टॉप न्यूज

मुलुखमैदान तोफ थंडावली

ब्युरो रिपोर्ट
महाराष्ट्र भाजपचे आधारस्तंभ आणि नवनिर्वाचित ग्रामिण विकास मंत्री गोपिनाथ मुंडे यांचं दिल्लीत अपघाती निधन झालं. आज सकाळी बीडच्या विजयी रॅलिसाठी ते दिल्ली एयरपोर्टला निघाले होते. त्याच दरम्यान अरबिंदो मार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर त्यांना आलेल्या हृद्यविकाराच्या झटक्यात त्यांचा रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच त्यांचा मृत्यु झाला. उद्या बिडमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचा असा अपघाती मृत्यु हा नरेंद्र मोदींच्या सरकारला बसलेला पहीला धक्का आहे.

gopinath-munde-bjp-13806184054771


महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं लोकनेता
गोपिनाथ मुंडे हे ग्रामिण भागातुन आलेले नेते होते, त्यामुळं ग्रामिण जनतेच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत होत्या. त्यांच्या प्रश्नांची त्यांना जाणिव होती. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच धडपड करत असायचे. मग तो सहकाराचा प्रश्न असो किंवा दुश्काळात चारा छावण्यांचा प्रश्न असो, ते तळमळीनं शेतकऱ्यांशी बोलायचे, त्यांचे प्रश्न जाणुन घ्यायचे आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे. ग्रामिण भाग आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडलेला नेता म्हमुनच मोदी सरकारमध्ये त्यांच्यावर ग्रामिण विकास मंत्री म्हणुन जबाबदारी देण्यात आली होती.

 

महायुतीच्या विजयाचे शिल्पकार
प्रमोद महाजनांच्या मृत्युनंतर महायुती सांभळण्याची जबाबदारी गोपीनाथ मुंडेंच्या खांद्यावर होती. आणि त्यांनी ती अतिशय कुशलतेना पार पाडत महायुतीला महाराष्ट्रात विजय मिळवुन दिला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

 

कुटुंबावर दुहेरी शोककळा
२००६ मध्ये प्रमोद महाजन यांचा असाच अकाली मृत्यु झाला होता, त्या धक्यातुन महाजन आणि मुंडे कुटुंबिय सावरता सावरताच मुंडेचा असा अकाली मृत्यु झाला. त्यांच्या अशा जाण्यानं कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोगर कोसळला.


विजयी मिरवणुकीऐवजी अंत्ययात्रा
केंद्रात बीजेपीचं सरकार आलं. मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. महाराष्टातील महायुतीच्या विजयात महत्वाची भुमिका बजावणारा नेता बीड मधुन प्रचंड बहुमतानं निवडुन आला. त्याच्या विजयाची मिरवणुक आज बीडमध्ये आयोजीत करण्यात आली होती. पण सकाळीच कार्यकर्त्यांना त्यांच्या निधनाची बातमी आली. विजयी मिरवणुकीएवजी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली.

 

मराठवाड्याला दुसरा धक्का
२४ ऑगस्ट १०१२ ला विलासराव देशमुखांच्या निधनानं मराठवाड्याला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या मृत्युला दोन वर्ष पुर्ण होण्याआधीच गोपिनाथ मुंडेंच्या रुपानं मराठवाड्याला दुसरा मोठा धक्का बसला. आपल्यावरुन वडीलांचं छत्रं हरपल्याच्या प्रतिक्रीया त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यात.

 


मुंडेची राजकिय वाटचाल
गोपीनाथ मुंडेंच्या राजकिय जीवनाची सुरुवात महाविद्यालयीन काळात झाली. महाविद्यालयात च त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश केला. आणिबाणीच्या काळात प्रमोद महाजनांसोबत गोपीनाथ मुंडेंनाही तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर १९७८ मध्ये त्यांनी पहील्यांदा विधानसभेची निवडणुक लढवली. पण ते पराभुत झाले. नंतर,
- १९८० मध्ये भारतीय जनता युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

- १९८० साली रेणापूर मतदारसंघ इथून पहिल्यांदा विधानसभेवर निवडुन गेले.

- १९८५ साली काँग्रसेच्या पंडितराव दौंड यांच्याविरुद्ध मुंडेंना पराभव पत्करावा लागला.

- १९९० साली पुन्हा एकदा मुंडे विधानसभेवर निवडून गेले.

- मनोहर जोशीचं विरोधीपक्ष पद गेल्यानंतर मुंडे यांच्याकडे विधानसभा विरोधीपक्षाची धुरा सोपविण्यात आली होती.

- १९९५-९९ साली युती सरकारच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली.
- २००९ साली बीड मतदार संघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.

- २००९ साली लोकसभेतील भाजप उपनेतेपदी गोपीनाथ मुंडे यांची निवड करण्यात आली.

- २०१४ लोकसभा निवडणुकीत मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश धस यांचा पराभव केला आणि
- २६ मे २०१४ रोजी केंद्रीय ग्रामिण विकास मंत्री पदाची शपथ घेतली.

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.