स्पेशल रिपोर्ट

रोहिणी गोसावी, मुंबई
भाजीविक्रेत्यांच्या मनमानीला कारभाराला आळा बसून मुंबईतील गृहिणींना रास्त भावात ताजा भाजीपाला मिळावा यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं (एपीएमसी) शहरात स्वस्त भाजीपाला केंद्रं सुरु केलीत. थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करुन बाजार समितीच्या केंद्रांमार्फत तो ग्राहकांना वितरीत केला जातो. यामुळं दुप्पट, तिप्पट जादा दर आकारुन विकल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर तर आटोक्यात आलेच. शिवाय दररोज ताजी, स्वच्छ भाजी मुंबईकरांना मिळू लागलीय. या योजनेला मिळालेलं यश लक्षात घेऊन पुणे आणि नंतर मोठ्या शहरांतून ही योजना राबवण्याचा संकल्प राज्याच्या कृषी, पणन खात्यानं केलाय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
कांद्यानं भाव खाल्ल्यानं इंडियात आरडाओरड सुरु झालीय. कोण काय तर कोण काय म्हणतंय. नाकानं कांदं सोलण्याचा इंडियातला हा प्रकार भारतीय समाज मोठ्या मजेनं बघतोय. साठेखोरी नाही, नफेखोरी नाही, व्यापाऱ्यांचा, हात नाही. अर्थशास्त्राच्या नियमानुसार मागणी आणि पुरवठ्याचं तंत्र बिघडल्यानं भाव वाढलेत. अवकाळी पावसामुळं खरीपाचा कांदा अजून बाजारात आलेला नाही. दिवाळीनंतर तो आला की येतील भाव आटोक्यात. तोपर्यंत ही भाववाढ शेतकऱ्यांना बोनस समजायला काय हरकत आहे? कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी होऊन जाऊ दे...असाच सूर शेतकरी, व्यापारी वर्गातून पाहायला मिळतोय.
 
ब्युरो रिपोर्ट, लातुर
जुनी म्हण होती...पहिली बेटी अन् धनाची पेटी. पण जमाना बदलला. 'हम दो हमारे दो' वरुन आता हमारा एकच! वंशाला दिवा नको का? मग एकच पाहिजे आणि मुलगाच पाहिजे. त्यासाठी मग गर्भात असतानाच मुली मारुन टाकण्याचं आधुनिक तंत्र आलं. मलींची संख्या चिंताजनक घटल्यानं जाग आलेल्या सरकारनं विविध उपाययोजना केल्या. मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी योजना आल्या. यात एक पाऊल पुढं टाकत उदगीरच्या बाजार समितीनं सुशीलादेवी देशमुख बालिका बचाव ही अभिनव योजना सुरु केलीये. सहकारी संस्थेनं स्वयंस्फूर्तीनं सुरु केलेला अशाप्रकारचा हा राज्यातील पहिलाच
 
ब्युरो रिपोर्ट, वर्धा
वर्धा जिल्ह्यातील हळदगावच्या लता पाटी यांची ही कथा. पतीच्या अकाली निधनानंतरही ती खचली नाही. मोठ्या धीरानं तिनं पदर खोचला आणि ती मातीत राबू लागली. घरची 35 एकर शेती. काही क्षेत्रात फळबाग लागवड झाली होती. तिनं शासकीय योजनांचा फायदा घेत आणखी फळबागा फुलवल्या. आजमितीली सीताफळ, चिकू, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबीच्या बहरल्या असून बक्कळ पैका मिळू लागलाय. त्यातूनच ती आता भक्कमपणे उभी राहिलीय.
 
मुश्ताक खान, रामपूर, चिपळूण
कोकण आता पूर्वीसारखो राह्यलो नाय...पुण्या, मुंबईतसून येणाऱ्या मनीऑर्डरकडं डोळं लावान आता इथली माणसा बसनत नाय. मातयेत राबताना नवनवं प्रयोगही कराक लागलीत. माड, काजी, आंब्याचं बागा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात आता चांगलोच पैसो खुळखुळाक लागलो आसा. बागायती नसली तरी मालामाल करणारी माती आहे, याची पक्की खात्री आता शेतकऱ्यांना झालीय. चिपळूणच्या ज्योती रावराणे यांनी आपल्या 10 गुंठे शेतीत मिरचीची लागवड केली. अभिनव पद्धत अवलंबल्यानं त्यांना गुंठ्यात एक टन याप्रमाणं दहा टन उत्पन्न मिळालंय. हा आकडा ऐकून भल्याभल्यांना ठसका लागलाय. त्यातूनच बरेच जण आता
 
ब्युरो रिपोर्ट, उस्मानाबाद
मराठवाडा नुकताच दुष्काळानं होरपळून निघाला. या आपत्तीनं जनतेला बरंच काही शिकवलं. ही इष्टापत्ती मानून अनेक संस्था, संघटना आणि सेवाभावी लोकांनी जलसंधारणाची कामंही केलीत. नुकत्याच झालेल्या पावसानं या कामांना आता पालवी फुटलीय. बी. बी. ठोंबरे यांच्या नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्री या आदर्श खासगी साखर कारखान्यानं लोकसहभागातून केलेली जलसंधारणाची कामं त्यापैकीच एक. सौंदना आंबा आणि परिसरातील पंचवीस गावातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर त्यामुळं आज समाधान झळकतंय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
आज 2 ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. गांधीजींचा खून करण्यात आला त्याला तीन पिढ्या लोटल्या पण 'गांधी विचार' काही संपले नाहीत. आजच्या तरुणाईच्या मेंदूतही ते फिट्ट बसले आहेत. त्यामुळंच तशी वेळ आलीच, तर जीन्स परिधान केलेली तरुणाई गांधी टोपी घालून गांधीगिरीसाठी उस्फूर्तपणे रस्त्यावर उतरत असल्याचं दृश्य भारतातच नव्हे तर जगभरात पहायला मिळतं. कोणी काही म्हणो पण..., सत्य आणि अहिंसा या शाश्वत मूल्यांवर आधारीत गांधी नावाचा 'केमिकल लोचा' तरुणाईचा मेंदू व्यापून राहिलाय, एवढं खरं!
 
रोहिणी गोसावी, अकलूज, (सोलापूर)
तुम्हाला ड्रायव्हिंगचं पॅशन आहे का? डोंगरदऱ्यांमधून गाडी चालवायला आवडते का?  तर 'ऑफ रोड ड्रायव्हिंग' ही तुमच्यासाठी एक छान संधी आहे. एखाद्या डोगरावर 'ऑफ रोड ट्रॅक' असतो....किंवा तो तसा बनवला जातो. कमरेच्या उंचीचे खड्डे...त्यात पाणी, चिखल. अवघड आणि खडकाळ, दगडधोंड्यांचा चढ, तसाच उतार आणि अशा ट्रॅकवरुन ड्रायव्हिंग करायचं. एक चित्तथरारक अनुभव. चढउतारांवर गाडी घेणाऱ्या प्रत्येक हेलकाव्यावर ह्रद्याचे ठोके चुकवणारा पण तेवढाच मनोरंजक खेळ. नुकताच तो अकलूजच्या माळरानावर रंगला होता.
 
सुमित बागुल, मुंबई
गणपती आता तोंडावर आले असून अवघ्या मऱ्हाटी मुलखातील बाजारपेठा त्यासाठी सज्ज झाल्यात. सजावटीच्या साहित्यापासून ते लाईटच्या माळांपर्यंत आणि अगरबत्तीपासून ते दुर्वा-फुलांपर्यंतच्या पूजासाहित्यानं बाजार खचाखच भरून गेलाय. फुलबाजाराचं तर विचारूच नका. सायली, जाई, जुई, मोगरा कमळ, सोनचाफा, झेंडू, जास्वंदी, शेवंती, गुलाब, कण्हेरी अशा फुलांनी बाजार बहरलाय. याशिवाय दुर्वा, तुळस, शमी, तेरडा, बेलपत्ता, केळखांब, आंब्याची पानं, विड्याची पानं आणि 21 पत्रींनी बाजार फुलून गेलेत.
 
ब्युरो रिपोर्ट, रायगड
घराघरात विराजमान होण्यासाठी बाप्पांच्या मूर्तींनी बाजारपेठा भरुन गेल्यात. 'पेणच्या सुबक मूर्ती' असे फलक सर्वत्रच पहायला मिळतायत. कसबी कारागीर आणि नैसर्गिक वाटावं, असं रंगकाम यामुळं पेणच्या मूर्ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचं प्रतीक झाल्यात. पेणमधून यावेळी 30 लाखांच्यावर मूर्ती तयार झाल्या असून विक्रीसाठी त्या राज्यात तसंच विदेशातही रवाना झाल्यात. यातून यंदाची उलाढाल 40 ते 45 कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज आहे.