स्पेशल रिपोर्ट

राज्यात अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
वातावरणात होणाऱ्या बदलामुळं हवामानाचा समतोल बिघडु लागलाय. त्याचंच उदाहरण म्हणजे राज्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस. भर उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पाऊस हजेरी लाऊ लागलाय. नुसता पाऊसच नाही तर त्याच्याबरोबर असणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय. मार्चमध्ये झालेल्या प्रचंड गारपिटीनं झालेल्या नुकसानीतुन शेतकरी उभारी घेतच होता की अवकाळी पावसानं त्याचं कंबरडं मोडायला आपली हजेरी लावली.


Avkali paus 5कोकणात जास्त नुकसान
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागला. पुढचे 24 तास हवामान असंच राहण्याचा आणि राज्यातल्या काही भागात अजुनही पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो कोकणाला. चिपळूण, खेड, दापोली तालुक्‍यांत प्रचंड नुकसान झालंय. समुद्रही खवळलेला असल्यामुळे मच्छीमारी बंद ठेवण्यात आलीये.

 

राज्याच्या विवध भागात पावसाचं थैमान
पुणे जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गाराही पडल्या. पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आंबा, डाळिंब या फळांच्या बागांचं नुकसान झालं तर कांदा, गहु, गाजर कोथिंबीर अशा विवध पिकांचं या पावसात नुकसान झालं. नाशिक, औरंगाबाद, सांगली, सातारा, विदर्भ अशा सर्वच ठिकाणांना या अवकाळी पावसानं झोडपुन काढलंय.

 

जिवीत आणि वित्त हानीavkali paus 1
सांगलीत वीज पडुन एका महिलेचा आणि दोन म्हशींचा तर औरंगाबादमध्ये एका वीटभट्टी कामगाराचा मृत्यु झालाय. तर सोलापुरमध्ये वादळी वाऱ्यामुळं विजेची तार पडुन दोघांचा मृत्यु झालाय. साताऱ्यातील हेळगाव परिसरात 70 घरांचे व चरेगाव परिसरातील 80 घरांचे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात वादळाचा सर्वाधिक तडाखा कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांना बसला. या दोन तालुक्‍यांतील सुमारे दोनशे घरांची पडझड झाली आहे. पाटण तालुक्‍यातील ढेबेवाडी, श्री क्षेत्र नाईकबा, मालदन, मंद्रुळ कोळे, पाटण या परिसरातील वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. नुकसानग्रस्त भागांचे प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम सुरू झाले.


विदर्भातही पावसाची हजेरी
गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसानंतर गुरुवारी पावसानं विदर्भात पुन्हा हजेरी लावली. उन्हाळी भुईमुगाचं या पावसामुळं प्रचंड नुकसान झालंय. वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपूर जिल्ह्यांतील काही तालुक्‍यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. सुमारे अर्ध्या तासापर्यंत तुरळक स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. दिवसभर ढगाळ वातावरण कायम असल्याने उन्हाळी भुईमुगावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे.

 

Avkali paus 3हाताशी आलेली पिकं पुन्हा उद्ध्वस्त
मार्चमध्ये झालेल्या गारपिटीनं हाता-तोंडशी आलेली शेतकऱ्याची पिकं त्यांच्या डोळ्यादेखत भुईसपाट झाली होती. आता शेतात कांद्याचं पिक मोठ्या प्रमाणात आहे. कांदा शेतातुन काढल्यानंतर तो बाजारत नेण्याआधी किंवा साठवण्या आधी शेतातच झाकुन ठेवतात. त्यमुळं तो चांगला वाळतो आणि त्याला चांगला रंग येतो. बहुतेक शेतकऱ्यांचा कांदा आता याच स्टेजमध्ये आहे. आणि पावसानं अचानक दिलेल्या तडाख्यानं शेतकऱ्यांना तो साठवायला वेळही मिळालेला नाही. त्यामुळं त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काही शेतकऱ्यांचा कांदा तर अजुन काढायचा बाकी आहे. त्यांच्या हातातही आता काही येण्याची शक्यता नाही. आंब्याचंही मोठं नुकसान या पावसामुळं झालंय, वादळी वाऱ्यामुळं फळं गळुन पडलीयेत. जळगाव जिह्यात केळीची झाडं उन्मळुन पडलीयेत.

 

पंचनाम्याचे सोपस्कार
नैसर्गिक आपत्ती आली की सरकारी कर्मचारी तातडीनं पंचनामा करायला येतात, आणि जातात, पंचनाम्यावरच शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यायची हे ठरतं. पण तीचे निकष काय, पिकं खराब झल्याची टक्केवारी कशी काढली जाते हे शेतकऱ्याला मात्र सांगीतलं जात नाही. आणि लागवडीच्या 10 टक्केही नुकसान भरपाई त्याला मिळत नाही.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.