स्पेशल रिपोर्ट

विवेक राजूरकर, औरंगाबाद
भीषण दुष्काळाची झळ औरंगाबाद शहरालाही बसत असून आठवड्यातून दोनच दिवस पाणीपुरवठा होतोय. सर्वच जण काटकसरीनं पाणी वापरतायत. त्यातच ज्ञानेश्वर बिरारे यांनी घरच्या घरी पाण्याचा पुनर्वापर करणारं तंत्र विकसित केलंय. आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी वापरलेलं पाणी ते पुन्हा वापरात आणतायत. यासाठी त्यांनी घरच्या घरी सहज कुणालाही वापरता येतील अशी साधनं उपयोगात आणलीत. याचं अनुकरण इतरांनीही केल्यास टंचाईत त्यांना दिलासा मिळू शकतो, एवढं नक्की!
 
मुश्ताक खान, रत्नागिरी
जे न देखे रवी, ते देखे कवी...असं म्हणतात. कविता ही जशी जळजळीत वास्तव मांडणारी असते, तशीच ती भविष्याचा वेध घेणारीही असते. कविमन आणि कविदृष्टी यामुळं समाजाचं भरणपोषणच होत असतं. निसर्गसौंदर्यानं पुरेपूर नटलेल्या कोकणात केशवसुत यांच्यासारखे कविवर्य होऊन गेले. आज तीच कोकणची परंपरा दादा मडकईकर यांच्यासारखे कवी पुढं चालवतायत. प्रत्येकाचा आपला म्हणून थाटमाट आहे. त्यामुळंच कवितांनी कोकणच्या सौंदर्यात मोलाची भर घातलीय, एवढं खरं!
 
मुश्ताक खान, दापोली, रत्नागिरी
नारळाचं उंचच उंच आकाशाचा वेध घेत जाणारं झाड पाहिलं की, आपले डोळे गरगरतात. उंच आभाळात लटकलेले नारळ काढणारा एखादा माणूस पाहिला की आपल्या काळजाचे ठोके चुकतात. अक्षरश: जीव तळहातावर घेऊन करण्याचंच हे काम. पण माडावर चढण्याचं हे महाकठीण काम आता सोपं झालंय. कोईमतूरच्या कृषी विद्यापीठानं माडावर सुलभ चढण्याचं यंत्रच विकसित केलंय. यामुळं आता माडावर चढणाऱ्यांच्या टंचाईवरही मात करता येणार आहे.
 
ब्युरो रिपोर्ट, गोंदिया
एखादा चांगला इंजिनीयर नोकरी-व्यवसायातून वर्षाकाठी सहा ते सात लाख सहज मिळवतो. पण गोंदिया जिल्ह्यातल्या चुटिया गावातील ऑटोमोबाईल इंजिनीयरनं व्यवसाय म्हणून शेतीची निवड केली आणि दोन महिन्यात आठ लाखांचं पॅकेज कमावण्याची किमयाही केली. ऋषी टेंभरे या युवकानं आपल्या चार एकर शेतीतून पंधरा दिवसांत काकडीचं ३०० क्विंटल उत्पादन घेतलंय आणि शेतीकडं युवा वर्ग आकर्षित होत नाही, या म्हणण्याला फाटा दिलाय. प्रामुख्यानं धानाची शेती करणाऱ्या गोंदियात त्यानं पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर काकडीचं उत्पादन घेत तिथल्या शेतकऱ्यांना वेगळा आदर्शच घालून दिला.
 
मुश्ताक खान, कुडाळ, सिंधुदुर्ग
मोठ्या जिद्दीनं शारीरिक अपंगत्वावर मात करून भरारी घेणाऱ्या व्यक्तींना पाहून धडधाकट माणसांनाही जगण्याचं बळ मिळतं. कबड्डी खेळताना पाठीच्या मणक्याला मार बसला आणि वयाच्या सोळाव्या वर्षी तिला कायमचं अपंगत्व आलं. परंतु त्यामुळं खचून न जाता, नव्या उमेदीनं उभारी घेत तिनं स्वत:बरोबर इतराचंही आयुष्य उजळवलं. ही कहाणी आहे जिद्दीची आणि प्रेरणेची. ही कहाणी आहे नसीमा हुरजूक यांची. कोकणातल्या अत्यंत दुर्गम भागात अपंगांसाठी त्यांनी स्वप्ननगरी वसवलीय.
 
शशिकांत कोरे, सातारा
दुष्काळग्रस्त भागात प्यायला पाणी नाही, तर शेतीला कुठं मिळणार? हाताला काम नाही, घरात पैका नाही, म्हणून गडीमाणूस कामाच्या शोधात वणवण फिरतोय. तर दुसरीकडं पोटापाण्याच्या शोधात लोक स्थलांतर करू लागलेत. अशा बिकट परिस्थितीत साताऱ्यातल्या महिलांच्या बचत गटांनी या महिलांना कर्तेपण देऊन त्यांचं घर सावरण्यास मदतच केलीय. यामुळं बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आपली घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास हातभार तर लागलाच आहे, शिवाय दुष्काळाच्या चटक्यांपासून त्यांनी आपलं घरही सावरलंय.
 
ब्युरो रिपोर्ट, जव्हार, ठाणे
  'प्रगती प्रतिष्ठान'ची स्थापनादुर्गम भागातील आदिवासींसाठी पहिल्यांदा गरज होती, ती प्राथमिक आरोग्य सेवांची. सुनंदाताईंनी त्यासाठी 1980 मध्ये प्रगती प्रतिष्ठानची स्थापना करून जव्हार परिसरातील आदिवासींच्या आरोग्यासाठी काम सुरू केलं. या कामानं चांगली गती घेतल्यानंतर त्यांनी आदिवासी मुलांच्या शिक्षणाकडं लक्ष केंद्रित केलं. जव्हारमधील मुलांना शिक्षणासाठी दूरवर जायला लागू नये, त्यांची स्थानिक ठिकाणीच सोय व्हावी, या उद्देशानं त्यांनी 10वीपर्यंतची शाळा सुरू केली.   कर्णबधिरांसाठीही शाळा शिक्षण क्षेत्रात काम करताना त्यांना कर्णबधिर मुलांकडं लक्ष देण्याची गरज तीव्रतेनं जाणवू
 
शशिकांत कोरे, सातारा
कोण म्हणतं, आजच्या तरुणाईला शेतात राबायला आवडतं नाही? आधुनिक शेती करण्यासाठी लोकांचं पाठबळ मिळत असेल तर तरूणाई डोकं वापरुन राबते आणि सोनं पिकवते. आजच्या धूमच्या जमान्यात कॉलेज शिकत असताना पाटण जवळच्या मल्हारपेठ इथल्या रोहित रावजी पाटील या 21 वर्षाच्या तरुणानं ग्रीन हाऊस साकारलं. त्यात जरबेरा फुलांचं उत्पादनं घेतलं. सुमारे 16 लाख रुपये भांडवली गुंतवणूक करुन केलेल्या आधुनिक शेतीतून आज त्याला दर महिना सुमारे 80 हजारांचं उत्पादन मिळतं. पाच वर्षाचा बहार लक्षात घेता 48 लाखांपर्यत उत्पन्न मिळू शकतं. काही नाही तर
 
शशिकांत कोरे, सातारा
आरोग्याच्या कारणास्तव द्राक्षांनंतर युरोपनं आता भारतीय भेंडीच्या एक्सपोर्टवर बंदी आणलीय. भेंडीमधील रासायनिक खतांचा अंश आरोग्याला हानिकारक ठरणारा नाही, असं प्रमाणपत्र (हेल्थ सर्टिफिकेट) देणं त्यांनी बंधनकारक केलंय. त्यामुळं पुणे, सातारा, सांगली, ठाणे जिल्ह्यांतील निर्यातक्षम भेंडी उत्पादन करणाऱ्या सुमारे 700 हून अधिक शेतकऱ्यांचं धाबं दणाणलंय. एक्सपोर्ट भेंडीला प्रती किलो 30 रुपये भाव मिळत होता. तीच भेंडी आता इथं नऊ रुपये दरानं विकावी लागतेय. त्यामुळं अवसान गळलेल्या शेतकऱ्यांनी 'हा प्रश्न तातडीनं सोडवा, नाहीतर आम्हाला एंड्रेल द्या,' अशा निर्वाणीच्या भाषेत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
 
विवेक राजूरकर, औरंगाबाद
'स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद' हे रयत शिक्षण संस्थेचं ब्रीदवाक्य. 'रयत'चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वप्रथम 'कमवा आणि शिका' हा मूलमंत्र दिला. त्यानंतर ग्रामीण भागातील तळागाळात शिक्षणाचा प्रसार झाला. अनुभवातून साकार झालेली 'कमवा आणि शिका' ही योजना आज जगात सर्वत्रच राबवली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठही त्याला अपवाद नाही. गेल्या ३५ वर्षांपासून विद्यापीठात हा उपक्रम राबवला जातो. आजमितीस या योजनेचा लाभ जवळपास सात हजार विद्यार्थांना मिळाला असून त्यातील बहुतांश जण समाजात मोठ्या हुद्द्यांवर काम करत आहेत. अशा या