स्पेशल रिपोर्ट

विवेक राजूरकर, जालना
आपल्या कर्तृत्वानं यशाच्या अनेक पायऱ्या पादाक्रांत करणाऱ्या महिलांचं उदाहरण आपल्या समोर आहे. अगदी कृषी क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत महिलांनी शेतीतही चांगलं उत्पन्न मिळवलं. अशाच यशस्वी परंपरेत एक कडी गुंफण्याचं काम केलंय, जालना जिल्ह्यातल्या संजीवनी जाधव यांनी. यशस्वी उद्योजिका बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत, त्यांनी 'अॅक्टिव्ह' या बचत गटाची सुरुवात केली आणि स्वत:सोबतच अनेक महिलांना स्वावलंबी बनवलं. पाहूयात संजीवनी जाधव यांचा गृहिणी ते उद्योजिकेपर्यंतचा यशस्वी प्रवास...
 
ब्युरो रिपोर्ट, वाशीम
  25 एकरवर बागवैशालीताईंकडं ३० एकर शेती आहे. ५ वर्षांपूर्वी राऊत दाम्पत्यानं २५ एकर क्षेत्रात संत्रा पिकाची लागवड केली. मात्र, लागवडीनंतर काही महिन्यांतच वैशाली यांचे पती सुनील राऊत यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं अकाली निधन झालं. त्यानंतर हिंमत न खचता पदवीधर असलेल्या वैशालीताईंनी कुटुंबाबरोबरच शेतीकडं लक्ष केंद्रित केलं. काहीही झालं तरी पतीचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करून पदर खोचून त्या कामाला लागल्या. माळरान फुललं पतींनी मोठ्या जिद्दीनं
 
मुश्ताक खान, येळणे, रत्नागिरी
देशातील हॉटेल संस्कृतीत आता अनेक परदेशी भाज्यांनी स्थान मिळवलंय. फाईव्ह स्टार हॉटेल्समधील बहुतांशी पदार्थांमध्ये ब्रोकोली, बॉम्बी, ऑरबिल, पिकॅडो इत्यादी एक्झॉटिक भाज्या वापरात येतायेत. या विदेशी भाज्या परदेशातून आयात कराव्या लागतात. मात्र या भाज्या आपल्याकडेच पिकू लागल्या तर... कोकणातल्या लाल सुपीक मातीत या विदेशी भाज्यांचं चांगलं उत्पादन घेता येऊ शकतं, हे दाखवून दिलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या येळणे गावच्या महेश केळकर या प्रयोगशील शेतकऱ्यानं. केळकर यांनी रंगबेरंगी शिमला मिरची आणि लाल कोबीसारख्या विदेशी भाज्यांची लागवड करून उत्तम नफा कमवलाय.
 
विवेक राजूरकर, औरंगाबाद
विवाहानंतर प्रत्येक पती-पत्नी आपल्या पुढील आयुष्यातील सुंदर स्वप्नांची माळा गुंफत असतात. त्यांचं एक स्वप्न विशेषत्वानं असतं ते म्हणजे आपलं सुंदर, निरोगी बाळ... यासाठी त्यांचं तन-मन आसुसलेलं असतं. पण, एका क्षणी कळतं, आपलं बाळ निरोगी नाही, ते एका विशिष्ट आजारानं ग्रासलेलं आहे... आणि त्या आई-बाबांची ही स्वप्नांची माळ क्षणात तुटून त्यातील एक एक मणी घरंगळून पडतात... असाच प्रकार दहा वर्षांपूर्वी औरंगाबादच्या अंबिका आणि बाळासाहेब टाकळकर या दाम्पत्याच्या बाबतीत घडला. त्यांच्या मोठ्या मुलाला ऑटिझम असल्याचं निदान झालं. पण अंबिकाताई खचल्या नाहीत. या
 
यशवंत यादव, सोलापूर
एखाद्यानं मनात आणलं आणि त्याला गावकऱ्यांची साथ मिळाली तर गावचा चेहरामोहरा कसा बदलू शकतो, याचं मूर्तीमंत उदाहरण पंढरपूर तालुक्यातल्या कासेगावात पहायला मिळतं. कासेगावात प्रवेश करतानाच आपलं मन प्रसन्न होतं ते हिरव्यागार द्राक्षमांडवाच्या दर्शनानं. वेलींना लगडलेले द्राक्षाचे घोस आपलं स्वागत करतात. द्राक्षमळ्यात कामात दंग असलेले गावकरी हसतमुखानं आदरातिथ्य करतात...द्राक्षांचं गाव म्हणून कासेगाव केव्हाच प्रसिद्ध झालंय. यामागं आहे, गावकऱ्यांची जिद्द आणि गावातल्या आर्वे कुटुंबाची प्रेरणा...
 
रोहिणी गोसावी, मुंबई
आज गाय-गोऱ्हांची बारस. संध्याकाळी शेतकरी गोठ्यात दिवे लावतील आणि 'दिन, दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी' असं म्हणत दीपोत्सव सुरू होईल. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण! लख्ख उजेड देणारे लाईटचे दिवे घरोघरी आले तरी इवलीशी ज्योत पेटल्यानंतर काळोख दूर करणारी पणती काही माणसाच्या मनातून जात नाही. दिवा मातीचा, धातूचा किंवा सोन्याचांदीचा असो...तो अंधारावर मात करायला शिकवतो. दिवाळीत असे असंख्य दिवे आपआपल्यापरीनं लावले जातात. त्यासाठी घरोघरी दिव्यांची खरेदी होते. त्यामुळंच सूर्य ढळला की आसमंत दिव्यांनी उजळून जातो आणि दीपोत्सव साजरा होतो.
 
ब्युरो रिपोर्ट, वाशीम
दिवाळी हा आनंदाचा सण. संपूर्ण भारतवर्षात वेगवेगळ्या पद्धतीनं तो साजरा होतो. प्रांताप्रांताच्या प्रथा, परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी आजच्या हायटेकच्या जमान्यातही त्या टिकवून ठेवण्याचा प्रयत्न लोकं करताना दिसतात. बंजारा समाजात दिवाळीत खेळल्या जाणाऱ्या चौसर या खेळालाही अशीच परंपरा आहे. हा खेळ म्हणजे जुगार नव्हे. दिवाळीच्या आनंदात भर घालणारा तो मनोरंजनाचा एक प्रकार आहे, हे पटवून देत ही परंपरा कायम ठेवण्यासाठी बंजारा समाजातील जाणते लोकं प्रयत्न करतायत.
 
ब्युरो रिपोर्ट, सातारा
अवघ्या भारतवर्षात साजरा केला जाणारा दिवाळी किंवा दीपावली हा शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित सण आहे. तो बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. काळ्या मातीत कठोर परिश्रम केल्यानंतरचा विसावा आणि त्याचवेळी घरी येणाऱ्या धान्यलक्ष्मीचं स्वागत असं दिवाळीचं स्वरुप आहे. शेतीतून आलेली पिकं हुरडा, ओंब्या, कणसे वगैरे नव्हाळीच्या वस्तूंचा सामूहिकरित्या आस्वाद घेण्याची दिवाळीतील परंपरा आजही पाळली जाते. हे सर्व करताना 'इडा पिडा जावो, बळीचं राज्य येवो,' अशी मनोमन प्रार्थना शेतकरी राजा करतोय.  
 
रोहिणी गोसावी, मुंबई
दिवाळीसाठी बाजार खच्चून भरलाय. या बाजारात काही नाही ते विचारा...पणत्या, रांगोळीपासून रंगीबेरंगी आकाशकंदील, खाद्यपदार्थ, भेटवस्तू अशा सर्व वस्तू आहेत. बहुतांश नोकरदार मंडळींना बोनसही मिळलाय. पण...महागाईनं दिवाळी खाऊन टाकलीय. झालंय असं...गेल्यावर्षीच्या तुलनेत फराळ, सुकामेवासह सर्वांचेच भाव जवळजवळ दुपटीनं वाढलेत. त्यामुळं नेहमीच्या तुलनेत बाजारपेठेतील उलाढाल निम्मीपण झालेली नाही. महागाईमुळं खिशाला कात्री लागल्यानं दिवाळी आटोपशीर साजरी करण्यावर सर्वांनी भर दिलाय, असं चित्र पहायला मिळतंय.
 
रोहिणी गोसावी, पुणे
दिवाळीचं लक्ष्मीपूजन सर्वत्र धूमधडाक्यात साजरं झालं. पण डोक्यावर लक्ष्मी घेऊन गावोगाव फिरणारे, लोकांचं भलं व्हावं अशी प्रार्थना करणारे, त्यासाठी पाठीवर सटासट आसूड मारून घेणारे कडकलक्ष्मी मात्र एक वेळेच्या जेवणासाठी अजूनही दारोदार फिरतायत. इंडियातील चकाचक मॉलमध्ये फिरताना आपणाला 'मेरा भारत महान' असं वाटत असलं तरी वस्तुस्थिती तशी नाही. डोक्यावर लक्ष्मीचं देऊळ असतानाही यांची हातातोंडाची गाठ पडत नाही. विविध जातीधर्मातील असे असंख्य लोकं भारतात असून दीपोत्सव साजरा करताना त्यांच्यासाठी एक तरी दिवा लावायला हवा!