तुळजापुरात 'जागर पाण्याचा'

विवेक राजूरकर, तुळजापूर
दर आठ-दहा वर्षांनी दुष्काळ पडतोच आणि आपण केवळ 'दुष्काळ, दुष्काळ' असा जप करत मायबाप सरकारच्या वाटेवर डोळे लावून बसतो. दुष्काळावर मात करण्यासाठी सध्या तरी जलसाक्षरता हाच उपाय आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या तुळजापूर शाखेनं पडणाऱ्या आणि वापरात येणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब कारणी लावलाय. त्यांचा हा उपक्रम कोणत्याही मोठ्य़ा संस्था, सोसायट्या यांनी आवर्जून अनुकरण करावं, असाच आहे.
 
विवेक राजूरकर, तुळजापूर
तुळजापूरच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या चौथ्या नॅशनल युथ फेस्टिव्हलमध्ये वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आले होते. पाण्याच्या वापराबाबत, तसंच सद्य दुष्काळी परिस्थितीबाबत साक्षर करण्यासाठी माहितीवर हे स्टॉल्स होते. तसंच सरकारच्या विविध योजनांचीही माहिती यात देण्यात आली. 'पाण्याचा एक एक थेंब वाचवूया आणि जलसाक्षरता, जलपुनर्भरण करूया,' हे व्रत घेऊन सगळ्यांनीच यात सहभाग घेतला. 'भारत4इंडिया' या फेस्टिव्हलचा मीडिया पार्टनर होता. याचाच आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ विवेक राजूरकर यांनी...
 
विवेक राजूरकर, तुळजापूर
विद्यार्थी वर्गात शिक्षक म्हणून नेहमीच रमणाऱ्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी तुळजापूरच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या चौथ्या नॅशनल युथ फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन तरुणांना जलसंवर्धनावर मार्गदर्शन केलं. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी तरुणांपुढं मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
 
यशवंत यादव
तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या चौथ्या राष्ट्रीय युवक महोत्सवास भेट देण्यास आलेल्या युवा शेतकऱ्यांनी पाण्याच्या वापराबाबत, तसंच सद्य दुष्काळी परिस्थितीबाबत आपलं मत भारत4इंडियाशी बोलताना व्यक्त केलं.
 
विवेक राजूरकर, तुळजापूर
तुळजापूरच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या चौथ्या नॅशनल युथ फेस्टिव्हलला सुरुवात झालीय. या फेस्टिव्हलची मध्यवर्ती संकल्पना `युथ अॅण्ड वॉटर-मेकिंग एव्हरी ड्रॉप काऊंट` ही आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळानं भेडसावलं आहे. दुष्काळाच्या या पार्श्वभूमीवर पाण्याचा एक एक थेंब वाचवूया आणि जलसाक्षरता, जलपुनर्भरण करूया हे व्रत युवा पिढीनं घेतलंय.
 
यशवंत यादव/विवेक राजूरकर, तुळजापूर
तुळजापूरच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या (टीस)चौथ्या नॅशनल युथ फेस्टिव्हलसाठी देशभरातून आलेल्या हजारांवर तरुणाईनं पाण्याचा जागर घालण्यासाठी गावागावांतच नव्हे तर अगदी बांधाबांधापर्यंत जाण्याचा निर्धार केला. गेले तीन दिवस सुरू असणाऱ्या या फेस्टिव्हलची आज रात्री सांगता झाली. त्यावेळी तरुणांनी हा निर्धार बोलून दाखवला. `युथ अॅण्ड वॉटर-मेकिंग एव्हरी ड्रॉप काऊंट` ही या फेस्टिव्हलची मध्यवर्ती संकल्पना होती. तरुणांना इथून मिळालेलं टॉनिक आणि त्यांनी केलेला निर्धार पाहता हा फेस्टिव्हल य़शस्वी झाल्याची भावना 'टीस'च्या प्राध्यापकांनीही बोलून दाखवली.
 
यशवंत यादव
तुळजापूर -  टाटा सामजिक विज्ञान संस्थेच्या (टीस) `स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट`मध्ये `नॅशनल रुरल युथ फेस्टीव्हल' 25 जानेवारीपासून सुरु होणार असून `युथ एन्ड वॉटर- मेकिंग एव्हरी ड्राप कॉऊंट` ही या फेस्टीव्हलची मुख्य थीम आहे. 27 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या फेस्टीव्हलचा 'भारत4इंडिया' ऑनलाईन मीडिया पार्टनर आहे.