स्पेशल रिपोर्ट

विवेक राजूरकर, औरंगाबाद
दवाखाना म्हटलं की मध्यमवर्गीयांना घाम फुटतो. डॉक्टरसाठी किती पैसे मोजावे लागणार, याला काही गणितच नसतं. अपघातात आलेलं अपंगत्व, लकवा या आजारांवर उपचारासोबतच त्यासाठी लागणाऱ्या अपंग साहित्याचा खर्चही अमाप येतो. गरिबांना तर या गोष्टी शक्यच होत नाहीत. त्यामुळंच गरिबांना अपंग साहित्यांचं मोफट वाटप करणारं औरंगाबादचं 'आसरा रुग्णसेवा केंद्र' म्हणजे गरीब अपंगांसाठी एक वरदानच ठरलंय.
 
ब्युरो रिपोर्ट, सावेडी, नगर
एका कोंबडीमागं मिळतात तब्बल 5,000 रुपये आणि एका अंड्याचा भाव आहे तब्बल 75 रुपये... हा काही कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या कोंबडीचा भाव नाही, तर हा दर मिळतोय 'कडकनाथ' जातीच्या कोंबडीच्या वाणाला! मूळ मध्य प्रदेशातील आदिवासी भागातील हे वाण आता महाराष्ट्राच्या मातीतही रुजायला लागलंय. त्याचं मार्केटींगही आता चांगलं होतंय. ठिकठिकाणच्या धाब्यांवर कडकनाथ चिकन मिळेल, असा बोर्ड वाचायला मिळतो. त्यामुळं बऱ्याच जणांना 'कडकनाथ' ही काय भानगड, असा प्रश्न पडतो. आपण जाणून घेऊया...
 
यशवंत यादव, अंकोली, सोलापूर
शहरं ही 'टायटॅनिक' आहेत. ती कधी बुडतील ते सांगता येत नाही. काही दिवसांनी शहरात खाण्यापिण्याचीसुद्धा मारामार होईल. त्यासाठी आताच ते बुडणारं जहाज सोडा आणि शाश्वत जगायला खेड्यात या. हे विचार कुणाला पटोत न पटोत. सोलापुरातल्या अंकोलीचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अरुण देशपांडे पोटतिडकीनं आणि सातत्यानं हे विचार मांडतायत. तुमच्या शिक्षणाचा, ज्ञानाचा वापर गावांचा विकास करण्यासाठी करा, असं आवाहन ते तरुणांना करतायत.  
 
राहुल विळदकर, अहमदनगर
घरटी एक माणूस जनावरांसाठी छावणीत अडकलेला. गेल्या आषाढापासून गुरांसाठी ते चारा छावणीत मुक्काम ठेवून आहेत. त्यांचे सणवार सगळे छावणीतच होतात. तब्बल 200च्या आसपास चारा छावण्या असलेल्या नगर जिल्ह्यातील हे चित्र. नगर तालुक्यातल्या राळेगण म्हसोबाची छावणीही त्यापैकीच एक! छावणीत जनावरांना चारापाणी व्यवस्थित मिळतो. छावणी नसती तर आमची गुरं मरून गेली असती, असं इथले शेतकरी सांगतात. चारा छावणीला का दावणीला देणं योग्य होईल, यांसारखे वाद होत असले तरी दुष्काळात पशुधन जगवायचं असेल तर छावण्यांना पर्याय नाही, हेच यातून स्पष्ट होतंय. जनावरांची सोय
 
प्रवीण मनोहर, अमरावती
कधी गैरव्यवहारांमुळं, अळ्या सापडल्यानं तर कधी तांदळाची पोती शिक्षकांनीच लंपास केल्यामुळं शालेय पोषण आहार योजना चर्चेत राहिलीय. यातील खिचडीनं विद्यार्थ्यांचं पोषण किती झालं, हा प्रश्न अनुत्तरित आहे. तरीही सुरू असणारी ही योजना आता निधीअभावी अडचणीत सापडल्याचं चित्र अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळतंय. केंद्र सरकारनं राज्याला पैसे दिलेत. राज्य सरकारनंही जिल्हा परिषदांना निधीचं वाटप केलंय. पण योजनेत प्रत्यक्ष राबणाऱ्या हातांना काही दाम मिळालेला नाही. वेळ पडल्यास आम्ही सामग्री कशी आणायची, असा प्रश्न शिक्षक करतायत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळं ओढवलेली ही परिस्थिती राज्यभरात सर्वत्र कमी-जास्त
 
शशिकांत कोरे, महाबळेश्वर, सातारा
'बाळा जेवून घे' आईचा मुलामागचा हा नेहमीचा धोशा. त्यावर मला नाय खायचं म्हणून मुलांचंही वाक्य ठरलेलं... मग जाम ब्रेड, जाम पोळीचं नाव काढलं की बाळ जेवायला लगेच तयार, असंच चित्र प्रत्येक घरामध्ये बघायला मिळतं. चिमुरड्यांना आकर्षित करणारा हा जाम बनतो कसा, याचं औत्सुक्य सर्वांनाच असतं. तर चला मग आमच्याबरोबर महाबळेश्वरला. इथला मधुसागर हा सहकारी तत्वावरचा राज्यातल्या पहिला फळप्रक्रिया उद्योग आहे. 1971 मध्ये स्थापन झालेल्या हा फळप्रक्रिया उद्योग काळाप्रमाण बदलत आता चांगलाच भरारी घेतोय.
 
शशिकांत कोरे, सातारा
दुष्काळी परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय अधिक तारणहार ठरू शकतो. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील वाई फाट्यानजीकच्या जोशीविहीर इथल्या हबीब सय्यद फरास या युवकानं  कोंबडीपालनाचा यशस्वी व्यवसाय केलाय. ब्रॉयलर कोंबड्यांऐवजी देशी कोंबड्याच त्यांनी पाळल्यात. आज त्यांच्या या देशी कोंबड्यांच्या पोल्ट्रीत हजारभर कोंबड्या असून दररोज 500 अंडी मिळालीच पाहिजेत, या दृष्टीनं ते नियोजन करतात. याशिवाय अंड्यांची विक्री करण्यासाठी ते बाह्या सरसावून तयार असतात. यामुळं आणखी दोन पैसे जास्त मिळतात, असा त्यांचा अनुभव आहे. देशी कोंबड्यांचा सातारा जिल्ह्यातील हा एकमेव प्रकल्प आहे.   
 
यशवंत यादव, सोलापूर
राज्य दुष्काळानं होरपळतंय. दुष्काळग्रस्तांना चारापाणी देण्याचं काम सरकार करतंय, तरीही दुष्काळग्रस्तांच्या हलाखीत दिवसेंदिवस भरच पडतेय. ही वस्तुस्थिती एका बाजूला असताना दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यातील शिवणे येथील सुरेश रामहरी गायकवाड हे मात्र मजेत शेती करण्यात गुंग आहेत. माळरानाच्या ओसाड जमिनीवर त्यांनी द्राक्ष, कलिंगड, खरबूज, झेंडू, केळी आणि उसाचंही पीकही घेतलंय. तुम्ही म्हणालं हे कसं काय बाबा? अहो, त्यांनी माळावर तब्बल तीन हजार कोटी लिटरचं शेततळं उभारून ही जादू घडवलीय. या तळ्यातल्या पाण्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करून गायकवाड बहुपीक पद्दत राबवतायत. हे शेततळं
 
शशिकांत कोरे, सातारा
संघटीत पातळीवर नियोजनबद्ध काम करण्यात जगात मधमाशांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यामुळंच व्यवस्थापनाचं उत्तम मॉडेल म्हणूनही मधमाशांकडं पाहिलं जातं. त्यांच्यामुळं जो मध मिळतो तो पूजेपासून औषधापर्यंत सर्वत्र उपयोगी असतो. त्यामुळं मधमाशीपालन हा चांगला उद्योग म्हणून आकाराला येतोय. थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमधील विपुल वनसंपदेमुळं हा व्यवसाय इथं चांगलाच बहरलाय. आजमितीला राज्यातील एकूण मधउत्पादनापैकी 50 टक्के उत्पादन एकट्या महाबळेश्वरात होतं. त्यात महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी सोसायटीचा सिंहाचा वाटा आहे.
 
मुश्ताक खान, कुडावळे, रत्नागिरी
रत्नागिरी - कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि पोफळीच्या बागेत ससा, देशी कोंबड्या आणि शेळी पालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवलाय कुडावळेतील दीपक देसाई यांनी. तसं पाहिलं तर हे शेतीपूरक व्यवसाय. पण देसाईंनी हे व्यवसाय मुख्य करून त्याला शेती ही जोडधंदा म्हणून केलीय. त्यांच्या ग्रामलक्ष्मी फार्मला शेतकरी आणि पर्यटकही मोठ्या संख्येनं भेट देतायत. प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातील बागायती पट्ट्यांमध्ये दिसणारे हे शेतीपूरक व्यवसाय कोकणातील बागांमध्येही रुजू शकतात हेच यावरून स्पष्ट झालंय.