बाजारभाव

फळे

   डाळिंब  -  ₹ 110 प्रति किलो
   पपई  -  ₹ 14 प्रति किलो
   आंबा  -  ₹ 100 प्रति किलो
   केळी  -  ₹ 10 प्रति किलो
   लिंबू  -  ₹ 18 प्रति किलो
   मोसंबी  -  ₹ 30 प्रति किलो
   द्राक्ष  -  ₹ 70 प्रति किलो
   चिकू  -  ₹ 18 प्रति किलो

भाज्या

   कांदा  -  ₹ 12 प्रति किलो
   बटाटा  -  ₹ 11 प्रति किलो
   कोबी  -  ₹ 6 प्रति किलो
   फ्लॉवर  -  ₹ 10 प्रति किलो
   मिरची  -  ₹ 26 प्रति किलो
   काकडी  -  ₹ 20 प्रति किलो
   आलं  -  ₹ 68 प्रति किलो
   मेथी  -  ₹ 12 प्रति जुडी
   पालक  -  ₹ 6 प्रति जुडी
   भेंडी  -  ₹ 35 प्रति किलो
   टॉमेटो  -  ₹ 10 प्रति किलो
   वाटाणा  -  ₹ 35 प्रति किलो

खिसा कापतोय बाजार ?

शेतकऱ्यानं काबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतमालाला काय भाव मिळावा याची कसलीच ठोस व्यवस्था सध्या उपलब्ध नाही. शेतमालाच्या घाऊक तसेच किरकोळ बाजारपेठेत दलाल, व्यापारी आणि विक्रेते यांची चांदी होत असताना उत्पादक शेतकरी व सामान्य ग्राहक मात्र भरडला जातोय. ढोबळमानाने `मागणी आणि पुरवठा` या तत्त्वावर शेतमालाचे भाव ठरत असल्याचं वरवर दिसत असलं तरी ते अर्धसत्य असल्याची बाब लपून राहिलेली नाही.सामान्य ग्राहकांना याचा उलगडा व्हावा, या उद्देशानं प्रचलित पद्धतीला फाटा देत पहिल्यांदाच नवीन स्वरूपात शेतमालाचे बाजारभाव देत आहोत. घाऊक बाजारातील चालू दरावरून किरकोळ दर काय असायला हवेत, हे येथे आम्ही दिलं आहे. त्यामध्ये वाहतूक खर्च, श्रम मूल्य इत्यादींचा समावेश करून दर काय असायला हवेत आणि प्रत्यक्षात किती पैसे मोजावे लागतात, यावरून तुमचा खिसा कापला जात नाही ना, याची जाणीव वाचकांना होईल.खरंच तसं होत असेल, तर आपण मिळून सारेजण वेगळी काही व्यवस्था निर्माण करू शकतो का किंवा तशा प्रयत्नांना साथ देण्याची भूमिका निभावू शकतो का, याचा ज्यानं-त्यानं विचार करावा. याबाबत आपल्या काही सूचना, विचार, प्रतिक्रिया येथे आवश्य नोंदवा.