स्पेशल रिपोर्ट

कोणाची एन्ट्री - कोणाची एक्झिट

ब्युरो रिपोर्ट, मुंबई

article-2545947-1AF57B6000000578-540 634x485मतदान संपलं आणि सर्व माध्यमांनी त्यांचे निवडणुकांबद्दलचे अंदाज, म्हणजेच एक्झिट पोल मांडले. त्यात एकगठ्ठा सर्वांनीच एनडीएला जनतेचा कौल असल्याचं दाखवलंय. एनडीएला स्पष्टबहुमत मिळेण्याची शक्यता या एक्झिट पोलनं व्यक्त केलीये. आणि काही एक्झिट पोलच्या मते तर युपीए धुळीला मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत कॉग्रेसचा एकही उमेदवार निवडुन येणार नाही असं बहुतेक एक्झिट पोलचं म्हणणं आहे.

देशात तिसरी आघाडी निवडणुकीपुर्वी होऊ शकली नाही, जनता दल संयुक्तचे सर्वेसर्वा नितिश कुमार यांची राजनिती फसली की काय असंच या एक्झिट पोलवरुन दिसतंय. त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची त्यांनी केलेली कुचंबना सुद्धा त्यांना भोवली असंच म्हणावं लागेल. लालु प्रसाद पुन्हा एकदा कॉग्रेससोबत सक्रीय झाल्यानं बिहारचं राजकारण ढवळुन निघण्याची चिन्ह आहेत. पश्चिम बंगाल असो की केरळ डावे विचार आणि पक्ष यांची पिछेहाट होताना दिसतेय.

केंद्रतील सत्तेत महाराष्ट्राचा वाटा हा 48 खासदारांचा असणार आहे. त्यात महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला कौल दिलाय ते उद्याच समजेल. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्यात प्रमुख लढती आहेत. गेले 15 वर्ष राज्यात कॉग्रेस – राष्ट्रवादीची सत्ता आहे. पण महाराष्ट्राची जनता मात्र यात समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या थांबण्यासाठी सरकारनं पैशांच्या पॅकेजशिवाय काहीही उपाययोजना केल्या नाही. आणि दिलेलं पॅकेज त्या शेतकऱ्यांपर्यंत किती पोहोचलं हा संशोधनाचा विषय आहे. कर्जमाफीची योजना आणली, त्या योजनेचा फायदा किती शेतकऱ्यांना झाला? त्यासाठीची कागदपत्र बँकेत सादर करता करताच त्यांचं कंबरडं मोडलं. त्यामुळं आता पुन्हा कॉग्रेसला निवडुन देण्यात शेतकऱ्यांना रस वाटत नाहीये. शेतकरी जो शेतीमाल पिकवतो, तो त्याला कवडीमोल भावानं विकावा लागतो, आणि तोच शेतमाल शहरात मात्र चढ्या किमतींना लोकांना विकत घ्यावा लागतो त्यामुळंही शेतकरी वर्ग आणि शहरातील नागरीक दोघंही सरकारवर नाराज आहेत. या सगळ्यांच्या नाराजीचा फायदा महायुतीनं पुरेपुर करुन घेतला. त्यांच्या प्रचाराच्या पद्धतींवरुन ते स्पष्टच होतंय.

गेल्या पाच वर्षात सिंचन घोटाळा, गारपीट, दुष्काळ अशा अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या युतीनं या निवडणुकीत आरपीआय, स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांना सोबत घेऊन महायुती केली आणि सत्ताधाऱ्यांसमेर समोर तगडं आव्हान उभं केलं. महाराष्ट्रात मोदी लाट होती की नाही हे उद्याच समजेल पण सत्ताधारी कामगिरी निराशादायक होती आणि त्यामुळं नागरीकही घुश्यात होते, त्यातच उद्धव, मुंडे यांनी राजकीय शक्ती आणि युक्ती पणाला लावली. कॉग्रेसला चितपट करण्यासाठी ही महायुती एकदिलानं लढली. पश्चिम महाराष्ट्रात राजु शेट्टी नावाचं वादळ राष्ट्रवादीसमोर उभं ठाकलं. शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीनं सरकारपुढं मांडणारा आणि प्रसंगी त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणारा नेता म्हणुन राजु शेट्टी शेतकऱ्यांच्या परिचयाचे आहेत. हीच गोष्ट महायुतीसाठी पोषक ठरणार असंही दिसतंय.

देशात जी परिस्थिती कॉग्रेसची आहे तीच परिस्थिती महाराष्ट्रात राष्ट्रवादीची असल्याचं सगळेच एक्झीट पोल सांगतायेत. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर उजणीच्या पाण्याबाबत अजित पवार यांनी केलेलं अश्लिल वक्तव्य त्यांनी केल्या आत्मक्लेश आंदोलनानंही नागरीकांच्या मनात जाणार नाही. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये प्रस्थापित असलेली भुजबळांची सत्ता यावेळी मात्र धोक्यात आहे. शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी त्यांना मजबुत टक्कर दिलीये. मनसे या निवडणुकीत काही करामत करेल असं दिसत नाहीये. नाशिक महानगरपालिकेत मनसेला एकहाती सत्ता देऊनही त्याचा नाशिकच्या विकासाला काहीही हातभार लागलेला नाही. त्यामुळं मनसेचा बालेकिल्ला समजला जाणारा नाशिकचा गडही मनसेला राखता येतो की नाही ही शंकाच आहे. मनसेची महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट अजुनही गुलदस्त्यातच आहे. ती निदान येणाऱ्या विधानसभा निवडणुतीपर्यंत तरी बाहेर येईल अशी नागरीकांची अपेक्षा आहे.
‘आप’नं दिल्ली जिंकल्यानंतर लोकांना त्यांच्याकडुन खुप अपेक्षा होत्या. परंतु आपण लोकांच्या अपेक्षा पुर्ण करु शकत नाही हे त्यांनी लवकरच सिद्ध केलं त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीत जनता त्यांना संधी देते का नाही हे उद्याच कळेल.

एकुणंच काय तर युपीए2 चं अपयश हे कॉग्रेसच्या नेतृत्वाचं म्णजे गांधी घराण्याचं अपयश आहे का या प्रश्नाचं उत्तर कॉग्रेस नेत्यांना द्यावंच लागेल.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.