना भेटायला जाण्याचीही तयारी दाखवली होती. त्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा पक्ष काधीही मोठा नव्हता. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते राजकारणाच्या पलिकडे जाऊन प्रयत्न करायचे. ही काही उदाहरणं आहेत. त्यांच्या राजदकीय कारकिर्दीत त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेत. आणि शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले. म्हणुनच गोपिनाथ मुंडे हे लोकनेता होते. पण लोकप्रियतेसाठी त्यांनी काधीही ही कामं केली नाहीत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरंच जाण होती, तळमळ होती, म्हणुनच ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव हजर असायचे. त्यांच्या या सगळ्या कामाची पावती होती आज त्यांना निरोप द्यायला आलेला जनसमुदाय. गोपिनात मुंडे खऱ्या अर्थानं लोकांच्या मनावर राज्य करणारा नेता होता हेच या जनसमुदायानं सिद्ध केलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.