अशी बनते विट...

शशिकांत कोरे

सातारा -  आपला 'बा-विठ्ठल' कटेवर कर ठेऊन विटेवर उभा आहे. गाळाच्या मातीपासून ते भट्टीत भाजण्यापर्यंत होणारा विट निर्मितीचा प्रवास मोठा रोमहर्षक असतो. 


पहिली विट सिंधू संस्कृतीत निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात चिखल तुडवून विशिष्ट आकार देऊन उन्हात वाळवून त्या बनवल्या जात होत्या. तुर्कस्थानात तायग्रिस नदीच्या किनारपट्टीत दियाबाकर या नावानं विटा बनल्या. विट भाजून पक्की करण्याचं तंत्र भारतात सुरु झालं. साडेसहा हजार वर्षांपूर्वी इ.स.4500 काळात मेहगड आणि बुहेन इथही विटा आढळून आल्या. अलिकडच्या काळात सर्वात जुनी विट म्हणून रोमन साम्राज्यात इ. स. 1200 शतकात भाजकी विट तयार केल्याचं आढळतं. चीनमध्ये तीन हजार वर्षांपूर्वी पश्चिम झोऊ प्रांतात भाजक्या विटा बनल्याचं दाखले मिळतात.

विटेची गुणवत्ता

ज्या विटमध्ये मीठाचं प्रमाण जास्त असतं ती विट लालबुंद रंगाची दिसते. चांगली विट कितीही दिवस पाण्यात ठेवली तरी ती विरघळत नाही. मातीची विट बग्यास मिसळून बनवल्यामुळं वातावरण संतुलित करतं.  

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.