स्पेशल रिपोर्ट

मुश्ताक खान, रत्नागिरी
कोकणात सध्या हापूसचा सीझन आहे. ''आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो,'' असं कोकणचं वर्णन केलं जातं. कोकणी माणसाला राजा बनवणाऱ्या आंब्याच्या विविध जाती डॉ. बाळासाहेब सावंत यांनी कोकण कृषी विद्यापीठानं विकसित केल्यात. पण या आंब्यामध्ये सिंधू ही जात जरा हटके आहे. कारण ती आहे बिनबाट्याची म्हणजेच कोईविरहित आणि त्याचा शोध लावलाय कोकणातल्या लाल मातीत जन्मलेल्या डॉ. मुराड बुरोंडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून इचलकरंजीच्या ‘फाय फाऊंडेशन’चा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळालाय.
 
विवेक राजूरकर, औरंगाबाद
अतिथी देवो भव! ही आपली संस्कृती. त्यामुळं अनाहूतपणं आलेल्या पाहुण्याचंसुद्धा आपण स्वागतच करतो. यंदाचा दुष्काळ हा असाच अनाहूत पाहुणा बनून आलाय. हवामान खात्यानं आता चांगल्या मान्सूनची वर्दी दिली असली, तरी अजून महिनाभर या पाहुण्याची सरबराई करावी लागणार आहे. त्याला बळ देण्याचं आगळंवेगळं काम औरंगाबादचे श्याम खांबेकर करतायत. संगीतकार, गीतकार असलेल्या खांबेकरांनी पाण्याचं महत्त्व सांगणारी गाणी तयार केली असून स्वखर्चानं ते त्याचा प्रचार करतात. या पाण्याच्या जागरातून दुष्काळाची आपत्ती इष्टापत्तीत बदलण्यासाठी बळ मिळेल, अशी त्यांना खात्री आहे.
 
मुश्ताक खान, केळशी, रत्नागिरी
शेतकरी आणि मार्केटिंग हे चित्र दिसणं तसं दुर्मिळच, पण आता शेतकरी हळूहळू मार्केटिंगकडं वळू लागलाय. आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळं शाळा, कॉलेजना सुट्ट्या लागल्या आहेत आणि कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. हीच संधी कॅश करत कोकणातले शेतकरी पुढं सरसावलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी इथल्या अशाच काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समूह शेतीत कलिंगड आणि स्वीटकॉर्नची (अमेरिकन मका) लागवड केलीय. त्याचं उत्पादन नियोजनाप्रमाणं आता ऐन पर्यटनाच्या मोसमात सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना एरवीपेक्षा चांगला नफा मिळतोय.
 
ब्युरो रिपोर्ट, महाबळेश्वर
महाबळेश्वरला महाराष्ट्राचं काश्मीर म्हणतात. जावळीच्या खोऱ्यातील या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक येतात. किल्ले प्रतापगडाला भेट दिल्याशिवाय महाबळेश्वर दर्शन पूर्णच होत नाही.  प्रतापगड पाहताना छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा डोळ्यासमोर उभी राहते आणि ऊर अभिमानानं भरून येतो. याच ऐतिहासिक प्रतापगडाच्या पायथ्याला आता भर पडलीय ती शिवकालीन खेड्याची. शिवकाळातील गावगाडा कसा होता, याचं हुबेहूब दर्शन इथं घडतं. त्यामुळं प्रतापगडाची सफर करताना या शिवकालीन खेड्याला आवर्जून भेट द्यायलाच हवी.
 
मुश्ताक खान, कुडावळे, रत्नागिरी
गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. शोध काय फक्त मोठमोठे शास्त्रज्ञच लावतात असं नाही. दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी सामान्य माणसं धडपडत असतात. त्यातून कोणाची तरी प्रतिभा भरारी घेते आणि जन्माला येतात नावीन्यपूर्ण उपकरणं. कोकणासारख्या सर्वाधिक गवत उत्पादित होणाऱ्या प्रदेशात असंच आगळंवेगळं गवत बांधणी यंत्र आकाराला आलंय. अल्प खर्चात तयार होणाऱ्या या यंत्रामुळं अडीच पट जादा गवत बांधणीचं काम होतंय. विशेष म्हणजे, अवघ्या दोन हजार रुपयात हे यंत्र कोणीही तयार करू शकतो. यामुळं आता गवताच्या गंजी लावण्याचं काम खूपच सोपं
 
मुश्ताक खान, रत्नागिरी
तरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण दापोलीत गेलं. आपल्या बुद्धिसामर्थ्यानं जगभर ठसा उमटवलेल्या या महामानवाच्या शिक्षणाची मुहूर्तमेढही दापोलीतच रोवली गेली. ते ज्या घरात राहत होते त्या घराचंही इथं जतन करण्यात आलंय. त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून त्यांचे अनुयायी इथं येत असतात. 
 
प्रवीण मनोहर
अमरावती- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासानं, त्यांच्या विचारांनी किती तरी दुर्लक्षित, उपेक्षित आयुष्यांचं सोनं झालं. त्यांचं अवघं जीवन उजळून निघालं. अशा अनेक भाग्यवंतांपैकी एक आहेत, अमरावतीतल्या नया अकोला गावातले पंजाबराव खोब्रागडे. पंजाबरावांना बाबासाहेबांचा प्रत्यक्ष सहवास मिळाला नाही. पण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण यात्रेचा साक्षीदार होण्याचं भाग्य त्यांना लाभलं.
 
मुश्ताक खान, गुहागर, रत्नागिरी
कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात त्या आंबा, काजू, फणस, पोफळीच्या बागा. पण आता कोकणातला शेतकरीही आधुनिक शेतीकडं वळू लागलाय. गुहागरच्या गजानन पवार यांनी आंबा, काजू , माड यांच्यात आंतरपीक म्हणून चक्क पपईची लागवड केलीय. आपल्या चार एकर शेतीत पपईचं आंतरपीक घेण्याचा प्रयोग यशस्वी करून त्यांनी चांगला नफाही कमावलाय. ही त्यांची यशोगाथा पाहण्यासाठी अवघ्या कोकणातून शेतकरी येतात आणि आपणही असा प्रयोग करून बघू, असा संकल्प करूनच इथून निघतात. त्यामुळं नजीकच्या काळात कोकणात पपईचं भरघोस उत्पादन होण्याचीच ही नांदी म्हणावी लागेल.
 
ब्युरो रिपोर्ट, चिचटोला, गोंदिया
उन्हाळ्याच्या काहिलीत तहान भागवायची म्हटलं तर मस्त थंडगार लालचुटूक कलिंगड खाण्याची मजा काही औरच असते. याच कलिंगडांनी केवळ तहान न भागवता सडक अर्जुनी तालुक्यातील चिचटोला गावातील टिकाराम गहाणे या प्रयोगशील शेतकऱ्याला धनवानही बनवलंय.  त्यांची ही कलिंगडाची शेती फळाला येऊन भरघोस उत्पन्नही देऊ लागलीय. त्यांचा आदर्श घेत तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनीही २५० हेक्टरवर कलिंगडाची लागवड केलीय. राज्यभरातून या कलिंगडांना चांगली मागणी तर आहेच, याशिवाय गोंदियाची ही कलिंगडं आता परदेशाचीही तहान भागवण्यास रवाना झाली आहेत.
 
मुश्ताक खान, रत्नागिरी
विकासाच्या नावाखाली नष्ट केली जाणारी वनराई, नियोजित नवनवीन प्रकल्पांसाठी हिसकावल्या जाणाऱ्या जमिनी यामुळं कोकणातील अल्पभूधारक गरीब शेतकरी अगोदरच पिचलेला आहे. त्यात आता भर पडलीय वणव्यांची. वणव्यांमुळं आंबा, काजू आणि सागाच्या हजारो हेक्टर बागा खाक झाल्यात. सरकार दरबारी मात्र वणवे मानवनिर्मित असल्याचं कारण पुढं करून नुकसानभरपाई दिली जात नाही. वणवे लागतायत, बागा खाक होतायत, भरपाई काही मिळत नाही... अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा आता संयम सुटत चालला असून, वणव्यांमुळं नुकसान होणाऱ्या फळबागांना भरपाई द्या, असा नारा इथं घुमू लागलाय.