स्पेशल रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट
    सामान्य जनतेचं समाधान रेल्वे बजेटमध्ये निराशा पत्कराव्या लागलेल्या सर्वसामान्य जनतेचं लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागलं होतं. पण सामान्य नागरीकांचा विचार करुन हा अर्थसंकल्प सादर केला गेला असं म्हटलं करी वावगं ठरणार नाही. अर्थसंकल्पात सर्वसामान्य नोकरदार वर्गाचं लक्ष असतं ते त्याच्या आयकर मर्यादेवर. अर्थमंत्र्यांनी आयकराची मर्यादा दोन लाखांवरुन अडीच लाखांवर केलीये. तर ज्येष्ठ नागरीकांसाठीची मर्यादा अडीच लाखांवरुन तीन लाख करण्यात आलीये.   सर्वसमावेशक अर्थसंकल्पजेटलींच्या अर्थसंकल्पावर एक नजर फिरवली तर प्रत्येक क्षेत्राचा विचार करुन अर्थसंकल्प
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
मतदान संपलं आणि सर्व माध्यमांनी त्यांचे निवडणुकांबद्दलचे अंदाज, म्हणजेच एक्झिट पोल मांडले. त्यात एकगठ्ठा सर्वांनीच एनडीएला जनतेचा कौल असल्याचं दाखवलंय. एनडीएला स्पष्टबहुमत मिळेण्याची शक्यता या एक्झिट पोलनं व्यक्त केलीये. आणि काही एक्झिट पोलच्या मते तर युपीए धुळीला मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत कॉग्रेसचा एकही उमेदवार निवडुन येणार नाही असं बहुतेक एक्झिट पोलचं म्हणणं आहे. देशात तिसरी आघाडी निवडणुकीपुर्वी होऊ शकली नाही, जनता दल संयुक्तचे सर्वेसर्वा नितिश कुमार यांची राजनिती फसली की काय असंच या एक्झिट पोलवरुन दिसतंय. त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
वातावरणात होणाऱ्या बदलामुळं हवामानाचा समतोल बिघडु लागलाय. त्याचंच उदाहरण म्हणजे राज्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस. भर उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पाऊस हजेरी लाऊ लागलाय. नुसता पाऊसच नाही तर त्याच्याबरोबर असणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय. मार्चमध्ये झालेल्या प्रचंड गारपिटीनं झालेल्या नुकसानीतुन शेतकरी उभारी घेतच होता की अवकाळी पावसानं त्याचं कंबरडं मोडायला आपली हजेरी लावली.
 
प्रवीण मनोहर, अकोला/गोंदिया
  पतीला मदतीचा हातसरिताताईंची ही कथा. गावात हाताला काम नसल्यानं त्यांचे पती राजाराम दुधगावाहून आपल्या कुटुंबकबिल्यासह चोहट्ट्याला आले. मोठ्या भावाचं पंक्चर दुरुस्तीचं टपरीवजा दुकान होतं. राजाराम या दुकानात काम करायला लागले. पुढे मोठ्या भावानं दुसरीकडं दुकान थाटलं आणि ही टपरी राजारामच्या हवाली केली. राजारामना कामात मदत म्हणून पत्नी सरिता त्यांना मदत करायला लागल्या. पहिल्यांदा सायकल, मोटरसायकलपासून सुरुवात केली. आज ट्रॅक्टर असो की, ट्रक सरिताताई सहजपणं मोठमोठी चाकं उचलतात. त्यातील
 
ब्युरो रिपोर्ट, बदलापूर
  इतरांना आधार देणारी आजची स्त्री महिला हा शब्द उच्चारताच प्रेम, वात्सल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात. पण त्याचबरोबर शक्तिसंपन्न स्त्रीही समोर उभी राहते. कारण आता स्त्री ही अबला राहिलेली नाही, उलट ती सबला झालेली आहे आणि इतरांना समाजात आधार देण्याचं काम ही नारी करत असते. जागतिक महिला दिन म्हणजे महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जाणारा दिवस. या महिला दिनानिमित्त महिलांसाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी आदर्श ठराव्यात अशा बदलापुरातील सुहासिनीताई मांजरेकर. आज वयाची ऐंशी वर्षं उलटून गेली तरी मोठ्या उत्साहात
 
ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर
आज महिला सबलीकरणाचा नारा सर्वत्रच घुमतोय. पण, ज्या काळी महिला खरोखरच अबला होती त्या काळाची म्हणजे सुमारे 35 वर्षांपूर्वींची ही गोष्ट! बलुतेदारीवर डोस्की, दाढी करून प्रपंचाचा गाडा हाकणारा नवरा अचानक देवाघरी गेल्यानंतर तिच्यावर आभाळच कोसळलं. पण तिनं धीर खचू दिला नाही. वस्तारा, कात्री हाती घेतली आणि लोकांचे केस, दाढी करू लागली. पदरी असलेल्या चार पोरींना तिनं लहानाचं मोठं केलं. प्रपंचाला लावलं. आज ती 70 वर्षांची आजी झालीय. परिस्थिती पिच्छा सोडत नसल्यानं अजूनही ती चाळीशीआडचे डोळं मिचमिचत लहान मुलांचे केस कापते,
 
विवेक राजूरकर, औरंगाबाद
    आजची 'स्त्री' ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी काम करताना दिसते. इतकंच नव्हे, तर काही वेळा स्त्री ही पुरुषांच्याही पुढं गेलेली पाहता येते. मात्र, असं असूनही वंशाला दिवा हवा म्हणून सर्रास स्त्री-भ्रूणहत्या होतात. मात्र, औरंगाबादच्या बजाजनगरमधील अपर्णा चेंबरोलू हिनं, परंपरेचा बडेजाव मिरवणाऱ्या लोकांपुढं आपल्या कृतीनं एक आदर्शच घालून दिलाय. कुटुंबाला आर्थिक हातभार लावणारी तसंच स्वत:च्या पायावर उभं राहून शिक्षण घेणारी अपर्णा आज तिच्या कुटुंबाचा आधार झालीय, आई-वडिलांचा
 
ब्युरो रिपोर्ट, सातारा
महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं किती गरजेचं आहे याचा परिपाठ तिला कॉलेज जीवनात मंडईत पाहिलेल्या एका घटनेनं दिला. त्यानंतर तिनं महिलांची एकजूट करून बचत गट स्थापन केला. आज त्याच बचत गटाचं रूपांतर जिजामाता महिला सहकारी बँकेत झालंय. महिलांनी चालवलेली ही बँक आज समाजातील सर्व स्तरातील महिला आणि पुरुषांनाही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी अर्थपुरवठा करते. ही यशोगाथा साकारलीय सातारच्या वर्षा माडगूळकर यांनी.     भाजी मंडईत प्रेरणा वर्षा माडगूळकर ही शिक्षकाची मुलगी. पण, कॉलेजमध्ये असतानाच अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची तळमळ त्यांच्यात निर्माण झाली होती.
 
ब्युरो रिपोर्ट, ठाणे
पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात पिकणारा दर्जेदार तांदूळ 'महाराईस' या ब्रॅंडनं ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या पणन विभागानं हा उपक्रम हाती घेतला असून त्याची सुरवात नुकतीच ठाण्यातून झाली. भेसळ नसलेला उत्तम प्रतिचा तांदूळ योग्य भावात मिळत असल्यानं ग्राहकांच्या त्यावर अक्षरक्ष: उड्या पडल्या. आता विविध शहरांमध्ये भरणाऱ्या धान्य महोत्सवातून 'महाराईस'ची विक्री केली जाणार असून मुंबई, पुण्यात तो मॉलमधूनही उपलब्ध होणार आहे. विविध खाजगी कंपन्यांच्या बासमती एवढाच हा 'महाराईस' ब्रॅंड वाढवण्याचा संकल्प पणन मंडळानं केलाय.
 
रोहिणी गोसावी, पुणे
साहसवीरांना साद घालणारा आणि आव्हान देणारा सह्याद्री...सह्याद्रीच्या कड्यांमध्ये रमणारी शहरी आणि ग्रामीण तरुणाई... आपल्या शरीराची आणि मनाची ताकद पणाला लावणाऱ्या टीम्स... हरणार किंवा जिंकणार याचा फार विचार न करता फक्त रेस पूर्ण करण्याची जिद्द...अशा प्रकारचा अनुभव येतो तो पुण्यात होणाऱ्या 'एन्ड्युरो थ्री' रेसमध्ये. अतिशय साहसी रेस गेल्या 12 वर्षांपासून नॅशनल एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात येते. यावर्षीही तितक्याच उत्साहानं आणि साहसानं ही रेस पार पडली.