स्पेशल रिपोर्ट

पोपटी पार्ट्या रंगू लागल्या...!

ब्युरो रिपोर्ट, पेण
 
रायगडच्या संस्कृतीची ओळख

पोपटी पार्टी म्हणजे रायगड जिल्ह्याची खास ओळख आहे. पोपटीच्या (गोड वाल) शेंगा शेतात भरुन तयार व्हायला लागल्या, की पोपटी पार्ट्यांचा सिझन सुरु होतो, तो थेट आता थंडी संपेर्यंत म्हणजे मार्चमध्यापर्यंत सुरू राहील. पोपटीच्या शेंगा, बटाटा, कांदा असे पदार्थ भांबुर्ड्याचा पाला भरलेल्या मडक्यात टकतात. पूर्णपणे नैसर्गिक, बिना तेलाची आणि बिना फोडणीचे वाफेवर शिजवलेल्या या पदार्थांचा स्वाद एकमेकांत उतरुन जी भन्नाट चव येते ती फक्त चाखण्यासाठीच असते, त्याचं वर्णन शब्दात नाही करता येत. त्यामुळं पोपटीचं आवतान सहसा कुणी टाळत नाही. अलिकडच्या काळात काही जण मटण, चिकन किंवा अंडी टाकुनही पोपटी करतात. तेव्हा मटण किंवा चिकनचे पीस केळीच्या पानात बांधुन पोपटीत टाकतात. त्यामुळं केळीच्या पाणाचाही स्वाद त्यात उतरतो.

4पिढीजात पोपटी...
रायगड जिल्ह्यात पोपटी ही पूर्वापार चालत आलीय. इथं मूळ रहिवासी असणाऱ्यांच्या कित्येक पिढ्या पोपटी पार्ट्यांची लज्जत चाखत आल्यात. पोपटी नक्की कधी, कशी, कुठं सुरु झाली याबद्दल ठोस काहीच माहिती मिळत नाही. ''आमच्या आजोबा-पणजोबापासून आमच्याकडं पोपटी करतात. करण्याची नेमकी पद्धत मी त्यांच्याकडुनच शिकलो, असं पेणचे दिलीप आंद्रे उर्फ नाना यांनी 'भारत4इंडिया'शी बालताना सांगितलं. पाककृती समजावून घेतली की पोपटी बनवणं वरवर सोपं वाटत असलं तरी ते कौशल्याचं काम असतं, असंही नानांनी आवर्जून सांगितलं. भांबुर्ड्याचा पाला आणि भाज्या मडक्यात भरल्यानंतर ते उलटं ठेवतात. त्यावेळी त्यातून वाफ बाहेर जाऊ नये, यासाठी मडक्याचं तोंड व्यवस्थित बंद करावं लागतं नाहीतर मडक्यातून वाफ बाहेर जात राहते आणि पोपटीची मजा जाते. पोपटी तयार झाली किंवा नाही, हे कळायलाही अनुभवाचीच गरज असते. कारण मध्येच मडक्याचं तोंड उघडलं आणि भाज्या कच्च्या राहिल्या तर पुन्हा ते भाजण आणि मडकं बंद करणं जमत नाही, असंही दिलीप आंद्रे यांनी सांगितलं.

उत्तर कोकणातील हुरडा पार्टी
देशावरच्या हुरडा पार्टीप्रमाणेच वालाच्या शेंगांची पोपटी ही उत्तर कोकणातील लज्जत. पोपटी तयार करताना वालाच्या ओल्या शेंगा काढून, त्या धुऊन घेतात. पाणी निथळू दिल जातं. बटाटे-कांदे घेऊन त्यांना उभ्या-आडव्या चिरा देऊन त्यात तिखट, मीठ, मसाला (गोडा) भरला जातो. जुनं मडकं (माठ) घेऊन त्याच्‍या तळाशी आधी भांबुर्डीचा पाला आणि मग थोड्या शेंगा पसरल्‍या जातात. एक थर झाला, की थोडे मीठ व काही बटाटे, कांदे त्या थरावर पसरतात. असे दोन थर लावले जातात. शेवटी पुन्‍हा भांबुर्डीचा पाला पसरला जातो. या पाल्‍याच्‍या गंधामुळे पोपटीची लज्जत वाढते. सोबत, थोड्या ओव्‍याचीही पखरण केली जाते. कारण वाल हा वातवर्धक असतो. त्यात सोबतीला कांदे बटाटे! मडके भरले, की त्याचे तोंड झाकून त्यावर उभ्या-आडव्या दोन बारीक शिपट्या (काठ्या) नीट खोवून ठेवतात. मग तीन विटांवर ते मडके उलटे ठेवून सर्व बाजूंनी बारीक फाटी थोडी व पालापाचोळा मडक्याच्या वरपर्यंत लावला जातो. मग जाळ पेटवला जातो. अर्ध्या तासानं परत त्यावर पालापाचोळा रचतात. मडके लालबुंद होतं. जाळ विझला, की पोपटी तयार झाली आहे याची चाचणी घेऊन मडके खाली उतरवले जातं. त्यावेळी शेंगांचा घमघमाट सुटलेला असतो. मग समजावे, की पोपटी तयार झाली! शेंगांबरोबर ओल्या खोब-याचे तुकडे चवीला घेऊन मस्त पोपटी खावी. पोपटी म्हणजे वालाचे शिजवलेले खमंग ओले दाणेच ते! जमिनीत खड्डा खणून काही ठिकाणी पोपटीची भट्टी लावली जाते.

popatiवैशिष्टपूर्ण चवीचा एकमेव वाल
पोपटी पार्टी सगळ्यांची आवडती आणि आकर्षणाचा भाग असली तरी तिला अजून तसा व्यावसायिक रंग आलेला नाही. खरं तर फक्त रायगडमध्येच होत असलेल्या या पोपटी पार्ट्या एक चांगलं उत्पन्नाचं साधन होऊ शकतात, पण त्यादृष्टीनं अजून कुणी यशस्वी प्रयत्न केलेला नाही. खोपोलीपासून पुढे घाटावर व इतरत्र जो वाल होतो तो थोडा गोड असतो. इतरच्या सारखा उग्र किंवा तुरट नसतो. नागोठणा–मेंढ्याकडच्या वालास कडवा वाल म्हणतात. ह्या वालाची चव वैशिष्ट्यपूर्ण असते. म्हणूनच रोहा तालुक्यातील वालाचा खप (विक्री) जास्त आहे. त्यापासूनही पावसाळ्याच्या सुरूवातीस मोरव येऊन वालाची रोपे दिसतात, त्यालाही बिरडे असे म्हणतात. त्याचाही भाजीसाठी उपयोग होतो.
या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळं पोपटी पार्टी रायगड जिल्ह्याची वेस ओलांडून पुढं गेलेली नसावी.

Comments (2)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.