नाशिक वाईन फेस्टिव्हल - 2013

रोहिणी गोसावी, नाशिक
मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी ओळख निर्माण झालेलं नाशिक शहर आता वाईन सिटी म्हणूनही उभारी घेतंय. ही ओळख निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी नाशिकमध्ये दोन दिवसीय 'वाईन फेस्टिव्हल -2013'चं आयोजन करण्यात आलं होतं. विकेंड असल्यामुळं हा वाईन फेस्टिव्हल नाशिककरांसाठी मेजवानीच ठरला.
 
रोहिणी गोसावी, नाशिक
द्राक्ष म्हटलं की, बागायती पीक असाच आपला समज आहे. परंतु सर्वाधिक द्राक्ष पिकणाऱ्या युरोप खंडात पाण्याशिवाय भरघोस प्रमाणात द्राक्ष घेतली जातात. युरोपातील पाण्याशिवाय द्राक्ष पिकवण्याची ही ट्रिक समजून घेऊन नाशिक जवळच्या लासलगावच्या (ता. निफाड) किशोर होळकर या प्रगतशील शेतकऱ्यानं मोठ्या हिकमतीनं माळरानावर द्राक्ष पिकवली. अत्यल्प पाण्यात सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या या द्राक्षांची गुणवत्ता जिभेला लगेच जाणवते. मग गुणवत्ता असल्यावर दराला काय तोटा? बाजारपेठेत इतरांपेक्षा त्यांच्या द्राक्षांना जादा भाव मिळतोय. चव हेच आमचं मार्केटिंग, असं ते छातीठोकपणं सांगतात. एवढी त्यांना द्राक्षांच्या गुणवत्तेबद्दल
 
रोहिणी गोसावी, नाशिक
पारंपरिक रंगांनी तयार केलेली अनेक पेंटिंग्ज आपण बघतो. पण नाशिकच्या श्रीकांत गोराणकर यांनी चक्क वाईनचा वापर करून पेंटिंग्ज तयार केली आहेत. ही वाईन पेटिंग्ज वाईन फेस्टिव्हलचं खास आकर्षण ठरलीत. नुकत्याच नाशिकमध्ये भरलेल्या दोन दिवसीय वाईन फेस्टिव्हलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर होता.
 
रोहिणी गोसावी, नाशिक
आपली शेती आणि शेतीपूरक उद्योग बदलत्या काळाशी जुळवून घेत नाहीत, मार्केटमधल्या ट्रेंड्सची माहिती ठेवत नाही, हा समज खोटा पडेल असा उपक्रम, राज्यातल्या वाईन उत्पादकांनी सुरू केलाय. त्यांनी वाईन आता चक्क छोट्या पाऊचमध्ये उपलब्ध करून दिलीय. त्यामुळं शॅम्पू, तेल, शीतपेयं आदींच्या सोबतच वाईनही पाऊचमध्ये परवडणाऱ्या किमतीत मिळताना दिसेल. यातून वाईनचा प्रसार तर झपाट्याने होईलच, शिवाय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होईल. नाशिकमध्ये पार पडलेल्या वाईन फेस्टिव्हलमध्ये पुण्याच्या पॉज वाईन्सनं वाईन पाऊचमध्ये सादर केली. या 'पाऊच वाईन'ला उत्तम प्रतिसादही मिळू लागलाय. राज्यातला
 
ब्युरो रिपोर्ट, नाशिक
वाईन म्हटलं, की आजही आपल्याकडं त्याला मद्य म्हणून हिणवलं जातं. मात्र, अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये लोकांच्या जीवनशैलीत वाईनला महत्त्वाचं स्थानं आहे. त्यामुळं वाईनचा उद्योग तिकडं चांगलाच आकाराला आलंय. वाईनची बाजारपेठ विस्तारण्यासाठी तिकडं वाईन फेस्टिव्हलची धूम असते. जर्मनी, फ्रान्समधील काही वाईन फेस्टिव्हल हे जागतिक इव्हेंट बनलेत. हीच बाब लक्षात घेऊन नाशिकला वाईन फेस्टिव्हल भरला. याला देशभरातील वाईनप्रेमींनी उपस्थिती लावली होती. नाशिक केंद्रबिंदू मानून राज्यात वाईन पर्यटनाचा विकास करण्याची घोषणा यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली. यंदा झालेल्या या वाईन फेस्टिवलचा 'भारत4इंडिया' मीडिया
 
ब्युरो रिपोर्ट
वाईन झोनमुळं जगाच्या नकाशावर 'भारताची वाईन कॅपिटल' अशी ओळख निर्माण केलेल्या नाशिकमध्ये येत्या 2 आणि 3 मार्चला वाईन फेस्टिव्हल होतोय. हॉटेल ज्युपिटर इथं होणारा हा 'इंडियन ग्रेप हार्वेस्ट वाईन  स्टिव्हल-2013' वाईन शौकिनांसाठी तर पर्वणी असेलच, शिवाय इटली, फ्रान्स आणि स्पेन या देशांच्या धर्तीवर तो होत असल्यानं साहजिकच नाशिकच्या वाईनची आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण होईल. यंदाच्या वाईन फेस्टिव्हलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर आहे.