चला खेड्याकडं...

'भारत4इंडिया' या मराठी आणि इंग्लिश वेबपोर्टल वर तुमचं मनापासून स्वागत. 'भारत4इंडिया' हे व्यासपीठ आपल्या देशातलं पहिलं ग्रामीण न्यूज नेटवर्क आहे. आपला देश एका दिशेनं 'ग्लोबल' झालाय आणि दुस-या दिशेनं आपण आपल्याच देशातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांकडे, घडामोडींकडे, वंचितांकडे पाठ करून उभे आहोत. एकीकडे 'भारत' आणि दुसरीकडे 'इंडिया' अशी ही अवस्था आहे. या दोन्ही गोष्टी वर्तमानातलं वास्तव आहे. आपण सगळेच याकडे हतबल होऊन पाहू शकत नाही. भारत आणि इंडिया या दोन्हींच्यामध्ये संवाद, सहकार्य आणि सन्मान प्रस्थापित व्हायला हवा. माध्यमांची ताकद भारतामागे समर्थपणे उभी राहायला हवी. शहरीकरणासोबतच ग्रामीण भागाकडे प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज आहे. यासाठीच भारत4इंडिया हे व्यासपीठ आकारास आलं आहे. "सोशल नेटवर्क" या शब्दाची ताकद आताशा जाणवू लागली आहे. आपलं हे नवं माध्यम "भारत4इंडिया" ख-या अर्थानं जनतेचं व्यासपीठ व्हावं, सामान्य शेतकरी आणि मध्यमवर्गाच्या शोषण व्यवस्थेच्या विरोधातील संघर्षाचं माध्यम व्हावं, अशी आमची इच्छा आहे. भारत4इंडिया हे असं "नवं स्वप्नं" बघणा-या माध्यमांमधल्या चळवळ्या माणसांचं मोहोळ आहे. भारत4इंडिया ही सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींची ऑनलाइन आणि 'ग्रासरूट' चळवळ आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामीण आणि शहरी नागरिकानं सहभागी व्हावं.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.