स्पेशल रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, मुंबई/पुणे
मकर संक्रांत....नविन वर्षातला पहीला सण...मकर संक्रांत म्हटलं...की तिळगुळ, तिळाचे लाडु, तिळपोळी....पतंग...आणि बरच काही डोळ्यासमोर येतं....संक्रांतीच्या वेळी थंडी असते. त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गूळ या पदार्थांना या दिवशी फार महत्त्व असते. सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे यालाच 'संक्रमण' म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच 'मकर संक्रमण ' असे म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या संक्रमणाच्या दिवशी दरवर्षी  'संक्रांत' हा सण साजरा करतात. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा
 
ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर
कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्या मुळे आणि आयआरबी ने सकाळ पासून टोल वसुली पुन्हा सुरु केल्याच्या निषेधार्थ रविवारी कोल्हापूरकरांच्या भावनांचा पुन्हा उद्रेक झाला. फुलेवाडी टोल नाका, शिरोली नाका,शाहू नाका, आर के नगर टोल नाका अशा सर्वच टोल नाक्यांवर कोल्हापुरकरांनी हल्लाबोल केला. संतप्त झालेल्या नागरिकांनी टोल विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागत टोल बुथवर दगफेक,करून तोडफोड केली. यावरच यावर न थांबता त्यांनी सर्वच्या सर्व टोल बूथ पेटवून दिले. दोन्ही मंत्र्यांनी कोल्हापूरचा विश्वासघात केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर बंदचं आवाहन केलंय.
 
अजय पालीवाल, जळगाव
भरमसाठ किंमतीच्या रासायनिक खतांचे दुष्परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागलेत. त्यामुळं ग्राहक आणि शेतकरी दोघंही सेंद्रीय पद्धतीच्या शेतीकडं वळतायंत. धरणगाव तालुक्यातील रेल बाजार इथल्या तरुण शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांचा वापर करुन अभिनव पद्धतीनं भेंडी उत्पादन केलंय. लहरी निसर्गाचा सामना करीत त्यांना भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळाल्यानं ही सेंद्रीय भेंडी आता थेट लंडनला जाऊन पोहोचलीय. ही यशोगाथा पाहून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा ओढा सेंद्रीय पद्धतीनं भाजीपाला घेण्याकडं वाढलाय.
 
ब्युरो रिपोर्ट, पेण
  रायगडच्या संस्कृतीची ओळख पोपटी पार्टी म्हणजे रायगड जिल्ह्याची खास ओळख आहे. पोपटीच्या (गोड वाल) शेंगा शेतात भरुन तयार व्हायला लागल्या, की पोपटी पार्ट्यांचा सिझन सुरु होतो, तो थेट आता थंडी संपेर्यंत म्हणजे मार्चमध्यापर्यंत सुरू राहील. पोपटीच्या शेंगा, बटाटा, कांदा असे पदार्थ भांबुर्ड्याचा पाला भरलेल्या मडक्यात टकतात. पूर्णपणे नैसर्गिक, बिना तेलाची आणि बिना फोडणीचे वाफेवर शिजवलेल्या या पदार्थांचा स्वाद एकमेकांत उतरुन जी भन्नाट चव येते ती फक्त चाखण्यासाठीच असते, त्याचं
 
अर्चना जाधव, पुणे
शेतीतही सध्या आधुनिकतेचं वारं वाहतंय. पारंपरिक शेतीला फाटा देऊन अनेक शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून, शेतीत विविध प्रयोग करत असून त्यांना चांगल यश येताना पाहायला मिळतंय. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पडगाव पोटोळे इथल्या रंगनाथ मल्हारी गाडकवाड यांनी एक एकर क्षेत्रात ग्रीन हाऊसमध्ये कार्नेशन फुलांची लागवड केली. 55 लाखांची गुंतवणूक करुन उभारलेल्या ग्रीन हाऊसमधून त्यांना गेल्या दोन वर्षात आठ लाखांचा निव्वळ नफा झालाय. प्रखर इच्छाशक्ती, जिद्द, यांच्या जोडीला योग्य प्रशिक्षण मिळाल्यामुळं जागतिक बाजारपेठेचं भान ठेऊन योग्य हंगाम साधण्यात त्यांना यश मिळालं. त्यांची
 
रोहिणी गोसावी, मुंबई
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना तातडीनं पकडावं तसंच दाभोलकरांच्या मृत्यूनंतर तातडीनं जादूटोणा विरोधी वटहुकूम काढणाऱ्या सरकारनं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करावा, या मागणीसाठी  मुंबईत (2 डिसेंबर) भव्य मोर्चा काढण्यात आला. अंधश्रध्दा निर्मूनल समिती, परिवर्तनवादी संघटना, वारकरी संप्रदाय आण‌ि राजकीय पक्षांनी काढलेल्या या मोर्चानं राजधानी मुंबई दणाणून गेली. सुमारे 10 हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
 
प्रवीण मनोहर, अमरावती
बाळासाहेब ठाकरे यांचा आज प्रथम स्मृतीदिन. त्यांचं पार्थिव जिथं अनंतात विलीन झालं, त्या मुंबईतल्या शिवाजी पार्कवरच त्यांच्या लाखो चाहत्यांची रिघ लागलीय. देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहली जातेय. पण परतवाडा जरा अंमळच भावूक झाला. त्याला कारणही तसंच खास आहे. हा देशाचा साहेब इथं बाळ म्हणूनच वावरला. साहेब होण्याचे संस्कार त्याला इथल्याच मातीत मिळाले.
 
यशवंत यादव, सोलापूर
दुष्काळामुळं पाण्याअभावी  उभी शेतं सुकू लागलीत, तर फळबागांना कुऱ्हाड लावण्याची वेळ आलीय. अशा परिस्थितीत बोरांची लागवड फलदायी ठरू शकते, हे पंढरपूर तालुक्यातील खरातवाडीनं दाखवून दिलंय. अख्ख्या वाडीनं बोरं लागवड करून गावाचा विकास करून दाखवलाय. अतिशय कमी पाण्यात येणारं हे फळपीक डोंगराळ भागात आणि माळरानावर बहरतं. या बोरीला `डेझर्ट प्लॅण्ट` म्हणूनही ओळखलं जातं. बोरांच्या उत्पादनामुळं खरातवाडीची आता बोरीचीवाडी म्हणून नवी ओळख निर्माण झालीय.
 
विवेक राजूरकर, औरंगाबाद
'राम राम पाव्हणं, शौचालय बांधलं का?...नाही..? तर मग.... मागे फीर'.  पाटोदा गावाच्या प्रवेशद्वारावरील ही अभिनव पाटीच गावाची वेगळी ओळख सांगून जाते. या गावातील मुलींना सून करून घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी असलेली ही तंबीच. सर्वांना शुद्ध पाणी, सांडपाणी, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन, तंटामुक्त, हागणदारीमुक्त अशा अनेक गोष्टींमुळं हिरवाईनं नटलेलं पाटोदा राज्यात आदर्श गावाचं मॉडेल म्हणून पुढं येताना पाहायला मिळतंय.  त्यामुळंच या गावात सून म्हणून येणं म्हणजे आज भाग्याचं लक्षण समजलं जातं.
 
प्रवीण मनोहर, अमरावती
सध्याच्या जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था काय आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मुलांना चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण मिळावं, यासाठी जागरूक असलेले पालक त्यामुळंच नाईलाजानं खाजगी शाळांची वाट धरतात. पण शिक्षक आणि गावकरी यांनी मनात आणलं तर गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतही डिजिटल वर्ग भरू शकतात. ही अतिशयोक्ती नाही तर मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील प्राथमिक कन्या शाळेनं हे सिद्ध करून दाखवलंय. आता शिक्षकांनी सीबीएससी, आयसीएससी पॅटर्नप्रमाणे शैक्षणिक सुविधा देण्यासाठी कंबर कसलीय.