स्पेशल रिपोर्ट

'महाराईस'ला उदंड प्रतिसाद...!

ब्युरो रिपोर्ट, ठाणे
 
पू्र्व विदर्भात पिकणारं वाणं...
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये सुमारे सात लाख, 80 हजार हेक्‍टर क्षेत्रावर भाताचं पीक घेतलं जातं. त्यात साधारणतः 13 लाख 48 हजार मेट्रिक टन तांदळाचं उत्पादन होतं. त्यात श्रीराम, जय श्रीराम, एचएमटी, सुगंधी चिन्नोर या जातीच्या वाणांचा समावेश आहे. हा उत्तम दर्जाचा तांदूळ विपुल प्रमाणात पिकत असला तरी त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नव्हता. दुसरीकडं विविध खासगी कंपन्या बासमती तांदळाची विक्री करुन घसघशीत नफा कमावतात परंतु भात उत्पादक शेतकऱ्याला त्याचा काहीच फायदा होत नाही. ही बाब लक्षात घेऊन पणन मंडळानं पुढाकार घेत पूर्व विदर्भातील तांदूळ 'महाराईस' ब्रॅंडनं बाजारात आणलाय.

rice-festival2कृषीमंत्र्यांच्या हस्ते विक्री शुभारंभ....
ठाणे जिल्हा परिषद, कृषी विभाग तसेच महाराष्ट्र राज्य कृषी आणि पणन विभागातर्फे २८ फेब्रुवारी ते २ मार्च या काळात भव्य तांदूळ महोत्सवाचं आयोजन केलं होतं. त्याच्या उद्घाटनप्रसंगी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते 'महाराईस'च्या विक्रीचा शुभारंभ झाला. त्याला ग्राहकांचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात कर्जत, वाडा, शहापूर, जव्हारमधील तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. महोत्सवात तब्बल ७० स्टॉल्स होते. बाराशे क्विंटल तांदळाची विक्री झाली. महाराईस ब्रॅंडशिवाय विविध शेतकऱ्यांकडील कोलम जातीचा विविध तांदूळाचीदेखील मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

''पणन विभागातर्फे थेट उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेनुसार आयोजित केल्या जाणाऱ्या तांदूळ तसंच धान्य महोत्सवाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अशा महोत्सवांमुळं शेतकरी आणि ग्राहक यांच्यात नवीन नातं निर्माण होतंय. शिवाय यासाठी बाजार समित्यांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण होऊन त्याचा फायदा धान उत्पादक शेतकऱ्यालाच होतोय,'' असंही विखे-पाटील यांनी यावेळी सांगितलं.

rice-festival6ग्राहकराजा खूश झाला...
या मोहोत्सवात पाच, दहा आणि पंचवीस किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये ग्राहकांना तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला. सेद्रीय शेतीतून पिकवलेला, भेसळ नसलेला तांदूळ रास्त भावात ग्राहकांना उपलब्ध झाला. वेगवेगळ्या प्रकारच्या आणि जातीच्या तांदळांची माहिती तसंच त्यांची वैशिष्ठ्ये ठाणेकरांना या महोत्सवातून समजून घेता आली. तांदूळ उत्पादक शेतकऱ्याला व्यापाऱ्यांच्या तुलनेत जादा आणि ग्राहकांना बाजारभावाच्या तुलनेत कमी किमतीत तांदूळ मिळाल्यामुळे ठाण्यातील ग्राहकराजा खुश झालाय. महोत्सवात भेट देऊन प्रत्येकजण आता परत असा महोत्सव कधी भरणार, याची आवर्जून चौकशी करीत होते, अशी माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी 'भारत४इंडिया.कॉम'शी बोलताना दिली.

rice-festival9भेसळ विरहीत तांदळाची खात्री
सध्या बाजारात विविध कंपन्यांनी बासमती तांदूळ वेगवेगळ्या ब्रॅंडनी बाजारात आणलाय. मात्र त्यासाठी ग्राहक जेवढे पैसे मोजतो त्यातील २५ टक्केही रक्कम बासमती उत्पादक शेतकऱ्याच्या हातात पडत नाही. याशिवाय त्यामध्ये होणारी भेसळ वेगळीच. प्रोसेसिंगचं तंत्रज्ञान वापरून बेमालूमपणे भेसळ करता येते. पोह्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळ प्रोसेस केल्यावर बासमतीसारखा दिसतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन तांदूळ उत्पादक शेतकरी आणि ग्राहक या दोघांचा फायदा नजरेसमोर ठेऊन हा 'महाराईस'
ब्रॅंड बाजारात आलाय. पाच, दहा आणि 25 किलोच्या पॅकिंगमध्ये तो उपलब्ध करून देण्यात आला असून अत्यंत रुचकर, लवकर शिजणारा व मऊ असा याचा भात होतो.

यंदाही निर्यात भाववाढ, शेतकऱ्यांना फायदा नाही
कृषी विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी पूर्व विदर्भात तांदळाच्या उत्पादनात वाढ होऊन निर्यात १0 लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. यंदाही निर्यातीचे भाव वाढल्याचे दिसत असले तरी शेतकर्‍यांना त्याचा काही फायदा होणार नाही. गेल्या वर्षी अपुर्‍या पावसामुळं दक्षिण भारतातील तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं होतं. त्यामुळं तेथील व्यापार्‍यांनी गोंदिया, भंडारा आणि लगतच्या भात उत्पादक पट्टय़ातून मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळं तांदूळ उत्पादक शेतकऱ्याना चांगला भाव मिळाला. पण स्थानिकांना याचा फटका बसून त्यांना दुप्पट भावानं तांदूळ खरेदी करावा लागला होता,.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.