स्पेशल रिपोर्ट

हाती पाळण्याची दोरी अन् वस्तराही!

ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर

shantabai1कथा शांताबाईंची...

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हसूर सासगिरी इथल्या शांताबाई श्रीपती यादव यांची ही गोष्ट. 'भारत4इंडिया'शी बोलताना त्यांनी आपल्या अनोख्या आयुष्याचे अनेक पदर उलगडून सांगितले. खेड्यातील चारचौघींसारख्याच असणाऱ्या शांताबाईंचं लग्न झालं. पदरी चार मुली. केशकर्तनालय चालवणाऱ्या नवऱ्याच्या जीवावर संसाराचा गाडा हाकता येत नव्हता, म्हणून त्या रोजगाराला जात. दोघांच्या कष्टामुळं कशीतरी हातापोटाची गाठ पडायची. एके दिवशी नवऱ्याच्या छातीत बारीकशी कळ उठली आणि त्यांचं सगळं संपलं. यामुळं तरुण शांताबाईंवर दुःखाचं आभाळच कोसळलं. पहिल्या पहिल्यांदा शेजारपाजाऱ्यांनी सहानुभूती दाखवली. पण पदरी चार मुलींना घेऊन जगायचं कसं, हा प्रश्न त्यांच्यापुढं होताच. धाडस करून उठल्याशिवाय उपयोग नाही, हे तिनं मनोमन ओळखलं आणि एके दिवशी काष्टा खोचून नवऱ्याचा कात्री, वस्तारा घेऊन बाहेर पडली. शेजारच्या आक्काच्या ओसरीवर पहिल्यांदा जाऊन बसली. पसाभर धान्याच्या बदल्यात तिथं तिच्या मुलांचे केस कापून दिले. हे येतंय आपणाला, असा आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला. मगं तिनं नवऱ्याचं बंद खोपडं खोललं. कर्तनालयाच्या बोर्डावरची धूळ झटकली आणि पुरुष मंडळींचे केस, दाढ्या करण्यासाठी दुकानात उभी राहिली.

 ...आणि कात्री, वस्ताऱ्यावर हात बसला

गावातील त्यावेळचे कर्तेसवरते दिवंगत हरिभाऊ बाबाजी कडूकर यांनी आपणाला या कामासाठी प्रोत्साहन दिल्याचं त्या आवर्जून सांगतात. सुरुवातीला 'माझ्याकडं केस, दाढीला या' असं लोकांना सांगावं लागलं. पहिल्यांदा फार कोणी आलं नाही. मग एखादा अडला नडलेला येऊ लागला. "ये शांताबाई कान कापशील, शांताबाई गाल कापशील, सरळ केस कापायचं'' असा दम देतच पुढे बसू लागला. मग हळूहळू माझा हात कात्री-कंगव्यावर, वस्ताऱ्यावर चांगला बसला, असं शांताबाई सांगतात.

shantabai 3 2पुरुषीपणाची भीती नाही वाटली 

शांताबाईंना बाई म्हणून पुरुषांची भीती कधी वाटलीच नाही. "माणसाची नजर चांगली नसती,'' असं आयाबाया सांगायच्या. पण मला तसं कधी काही जाणवलं नाही. माणसं गप्पा मारत मारत माझ्याकडून दाढी करून घ्यायचे, असा अनुभव त्या सांगतात. हा विषय काढल्यावर... हे बघा माझ्यावर येळ आली ही खरी गोष्ट आहे, पण गिऱ्हाईक मला वडील-भावासारखं. त्यांनीबी मला कधी वाईट-वंगाळ वागणूक दिली नाही. समजा तशी येळ आली असती तर त्याच्या नरडीचा घोट घ्यायचा, ही तयारीही मी करून ठेवली होती, असंही त्यांनी सांगितलं.

बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा केली होती मदत

शांताबाईंना आजपर्यंत अनेकांनी मदत केलीय. माध्यमांनीही त्यांच्या कामाची दखल घेतलीय. त्यामुळं अत्यंत आणीनीच्या काळात राज्याच्या कुठल्यातरी कानाकोपऱ्यातून एखादी 50, 100 रुपयांची मनीऑर्डर यायची आणि नड भागायची, असं सांगताना आजही त्यांचा आवाज कापरा होतो. काय सांगू बाबा...मला बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा 201 रुपयांच्या मदतीचा चेक पोस्टानं पाठवला होता. माझ्या आयुष्यातील तो पहिलाच चेक. त्याचं काय करायचं असतं तेसुद्धा मला माहीत नव्हतं. शेजाऱ्यांच्या मदतीनं तो बँकेत नेऊन मी वटवला, असं सांगताना त्यांच्या आवाजात समाधानाची लकेर चमकून जाते.

shantabai 2 2आजही हजामतीला तय्यार

सुरुवातीला वाड्यावस्त्यांवर फिरून घरोघरी जाऊन त्या केस, दाढीचं काम करायच्या. बलुतेदारीवर म्हणजे वर्षाला सहा पायली धान्यावर काही कुटुंबांतील लहान मुलं, पुरुष मंडळींची त्या केस-दाढी करायच्या. पैसे मिळाले नाही तरी मी काही तरी करते याबद्दल समाधान वाटायचं, अशा शब्दात त्यांनी 'वर्क सॅटिसफॅक्शन' सांगितलं. हजामती करून मिळालेल्या पैशांवर मी चारही पोरींची लग्नं केली. चौघीही बऱ्या ठिकाणी आहेत. एक मुलगी तर मुंबईत आहे. एक जण घरजावई असून तो आज सासुबाईंचं दुकान चालवतो. कामातून त्यांना पदरी पैसा जमवता आला नाही. आजही त्यांची परिस्थिती तशी हालाखीचीच आहे. त्यामुळं वयाच्या सत्तरीतही हातचा वस्तारा काही त्यांना खाली ठेवता येत नाही. आजही वाड्यावस्त्यांवर त्या जातात. पोरांची डोस्की करून देतात. तशी वेळ पडलीच तर प्रसंगी म्हसरंसुद्धा भादरून देतात. पण हार मानायला काही तयार नाही ही माय!

वाटलंच तर...

हे वाचून वाटलंच तुम्हाला, चला सॅल्यूट ठोकूया शांता आजीला...जमलंच तर मदतही करूया... यासाठी 7588868935 या क्रमांकावर संपर्क साधा. कोण रं बाबा तू...म्हणून त्या तुम्हाला नक्की साद घालतील.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.