स्पेशल रिपोर्ट

महिलांनी महिलांसाठी चालवलेली बँक

ब्युरो रिपोर्ट, सातारा

महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं किती गरजेचं आहे याचा परिपाठ तिला कॉलेज जीवनात मंडईत पाहिलेल्या एका घटनेनं दिला. त्यानंतर तिनं महिलांची एकजूट करून बचत गट स्थापन केला. आज त्याच बचत गटाचं रूपांतर जिजामाता महिला सहकारी बँकेत झालंय. महिलांनी चालवलेली ही बँक आज समाजातील सर्व स्तरातील महिला आणि पुरुषांनाही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी अर्थपुरवठा करते. ही यशोगाथा साकारलीय सातारच्या वर्षा माडगूळकर यांनी.

भाजी मंडईत प्रेरणा

वर्षा माडगूळकर ही शिक्षकाची मुलगी. पण, कॉलेजमध्ये असतानाच अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची तळमळ त्यांच्यात निर्माण झाली होती. एकदा भाजी मंडईत भाजी खरेदी करताना, एक सावकार एका महिलेला हजार रुपयांची परतफेड केली नाही म्हणून बेदम मारत होता. केवऴ गरीब परस्थितीमुळे ती बिचारी प्रतिकार करत नव्हती. त्यांनी त्या सावकाराला पैसे दिले आणि तिची सुटका केली. त्यानंतर माडगूळकरांनी महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत, या हेतूनं बचत गटाची स्थापना केली. पुढं या बचत गटाची व्यापकता वाढली आणि तिचं रूपांतर बँकेत झालं. तीच ही सातारची जिजामाता महिला सहकारी बँक. 

स्वयंरोजगारासाठी कर्ज

आज या बँकेच्या माध्यमातून छोट्या छोट्या बचत गटांतील महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी कर्ज दिलं जातं. केरसुणी तयार करणं, मसाले तयार करणं, कपडे व्यापार, मेडिकल दुकान, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग इत्यादींसाठी कर्जपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे, उत्कृष्ट कामगिरीबाबत राज्य शासनाच्या वतीनं उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार सलग पाच वेळा या बँकेला मिळालाय. ही बँक आज खऱ्या अर्थानं महिला मुक्तीची साद घालतेय.

"आमच्या बॅंकेच्या सर्व सभासद महिला आहेत. या बॅंकेच्या संचालक मंडळावरही सर्व महिलाच आहेत. एक हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंतची कर्जं महिलांना व्यवसाय सुरू करण्यापासून ते व्यवसायवृद्धीसाठी बॅंकेनं दिलीत. अगदी भाजीपाला व्यवसायापासून ते औषधनिर्मिती व्यवसायासाठी आम्ही कर्जं दिली आहेत. दिलेल्या कर्जावर सुरू झालेले हे व्यवसाय आज उत्तम प्रगती करत आहेत," असं वर्षा माडगूळकरांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं.

Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.