'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून

सुमित बागुल

Animated Film Shivaji Maharajछत्रपती शिवरायांवरील 'प्रभो शिवाजी राजा' हा पहिला अॅनिमेशनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा अॅनिमेशनपट फक्त लहान मुलांसाठी नसून तो सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे, असं दिग्दर्शक नीलेश मुळे हा आवर्जून स्पष्ट करतो. तब्बल ३ लाखांहून अधिक स्केचेस आणि अडीच वर्षाच्या अथक मेहनतीनंतर 'प्रभो शिवाजी राजा' हा अॅनिमेशनपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. अगदी महाराजांच्या जन्मापासून ते स्वराज्य स्थापन करून रायगडावर त्यांचा राज्याभिषेक होईपर्यंतचा सर्व देदिप्यमान इतिहास चित्रपटातून मांडण्यात आलाय. या चित्रपटात शिवकालीन गडकिल्ले, तानाजी, बाजीप्रभू यांसारखे शूरवीर मावळे भेटतात.Prabho Shivaji raja शिवरायांना घडवणाऱ्या शूरवीर जिजाऊ माँसाहेब इथं भेटतात. हर, हर महादेवच्या घोषणा देत प्राणांचीही पर्वा न करता मावळे शत्रूवर कसे तुटून पडत होते, असं सर्व यात पाहायला मिळतं आणि आपला ऊर अभिमानानं भरून येतो. या चित्रपटात शिवरायांच्या न्यायदान पद्धतीवर विशेष प्रकाशझोत टाकण्यात आलाय. शिवरायांना 'रयतेचा राजा' असं का म्हटलं जातं, हे यातून समजतं. 'प्रभो शिवाजी राजा' हा चित्रपट फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी आणि इंग्रजीमध्येही प्रदर्शित होणार आहे.  पाहूयात या अॅनिमेशनपटाचा दिग्दर्शक नीलेश मुळे याच्यासोबत केलेली खास बातचीत.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.