'एफडीआय'चा ग्लोबल गोंधळब्युरो रिपोर्ट बहुचर्चित असलेल्या एफडीआयवर लोकसभेत जोरदार महाचर्चा सुरू आहे. एफडीआयच्या मुद्द्याबाबत शाहीर संभाजी भगत यांनी 'भारत4इंडिया'वर 'ग्लोबल पोवाडा' सादर केलाय. (भाग- 1) शाहीर संभाजी भगत यांचा ग्लोबल गोंधळ! शाहीर संभाजी भगत गेली अनेक वर्षे सामान्य माणसांचं दुखणं आपल्या गाण्यातून तडफेनं मांडत आहेत. प्रस्थापित व्यवस्थेनं केलेली सामान्य माणसाची पिळवणूक, या शोषणाविरोधात भगतांनी आपल्या शाहिरीतून नेहमीच जागर केलाय. याच भूमिकेतून त्यांनी 'भारत4इंडिया'च्या व्यासपीठावर येऊन 'ग्लोबल गोंधळ' सादर केला. जो पहिल्यांदाच सगळ्यांच्या समोर येतोय. नव्या बदलामध्ये सामान्य माणूस आता कुठं आहे? त्याची जगण्याची साधनं नव्या व्यवस्थेत कशी उद्धस्त होताहेत हे त्यांनी या गोंधळातून मांडलंय. Tags |
||
Comments (2)
|