उपक्रम
Subcategories
-
टॉप ब्रीड - देवळी
'भारत४इंडिया.कॉम'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांच्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेचं आयोजन केलं होतं. एक प्रकारे ही जनावरांची सौंदर्य स्पर्धाच आहे. सध्याच्या हायब्रीडच्या जमान्यात आपल्या मातीतील मूळ पशुधनाला समाजासमोर आणून त्यांचं पुन्हा एकदा महत्व पटवून देणं. तसंच त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करणं, या उद्देशानं या स्पर्धा झाल्या. एकेकाळी विदर्भातील कास्तकऱ्यांची खरी देन असणारं हे गौळाऊ गोवंश आता नामशेष होत चाललाय. त्यापार्श्वभूमीवर झालेल्या या स्पर्धेनं विदर्भातील मातीत बरंच काही पेरलं. नजिकच्या काळात ते नक्कीच उगवून येईल.
-
टॉप ब्रीड - घोटी
प्रत्येक मातीची आपली म्हणून काही वैशिष्ट्यं असतात. त्यात मराठी मातीचा गंध न्याराच... इथल्या मातीत अक्षरक्ष: सोनं पिकतं. ते पिकवण्यात बळीराजाला हातभार लागतो तो ढवळ्यापवळ्याचा. डांगीपासून खिल्लारपर्यंतचे जातिवंत बैल ही मराठी मातीची शान. कालौघात आणि सध्याच्या हायब्रीडच्या जमान्यात ती नष्ट होते की काय, अशी परिस्थिती आहे. त्यामुळंच सध्याच्या पिढीला आपलं हे नक्षत्रांचं देणं समजावं, त्यांचं संगोपन व्हावं आणि ही मराठी मातीची देन वाढावी, यासाठी 'भारत4इंडिया'तर्फे 'टॉप ब्रीड' या कामधेनूच्या लेकरांच्या अभिनव स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे.
-
जागर पाण्याचा
दुष्काळग्रस्तांच्या व्यथा रोजच आपणाला माध्यमांतून वाचायला आणि पाहायला मिळतायत. मात्र, अगोदरच जागं होत थेंबन् थेंब वाचवून दुष्काळातही काहींनी पुरेसं पाणी राखलंय. त्यामुळं त्यांचं जीवन, शेत आणि जित्राबं सगळं कसं व्यवस्थित सुरू आहे. अशा बहाद्दरांच्या कथा आम्ही 'भारत4इंडिया'च्या वाचक-प्रेक्षकांपुढं ठेवतोय. त्यांनी घातलेला हा 'पाण्याचा जागर' लक्षात घेऊन कामाला लागल्यास परत कुणाला 'दुष्काळ... दुष्काळ' असं म्हणत मायबाप सरकारच्या मदतीची वाट पाहात बसावं लागणार नाही. दुष्काळ ही आपत्ती असली तरी या 'जागर पाण्याचा'मुळं तो इष्टापत्तीकडं जाणारा मार्ग ठरावा, अशी आमची अपेक्षा आहे.
-
नाशिक वाईन फेस्टिव्हल - 2013
वाईन झोनमुळं जगाच्या नकाशावर 'भारताची वाईन कॅपिटल' अशी ओळख निर्माण केलेल्या नाशिकमध्ये 2 आणि 3 मार्चला वाईन फेस्टिव्हल पार पडला. हॉटेल ज्युपिटर इथं झालेला हा 'इंडियन ग्रेप हार्वेस्ट वाईन फेस्टिव्हल-2013' वाईन शौकिनांसाठी तर पर्वणी ठरलाच, शिवाय इटली, फ्रान्स आणि स्पेन या देशांच्या धर्तीवर तो होत असल्यानं साहजिकच नाशिकच्या वाईनची आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत झाली.
-
लोकांनी लोकांसाठी...
आज 26 जानेवारी. भारताचा प्रजासत्ताक दिन. 1950मध्ये याच दिवशी भारताची राज्यघटना अमलात आली. हे प्रजासत्ताक म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. पण आज 63 वर्षे उलटून गेली तरी या देशातल्या लोकांना त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी लढावं लागतंय. जगण्यावरच झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात देशातल्या अनेक भागांत लोक एकजुटीनं लढतायत. त्या लढ्यांच्या या काही मोजक्या कथा. गणराज्य खऱ्या अर्थानं जागवणाऱ्या या लोकलढ्यांना 'भारत4इंडिया'चा सलाम...
-
तुळजापुरात 'जागर पाण्याचा'
तुळजापूर - टाटा सामजिक विज्ञान संस्थेच्या (टीस) `स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट`मध्ये `नॅशनल रुरल युथ फेस्टीव्हल' 25 ते २७ जानेवारी रोजी पार पडला. `युथ एन्ड वॉटर- मेकिंग एव्हरी ड्राप कॉऊंट` ही मुख्य थीम असलेल्या या फेस्टीव्हलचा 'भारत4इंडिया' ऑनलाईन मीडिया पार्टनर होता.
-
किसान प्रदर्शन- 2012
भारतातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असा नावलौकिक मिळवलेलं किसान कृषी प्रदर्शन पुण्यातील मोशी इथं डिसेंबरमध्ये पार पडलं. झालंय. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, औजारं, सरकारी योजना, बँका, विमा, पुस्तकं, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, चर्चा, विचारमंथन यांची नुसती रेलचेल या प्रदर्शनात होती. आपली मुळं शोधायची तर शेतात जायला हवं, गावच्या मातीत जायला हवं. हे गाव, ही माती, ही नाती पाहायला मिळतात, किसान कृषी प्रदर्शनात. म्हणूनच हे प्रदर्शन आम्ही घेऊन आलोय 'भारत4इंडिया डॉट कॉम' वर तुमच्यासाठी.