टॉप ब्री़ड - घोटी

ब्युरो रिपोर्ट, घोटी, नाशिक
आपल्या कृषिप्रधान देशातील पशुधनाचं संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी सरकार पुढाकार घेत असतं. 'भारत4इंडिया'नं घेतलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेतून जे संचित हाती लागलंय ते सरकारी योजनांसाठी बळकटी देणारंच ठरणार आहे. घोटीला (जि. नाशिक) झालेल्या स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या 'टॉप ब्रीड'च्या रक्ताचे नमुने तपासून, त्यांचा जनुकीय अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबतचा अहवाल सादर करून 'डांगी'सारखी दुर्मिळ जात जगात केवळ नगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागातच आढळते, यावर शिक्कामोर्तब होईल.
 
विवेक राजूरकर, घोटी, नाशिक
शेतीप्रधान महाराष्ट्रातील बळीराजाच्या गुराढोरांना पशुधन का म्हणतात, याची प्रचीती जनावरांच्या बाजारात येते. काही हजारांपासून लाखात किमती असलेली दावणीची जनावरं अडीनडीला विकताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. तर काही जणांनी पोटापाण्याची वाट याच बाजारातून तयार केलीय. दुष्काळामुळं शेतकऱ्यांवर काय आपत्ती ओढवू शकते, तसंच शेतीमध्ये कितीही यांत्रिकीकरण झालं तरी बैलांना आजही पर्याय नाही, याची प्रचीतीही इथंच येते. घोटीत भरणाऱ्या जनावरांच्या बाजाराचं महत्त्व लक्षात घेऊन 'भारत4इंडिया'नं घेतलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेत याचं चित्र लख्खपणं समोर आलं.
 
ब्युरो रिपोर्ट, घोटी, नाशिक
कृषिप्रधान महाराष्ट्राचं पशुधन हे वैभव असून ते जपण्याचं, तसंच त्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम या अभिनव 'टॉप ब्रीड' स्पर्धेतून होत आहे. जनावरं, त्यांची जात, ब्रीड, यांचं कुठंतरी प्रदर्शन व्हायला पाहिजे. बळीराजाकडून जित्राबांची कशी काळजी घेतली जाते ते समाजापुढं आलं पाहिजे. शेतकऱ्यांना स्फूर्ती मिळावी, त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं, यासाठी 'टॉप ब्रीड'सारखे उपक्रम खेडेगावांमध्ये झाले पाहिजेत, अशा शब्दात नाशिकचे तरुण खासदार समीर भुजबळ यांनी 'भारत4इंडिया'च्या 'टॉप ब्रीड' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं.
 
ब्युरो रिपोर्ट, घोटी, नाशिक
'भारत4इंडिया'नं आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आलीय. स्पर्धेत सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांना उत्सुकता आहे, ती कोणाचं जित्राब ठरणार 'टॉप ब्रीड' याची. नाशिकचे तरुण खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते लवकरच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होत आहे. तिथंच 'टॉप ब्रीड' ठरलेल्या डांगी आणि खिल्लार जातींच्या बैलांना बक्षिसं दिली जाणार आहेत. या 'टॉप ब्रीड'च्या मानकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी इथला अवघा माहोल सज्ज झालाय.    
 
ब्युरो रिपोर्ट, घोटी, नाशिक
''भारत4इंडिया'' तर्फे आयोजित करण्यात आलेल्या खिल्लार आणि डांगी या जातिवंत बैलांच्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच स्पर्धेला सुरुवात झाली. शेतकरी आपापल्या बैलांना तयार करून स्पर्धेसाठी मांडवात हजर झाले. तर या स्पर्धेची सुरुवात डांगी बैलांच्या स्पर्धेनं झाली. या बैलांच्या तपासणीसाठी 15 डॉक्टरांचं पथक हजर आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्पर्धेत चांगल्याप्रकारे सजवून धजवून उतरवले आहेत तर ही स्पर्धा पाहण्यासाठी आसपासच्या गावातील अनेक गावकऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावली आहे. त्याची ही काही क्षणचित्रं....
 
ब्युरो रिपोर्ट, घोटी, नाशिक
'भारत4इंडिया'नं घोटीजवळ खंबाळे इथं आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' या अभिनव स्पर्धेचं, तसंच  'जागर पाण्याचा' या उपक्रमाचं उद्घाटन झोकात झालं. पडणाऱ्या पावसाचा थेंब न् थेंब अडवून त्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी आता आपल्यालाही इस्रायली तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. तसं केलं तरच इथून पुढं दुष्काळावर मात करता येईल, असं ज्येष्ठ जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितलं. 'जागर पाण्याचा' या उपक्रमातील यशोगाथांमुळं दुष्काळाशी दोन हात करताना आता आम्हाला आणखी बळ येईल, अशा प्रतिक्रिया गावोगावच्या शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवल्या.
 
ब्युरो रिपोर्ट, घोटी, नाशिक
'भारत4इंडिया'नं घोटीजवळ खंबाळे इथं 'टॉप ब्रीड' या अभिनव स्पर्धेचं आयोजन केलंय. त्याच्या उद्घाटन समारंभात आज (29मार्च) सायंकाळी 'जागर पाण्याचा' घातला जातोय. हजारो शेतकरी आणि त्यांची हजारो जातिवंत जित्राबं यांच्या साक्षीनं सुरू होत असलेला हा पाण्याचा जागर दुष्काळाची आपत्ती इष्टापत्तीत पालटण्याची प्रेरणा शेतकऱ्यांना देईल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी यापूर्वीच बोलून दाखवलाय. त्यामुळंच शुभारंभानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांपुढं, तसंच अगदी चारा छावण्यांमधूनही पाण्याचा हा जागर घालण्याचा आमचा मानस आहे.
 
अपर्णा देशपांडे/सुखदा खांडगे, घोटी, नाशिक
कामधेनूच्या लेकरांसाठी 'भारत4इंडिया'नं आयोजित केलेल्या 'टॉप ब्री़ड' स्पर्धेसाठी बळीराजाच नव्हे तर बैलही सजूनधजून आले आहेत. कुणी आपल्या लाडक्या जित्राबांना आंघोळ घालण्यात, कुणी त्यांना घुंगरू बांधण्यात, कुणी चारा देण्यात, तर कुणी जनावरांना घेऊन डॉक्टरांकडं जाण्याची धावाधाव करतोय. लगीनघरी जशी धावपळ सुरू असते अगदी तश्शीच धावपळ इथं पाहायला मिळतेय. आतापर्यंत सुमारे पाच हजारांवर शेतकरी जित्राबांसह स्पर्धेसाठी आल्यानं घोटीजवळच्या खंबाळे गावाला जत्रेचंच स्वरूप आलंय.
 
ब्युरो रिपोर्ट, घोटी, नाशिक
प्रत्येक मातीची आपली म्हणून काही वैशिष्ट्यं असतात. त्यात मराठी मातीचा गंध न्याराच... इथं अभंगही आहे आणि लावणीही. इथल्या मातीत अक्षरक्ष: सोनं पिकतं. ते पिकवण्यात बळीराजाला हातभार लागतो तो ढवळ्यापवळ्याचा. डांगीपासून खिल्लारपर्यंतचे जातिवंत बैल ही मराठी मातीची शान. कालौघात सध्याच्या हायब्रीडच्या जमान्यात ती नष्ट होते की काय, अशी परिस्थिती आहे. त्यामुळंच सध्याच्या पिढीला आपलं हे नक्षत्रांचं देणं समजावं, त्यांचं संगोपन व्हावं आणि ही मराठी मातीची देन वाढावी, यासाठी 'भारत4इंडिया'नं 'टॉप ब्रीड' या अभिनव स्पर्धेचं शिवधनुष्य हाती घेतलंय. त्याचा शुभारंभ आज (29मार्च)