स्पेशल रिपोर्ट

डॉ. शैला वाघ, आरोग्य तज्ज्ञ
जीएमओ म्हणजेच जेनेटिकली मोडिफाईड ऑर्गेनिझम याचाच अर्थ असा की जनुकीय बदल केलेला जीव. प्रत्येक जीव जातीचे गुणधर्म त्यांच्या जनुकांवर अवलंबून असतात. ही विशिष्ट जुनके त्या त्या वनस्पती अथवा प्राणी किंवा जंतुंच्या पेशीत स्थित असतात.
 
रोहिणी गोसावी, वाशी, नवी मुंबई
आभाळात मान्सूनचे ढग जमा होऊ लागलेत. घामाने निथळत सगळे पावसाची आतुरतेनं वाट पाहतायत. या उन्हाळ्यानं अगदी घाम काढला असला तरी एका गोष्टीनं मात्र सर्वांचंच तनमन तृप्त केलं. ते म्हणजे मधुर आंबे आणि त्यांचा पिवळाधम्म आमरस! याचा पुरावा म्हणजे नवी मुंबईतल्या वाशी फळ मार्केटनं या सीझनमध्ये तब्बल 300 कोटींचे आंबे विकलेत. या आंब्यांचं गिऱ्हाईक फक्त मुंबईकरच नव्हेत बरं का. तर देश आणि परदेशातही आपल्या या फळांच्या राजानं बाजी मारलीय. त्यामुळं सरत्या उन्हाळ्यासोबत निरोप घेणाऱ्या आंब्याच्या सीझनला 'पुढच्या वर्षी लवकर ये...' अशी
 
ब्युरो रिपोर्ट, वाशीम
विदर्भातील शेती ही पावसाच्या भरवशावर पिकते. त्यामुळं कपाशी, सोयाबीनसारखी पारंपारिक पिकं घेण्यावरच इथल्या शेतकऱ्यांचा भर असतो. निसर्गानं साथ दिली तर ठीक नाहीतर वाजले बारा... अशा अनिश्चिततेची टांगती तलवार बळीराजाच्या मानेवर नेहमीच असते. त्यामुळंच चाकोरीबाहेर जाऊन वेगळी पिकं घेणारे शेतकरी हे इथल्या बळीराजाचे आयकॉ़न्स ठरतात. वाशीम जिल्ह्यातील पिंप्री इथले देवीदास राऊत-पाटील त्यापैकीच एक. ६५व्या वर्षी या बहाद्दरानं २५ एकर शेतीत पपईची लागवड केली आणि ५० लाखांचं उत्पन्न मिळवलं. त्यांचा हा नावीन्यपूर्ण प्रयोग पाहण्यासाठी एवढे शेतकरी येतायत की, त्यांची शेती म्हणजे आता पर्यटन
 
ब्युरो रिपोर्ट, वाशीम
विविध जातींची आंब्याची झाडं आहेत, हे आपणाला माहितीच आहे. पण आंब्याच्या एकाच झाडाला ५१ प्रकारच्या विविध जातींचे आंबे लागलेत.  हा चमत्कार नव्हे बरं का! वाशीमच्या रवी मारशटीवार या प्रयोगशील शेतकऱ्यानं आपल्या वडिलोपार्जित शेतीमधील एका ५० वर्षांच्या जुन्या गावरान आंब्याच्या झाडावर विविध दुर्मिळ, स्वादिष्ट आणि उच्च दर्जाच्या आंब्यांची कलमं केली आणि ही किमया घडली. आता पंचक्रोशीत आंब्याची बँक म्हणून ओळखलं जाणारं हे झाड विविध जातींच्या आंब्यांनी बहरलंय.
 
रोहिणी गोसावी, जांभूळगाव, ठाणे
दूर डोंगरकुशीत एक टुमदार गाव वसलंय... गावाशेजारी नदी वाहते... नदीकाठी आहेत उंचच उंच जांभळाची झाडं... या झाडांना लटकलीत टप्पोरी, रसाळ जांभळं... या जांभळांना गावकरी पोटच्या लेकराप्रमाणं जपतात. आणि ही झाडंही अख्ख्या गावाचा सांभाळ करतात..! ही काही 'चांदोबा'मधली किंवा आजोबांनी नातवाला सांगितलेली गोष्ट नाही बरं. ही आहे खरीखुरी कहाणी. ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील बहाडोली गावची. नदीकाठची ही बाराशे जांभळांची झाडं गावातल्या तब्बल साडेतीनशे कुटुंबांचा जगण्याचा आधार बनलीत. हे 'जांभूळआख्यान' खरोखर ऐकण्यासारखं आहे...  
 
राहुल रणसुभे, वाशी, नवी मुंबई
आपल्या दारात येणाऱ्या ताज्या भाज्या (माळवं) कोठून येतात, त्यांचे दर कसे ठरतात, याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. याचबरोबर भाजीपाल्यांचे दर काय आहेत, तसंच आपल्या भाजीपाल्याला आज किती दर मिळाला, यासाठी शेतकऱ्यांचंही लक्ष असतं भाजीपाला मार्केटवर! वाशीतील भाजीपाला मार्केट तर अफलातून आहे. देशभरातून विविध प्रकारचा भाजीपाला इथं येतो. मुंबईतील नाक्यानाक्यावर, हातगाड्यांवरून विकल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचा पुरवठा हा इथूनच होतो. मध्यरात्रीच हा बाजार सुरू होतो आणि सकाळी संपतोही. सर्वसामान्य माणूस साखरझोपेत असताना हा बाजार शिजत असतो.
 
राहुल रणसुभे, मुंबई
आधुनिक भारतीय दृश्यकलेच्या इतिहासात महाराष्ट्राच्या चित्र-शिल्प परंपरेचं योगदान अभूतपूर्व आहे. त्याची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशानं 'शिल्पकार चरित्रकोश' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला येतोय. यातील सहाव्या दृश्यकला खंडाचं प्रकाशन मुंबईत झालं. या चरित्रकोशात महाराष्ट्रातील तीनशेहून अधिक चित्रकार, शिल्पकार, उपयोजित कलाकार, तसंच व्यंगचित्रकारांचा समावेश आहे. त्यांच्या अभूतपूर्व कलाकृतींसाठी ७२ पानांचा चित्र विभाग या खंडात देण्यात आलाय. त्यात यापूर्वी प्रकाशित न झालेली दुर्मिळ चित्रं आहेत. त्यामुळंच हा खंड म्हणजे महाराष्ट्राच्या कलेचा दस्तऐवजच आहे.
 
सुमित बागुल, मुंबई
महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा झेंडा आज अटकेपारच नव्हे तर सातासमुद्रापार फडफडतोय. 'गर्जतो मराठी' या यशोगाथांमधून 'भारत4इंडियानं' देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या महाराष्ट्रवीरांच्या कामगिरीचा आढावा घेतलाय. त्यात अग्रभागी आहेत, गोवर्धन डेअरीचे देवेंद्र शहा. वर्गीस कुरियन यांच्या अथक प्रयत्नानंतर साकारलेल्या धवलक्रांतीनंतर आता शहा यांनी 'गो रिव्हॉल्युशन'ची हाक दिलीय. ही क्रांती आहे, देशातले दुधाचे पदार्थ जगभर पोचवण्याची. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण आणि संपन्न करण्याची...
 
धनंजय बुगडे, मुंबई
भारताला ऑलिंपिकमध्ये पहिलं पदक मिळालं ते कुस्तीत, आणि ते मिळवून दिलं कृष्णाकाठच्या खाशाबा जाधव यांनी. आता काळ बदलला असला तरी  मुंबईमधील कांदिवलीतील साई क्रीडा संकुलातील ऑलिंपिकपटू नरसिंग यादवनं राज्याचं आणि देशाचंही नाव कुस्तीत उज्ज्वल केलंय. हा पठ्ठ्या कुस्तीत भारताचं नाव आणखी उज्ज्वल करील, असा आशावाद सर्वांनाच वाटतोय.
 
राहुल रणसुभे, मुंबई
कुठल्याही राष्ट्राचा इतिहास कलेतूनच अधिक स्पष्टपणं जाणून घेता येतो. महाराष्ट्राला चित्रकलेचा सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. या विस्तीर्ण कालखंडात वेळोवेळी झालेल्या स्थित्यंतरांमुळं त्यात बदल होत गेले. या सर्व कालखंडात मऱ्हाटी मातीतील चित्रकारांनी आपापल्या परीनं चित्रकलेला वेगळं परिमाण देऊन ती समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. अलीकडचे एम. एफ. हुसेन यांच्यापासून ते वासुदेव कामतांसारखे ख्यातकीर्त चित्रकार याच कडीतील. सरकारपासून समाजापर्यंत सर्वच जण चित्रकलेबाबत उदासीन असतानाही वासुदेव कामतांसारखे कलाकार जे प्रयत्न करतायत त्यातून भविष्यात मऱ्हाटी मातीतील चित्रकलेचा कॅनव्हास जगाच्या पाठीवर बहरेल, अशी आशा