शिकता शिकता

ठाणे जिल्ह्यातील सोनेन गावातील 'क्वेस्ट'  या आदिवासी शाळेतील मुलांनी सादर केलेलं गीत.
 
नवी मुंबईच्या कोपरखैरणे इथल्या रा. फ. नाईक विद्यालयात आंतर शालेय कबड्डीच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्याचा क्रीडा शिक्षक सुधीर थळे यांनी पाठवलेला व्हिडिओ.
 
नवी मुंबईच्या कोपरखैरणे इथल्या रा. फ. नाईक विद्यालयात आंतर शालेय खो-खोच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्याचा क्रीडा शिक्षक सुधीर थळे यांनी पाठवलेला व्हिडिओ.
 
स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त आणि स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या जयंतीचं औचित्य साधून कल्याण इथं सामूहिक सूर्यनमस्कार घालण्यात आले. यात डोंबिवली-कल्याण परिसरातल्या 40 शाळांमधल्या जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कल्याणच्या सुभाष मैदानावर झालेल्या या सामूहिक सूर्यनमस्काराचा प्रदिप भणगे यांनी पाठवलेला व्हिडिओ.
 
पंढरपुरातील सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हिंदी चित्रपटातील गाण्यांवर गॅदरिंगमध्ये सादर केलेल्या नृत्याचा मुख्याध्यापिका उषा धापोला यांनी पाठवलेला व्हिडिओ.
 
'अगं बाई अरेच्या' या चित्रपटातील अजय अतुल यांच्या संगीतानं नटलेलं आणि शंकर महादेवन यांनी गायलेल्या 'मल्हार वारी, मोतियानं द्यावी भरून...' या गाण्यावर पंढरपुरातील सिंहगड पब्लिक स्कूलच्या गॅदरिंगमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याचा मुख्याध्यापिका उषा धापोला यांनी पाठवलेला व्हिडिओ.
 
2007सालच्या आमिर खान दिग्दर्शित 'तारे जमींपर' या चित्रपटातील 'देखो देखो क्या वो...' या गाण्याच्या तालावर रंगीबेरंगी कपड्यांमधील मुलांनी धरलेला ठेका पाहून असं वाटतंय, जणू की आकाशातले तारे धरतीवर अवतरलेत की काय...
 
पंढरपुरातील सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 'छडी लागे छमछम' या बालगीताच्या ठेक्यावर गॅदरिंगमध्ये सादर केलेल्या नृत्याचा मुख्याध्यापिका उषा धापोला यांनी पाठवलेला व्हिडिओ.
 
औरंगाबादच्या विश्वभारती कॉलनी इथल्या जय भवानी विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेचा व्हिडिओ पाठवलाय मुख्याध्यापिका श्रीमती लीला वाकळे यांनी.
 
सातारा येथील शारदाबाई पवार अनाथाश्रम शाळेतील विदयार्थिनींनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताचा व्हिडिओ पाठवला आहे मुख्याध्यापक लक्ष्मण ढाणे यांनी.