स्पेशल रिपोर्ट

सह्याद्रीच्या कड्यात एन्ड्युरोचा थरार...!

रोहिणी गोसावी, पुणे
 
साहसाचं भरगच्च पॅकेज

'एन्ड्युरो-3' मध्ये सायकलींग, रॅपलिंग, ट्रेकिंग, रिव्हर क्रॉसींग, कयाकिंग, रायफल शुटींग अशा अनेक साहसी क्रीडा प्रकारांचा एकाच रेसमध्ये सहभाग असतो. 180 किमीच्या या रेसमध्ये स्पर्धकांना कधी सायकलिंग, कधी ट्रेकिंग, कधी रॅपलिंग, कधी रिव्हर क्रॉसींग असे सगळेच प्रकार करावे लागतात़. आणि एका टप्यावर आपली सायकल उचलुन डोंगर चढणे आणि डोंगरावरुन सायकलिंग करत खाली येणं असा सहनशक्तीचा अंत बघणारा एक प्रकार असतो. त्यामुळं 'एन्ड्युरो 3' म्हणजे अशा सर्व साहसी क्रीडा प्रकारांचं एक भरगच्च पॅकेज असतं. वेगवेगळ्या वयोगटासाठी, वेगवेगळ्या ग्रुप्ससाठी वेगवेगळे रुट, वेगवेगळे साहसीप्रकार या रेसमध्ये असातात. यावर्षी शाळा-कॉलेजमधल्या मुलांसाठी आणि मिडीयासाठी ही रेस 12 किमी सायकलिंग आणि 12 किमी ट्रेक अशी एकुण 24 किमी होती.तर खुल्या गटासाठी 180 किमीची होती. शाळेतला मुलांचा या रेसमधला उत्साह वाखणण्याजोगा असतो. Enduro 3

टीमवर्क आणि सहनशक्तीचा कस

प्रत्येक टीममध्ये तीन जण असतात आणि त्यात एक मुलगी असणं गरजेचं असतं. मुलगी नसेल तर तुमची टीम पूर्ण होत नाही. टीममध्ये एक मुलगी असणं याला थोडा आंतरराष्ट्रीय संदर्भ आहे. परदेशांत होणाऱ्या अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या टीममध्ये एक मुलगी असतेच. मुलांची शारीरिक ताकद जास्त असली तरी मुलींची मानसिक ताकद त्यांच्यापेक्षा जास्त असते. इथं शरीर थकल्यानंतर मानसिक ताकदीवरच ही स्पर्धा जिंकता येते. म्हणुनच प्रत्येक टीममध्ये एक मुलगी असणं गरजेचं असतं. या रेसमध्ये कुटुंब या गटाचाही समावेश होता. यात आई-वडील आणि मुलगा किंवा मुलगी अशी टीम होती. या प्रकारची टीममुळं आई-वडिलांना आपल्या मुलांशी संवाद साधणं सोपं जातं आणि आई-वडिलांच्या नात्यापेक्षाही मैत्रीचं नातं निर्माण होतं अशी भावना यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या पालकांनी व्यक्त केली. 

दोन दिवसांची स्पर्धा

ही स्पर्धा दोन दिवसांची असते आणि तिसऱ्या दिवशी स्पर्धेचा निकाल आणि बक्षिस समारंभ....शनिवारी दुपारी या स्पर्धेला सुरुवात झाली. सह्याद्रीच्या कड्यांचं आव्हान स्वीकारुन स्पर्धकांनी सह्याद्रीच्या कड्यांवरुन कुच करायला सुरुवात केली. कधी सायकलींग तर कधी सायकल उचलुन घेऊन स्पर्धक डोंगर सर करत होते. दिवसभर कड्याक्याचं उन्ह आणि रात्री कडाक्याची थंडी...अशा विरोधाभास असलेल्या वातावरणात सगळे जण आपली रेस पूर्ण करतात. खुल्या गटासाठी कोणत्याही प्रकारचा ब्रेक या स्पर्धकांना मिळत नाही. त्यांना हवा असेल तर ते ब्रेक घेऊ शकतात. पण रात्रंदिवस सायकल चालवायची, नंतर रिव्हर क्रॉसींग करायंच, ट्रेक करायचा....या सगळ्यात एक वेळ अशी येते की शरीर उत्तर द्यायला लागतं आणि तेव्हा मानसिक शक्तीच्या जोरावर आणि जिद्दीवर ही रेस पूर्ण केली जाते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्पर्धा संपते. दोन दिवस शिणलेलं थकलेलं शरीर जेव्हा फिनिश लाइनला येतं तेव्हा स्पर्धकांचा थकवा कुठल्या कुठं गेलेला दिसतो.

Enduro 3 pick 3परदेशी स्पर्धकांचा सहभाग
सह्याद्रीच्या कड्यांनी परदेशी नागरिकांनाही भुरळ घातलीये. 'एन्ड्युरो 3' ही स्पर्धा जागतिक पातळीवर पोहोचू लागलीये. दरवर्षी परदेशातून येणाऱ्या स्पर्धकांचा सहभाग वाढतच असतो. या वर्षीही जवळपास 17 परदेशी स्पर्धकांनी या रेसमध्ये सहभाग घेतला होता.

आयोजकांचाही कस लागतो
अशा प्रकारच्या साहसी खेळांची भारतातली ही पहिलीच स्पर्धा आहे. दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या स्पर्धेत कालानुरुप बदल करण्यात आलेत. एवढ्या मोठ्या रेसचं आयोजन करणं, रुट ठरवणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वांमध्ये समन्वय साधुन आणणं. मोबाईल कनेक्टिव्हिटी नसणाऱ्या ठिकाणी स्पर्धक रस्ता चुकू नयेत याची काळजी घेणं, सर्वात महत्वाचं असतं. त्यासाठी एनईएफचे मार्शल रात्रंदिवस झटत असतात. प्रत्येक टीम ही प्रत्येक चेकपोस्टवरुन जाते की नाही, हे चेक करत असतात. हॅम रेडिओच्या मदतीनं त्यांचं हे सगळं समन्वयन सुरू असतं.
साहसाची आवड असेल, आव्हान स्वीकारायची तयारी असेल तर तुम्हीही या रेसमध्ये सहभागी होऊ शकता. कारण एकाच रेसमध्ये एवढे सगळे साहसी प्रकार करायला मिळणं ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.