नामविस्तार दिन

प्रा. अरुण कांबळे
दौर्‍यावर जाण्यासाठी पैसे नसत. ऐनवेळी कसेतरी पैसे गोळा करून जावे लागे. चालत्या गाडीत चढावे लागे. आरक्षण नसल्यामुळे रात्ररात्र जागरण करावे लागे. उभे राहून प्रवास करावा लागे. लागोपाठ जागरण व प्रवास यामुळे प्रकृतीवर परिणाम होई. कार्यक्रमावरही त्याचा परिणाम होत असे. कार्यक्रमाला मात्र लोकांची तुफान गर्दी होई. लोक आमची तासन् तास वाट पाहत असत. कार्यक्रमाला हारांचे ढीग पडत असत. पण भाषणाच्यावेळी पोटात अन्न नसल्यामुळे बोलणे अवघड जाई. आवाज ही बसलेला असे.
 
प्रा. अरुण कांबळे
स्वातंत्र्योत्तर काळातील समतेच्या आंदोलनातील ६ डिसेंबर ७९ चा नामांतर सत्याग्रह हे तेजस्वी पर्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर लाखो कार्यकर्ते या आंदोलनात सामील होऊन ठिकठिकाणी तुरूंगात गेले. भटके -विमुक्त , सर्व जाती-जमातीतील दलित, जातीच्या, धर्माच्या पक्षाच्या भिंती भेदून या आंदोलनात सामील झाले. नामांतर आंदोलनाने समतेच्या चळवळीत अपूर्व इतिहास निर्माण केला.
 
प्रा. अरुण कांबळे
दलित पँथरच्या फाटाफुटीनंतर प्रा. अरुण कांबळे यांनी नामांतर लढ्याच्या माध्यमातून चळवळीला नवसंजीवनी मिळवून दिली. नामांतराचे दिवस हा त्यांचा 'नवशक्ति'त प्रसिद्ध झालेला लेख. असाच एक माईलस्टोन. नव्या रक्ताला नवी प्रेरणा देणारा हा लेख...
 
विजय सरवदे, औरंगाबाद
औरंगाबादमधील प्रतिथयश लेखक. विद्यापीठ गेटजवळ असणाऱ्या वसाहतीत त्यांनी आपलं बालपण घालवलं. नामांतराचा अख्खा लढा त्यांनी पाहिला, अनुभवला आणि लढलादेखील. आज नामांतर किंवा त्यांच्या भाषेत नामविस्ताराची संकल्पना अस्तित्वात येऊन दीड तपाचा कालावधी लोटला. मधल्या काळात एक नवी पिढी जन्माला आली. तिच्या नव्या मानसिकतेलादेखील त्यांनी अनुभवले आहे. त्यांना आलेले अनुभव कथन करताना त्यांच्यातला पत्रकार सरळ टिप्पणी करतोय - पाटी जरी बदलली तरी तीच मानसिकता कायम आहे...
 
प्रा. जयदेव डोळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी अभूतपूर्व असं आंदोलन झालं. आजही त्या नामांतर लढ्याच्या अनेक खुणा मराठवाड्यात शिल्लक आहेत. नामांतराचा लढा यशस्वी झाला नसता तर पुरोगामी म्हणवून घेणारा महाराष्ट्र प्रगतिपथावर पोहोचूच शकला नसता...