टॉप न्यूज

रोहिणी गोसावी
        काय काळजी घ्यावी – सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकू नका- सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वस्तुला हात लावणे शक्यतो टाळा-  सार्वजनिक ठिकाणी फिरताना आपल्या तोंडाला, नाकाला किंवा डोळ्यांना हात लावणं टाळा- बाहेरुन आल्यावर आधी हात स्वच्छ धुवा-  शक्य होईल तेवढे आपले हात स्वच्छ धुवत जा– पूर्णपणे शिजवलेले अन्न खा– शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा– प्ल्युची लक्षणं दिसल्यास
 
मंगळवारी (ता. ३) वांग्याची आवक २६४ क्विंटल झाली. त्यांना किमान ७०० ते २५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १४२८ रुपये होता. सोमवारी (ता. २) वांग्यांची आवक २६५ क्विंटल झाली. त्यास ६०० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० रुपये होता. रविवारी (ता. १) वांग्यांची आवक २६४ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० होता.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
गेल्या पंधरा वर्षांचं आघाडीचं वर्चस्व झुगारुन महाराष्ट्राच्या जनतेनं अखेर परिवर्तन घडवलं. 16 व्या विधानसभा निवडणुकीचे निकाल मतदारांच्या अपेक्षेप्रमाणे लागले. गेली 15 वर्ष महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारुन जनतेनं भाजपला पहीली तर शिवसेनेला दुसरी पसंती दिली. भाजपला पुर्ण बहुमत मिळालं नसलं तरीही 122 जागा मिळवत भाजप नंबर 1 चा पक्ष ठरलाय. भ्रष्टाचार, स्त्रीयांवरील अत्याचार, घोटाळे यांना कंटाळलेल्या महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपवर विश्वास टाकून महाराष्ट्राच्या भवितव्याची धूरा सोपवलीये.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
जनतेला 'अच्छे दिन' चं स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारनं त्यांच्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा विचार करुन रेल्वेतुन वाहतुक होणाऱ्या शेतीमालासाठी वातानुकुलित गोदामं बांधण्याचा मानस व्यक्त केलाय. तर शेती माल, दुध आणि फळांच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल प्रवासादरम्यान खराब होणार नाही, त्यामुळं शेतकऱ्यांसाठी हे बजेट काही प्रमाणात दिलासादायक असलं तरी एकंदरीत बजेटचा विचार केला तर मात्र बजेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानंच पुसल्याचं चित्र आहे.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
 विठुचा गजर...हरिनामाचा झेंचा रोवला....विठ्ठल विठ्ठल जय हारी...असं आपल्या लाडक्या विठुरायाचं गुणगान करत हजारो भाविक पंढपुरकडं निघालेत. आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र तसंच अगदी भारतभरातुन वारकरी पंढरपुरला येत असतात. विठुनामाच्या गजरात ते चालत असतात, विठुरायाच्या भेटीची ओढ इतकी असते की त्यापुढे त्यांना थकवा जाणवत नाही. या वारीच्या संपुर्ण प्रवासात हरीनाम हा त्यांचा ऊर्जास्त्रोत असतो. हजारो वारकरी दर वर्षी न चुकता या वारीत सहभागी होत असतात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहुन निघालेले हे वारकरी 9 जुलैच्या आषाढी एकादशीला पंढरीला पोहोचतील आणि आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊन
 
ब्युरो रिपोर्ट, नाशिक
महाराष्ट्रात कांद्याचं सगळ्यात जास्त उत्पादन नाशिकमध्ये होतं. म्हणुनच त्याला कांद्याचं आगारही म्हटलं जातं. नाशिकमधील कांदा खरेदी-विक्री, भावात होणारी चढउतर या सगळ्याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात होत असतो. नाशिकमध्ये गेले दोन दिवस काद्याचा लिलाव बंद असल्यानं कांद्याचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. माथाडी कामगारांच्या पागारवाढीला व्यापाऱ्यांनी विरोध केला, म्हणुन कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केलंय. जिल्ह्यातील 15 बाजारसमित्यांमध्ये गेले दोन दिवस कांद्याचा लिलाव ठप्प झालाय. आणि त्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसतोय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
दर वर्षी जुनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसानं यंदा जून महिना संपला तरीही दर्शन दिलेलं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या खरिपाची पेरणीला उशिर झालाय. साधारणपणे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासुन शेतकरी खरिपासाठी शेतीच्या मशागतीला सुरुवात करतो. आणि पहिल्या पावसाच्या अंदाजानं पेरणीचं नियोजन करतो. मे च्या भर उन्हात पेरणी करणं शक्य नसतं. पण यंदा पहिला पाऊसच शेतकऱ्याला हुलकावणी देतोय. मान्सुन जर निट पडला तर पुढचा पावसाळा निट जातो आणि मान्सुन निट बरसला नाही तर शेतकऱ्यांची पिकं अनेकदा पाण्यावाचुन नष्ट होतात असा शेतकऱ्यांचा अंदाज असतो. पावसाला
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळातलं शेवटचं अतिरिक्त बजेट आज विधानसभेत सादर केलं. दुष्काळ आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभुमीवर अजित पवार शेतकऱ्यांसाठी काही भरीव तरतुद करतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली असंच या बेजटवरुन दिसुन येतंय. गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबदल्यात दुप्पट वाढ आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी डिसेंबर २०१४ पर्यंतची मुदतवाढ एवढं सोडलं तर बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळं हे बाजेट सामान्य नागरीकांप्रमाणेच  शेतकऱ्यांचीही निराशा करणारं आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांचा विचार करत कापसावरचा कर ५
 
ब्युरो रिपोर्ट, परळी, बीड
परळीच्या बैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मैदानात, लोखोंच्या जनसागरानं साश्रु नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. आपल्या लोकनेत्याचं अखेरचं दर्शन घेताना कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. दुपारी १.४५ वाजता पंकजा मुंडे यांनी त्यांना मुखाग्नी दिला आणि महाराष्ट्राचा शेतकऱ्यांसाठी आणि तळागाळातल्या जनतेसाठी लढणारा संघर्षयात्री अनंतात विलीन झाला.
 
ब्युरो रिपोर्ट
महाराष्ट्र भाजपचे आधारस्तंभ आणि नवनिर्वाचित ग्रामिण विकास मंत्री गोपिनाथ मुंडे यांचं दिल्लीत अपघाती निधन झालं. आज सकाळी बीडच्या विजयी रॅलिसाठी ते दिल्ली एयरपोर्टला निघाले होते. त्याच दरम्यान अरबिंदो मार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर त्यांना आलेल्या हृद्यविकाराच्या झटक्यात त्यांचा रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच त्यांचा मृत्यु झाला. उद्या बिडमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचा असा अपघाती मृत्यु हा नरेंद्र मोदींच्या सरकारला बसलेला पहीला धक्का आहे.