भारतीय राजकारण्यांना काही अपवाद वगळता कलेचे वावडेच आहे. अटल बिहारी वाजपेयी कविता करत. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार होते. विश्वनाथ प्रतापसिंग चित्र काढत . हे झाले अपवाद. कपिल सिब्बल कविता करून मेसेजवर पाठवतात पण त्या कवितांचा दर्जा संशयास्पद आहे. विश्वनाथ प्रतापसिंग यांना प्रसिद्ध चित्रकार समीर मोंडल काही महिने चित्रकला शिकवत होता.नंतर विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या चित्रांचे प्रदर्शनही मुंबईत झाले ,पण दर्जा यथातथाच होता.एम.एफ.हुसेन, आर. के. नारायण, लता मंगेशकर यांना राज्यसभेत स्थान देण्यात आले. पण यातील कुणीच राज्यसभेत फारसा आवाज उठवला नाही.
EasyBlog
This is some blog description about this site
मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा कराडला येऊन यशवंतराव साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यावर मुख्यमंत्री ही किती मोठी जबाबदारी आहे, याची खऱ्या अर्थानं जाणीव झाली. दोन वर्षांपूर्वी नव्यानंच मुख्यमंत्री झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी काढलेले हे उदगार आहेत. वास्तविक पृथ्वीराज तथा बाबा हे यशवंतरावांविरोधी गटातील आनंदराव चव्हाण व प्रेमलाकाकी चव्हाण यांचे सुपुत्र. नेहरू-गांधी घराण्याशी निष्ठावान असलेलं हे घराणं. आनंदरावांच्या निधनानंतर प्रेमलाकाकी व त्यांच्या मृत्यूनंतर बाबांकडे राजकीय वारसा आला.
नुकताच सातारा जिल्ह्यातल्या खटाव, माण या दुष्काळी तालुक्याचा दौरा करून आलो. पिण्याच्या पाण्याची भयाण स्थिती नोव्हेंबरमध्येच झालीय. आता एप्रिल-मे महिन्यात तर इथल्या लोकांना पाण्यामुळं स्थलांतर करावं लागणार आहे. आता घरातली गुरढोरं सरकारी छावणीत दाखल झालीत. अनेक वस्त्यांवर आत्ताच पिण्याचं पाणी चार दिवसातनं एकदा येतं.
शेती सन्माननीय उद्योग! Featured
मेहेरगढ येथील सापडलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांनुसार भारतातील शेतीचा उगम इसवी सन पूर्व किमान दहा हजार वर्षं एवढा असावा किंवा तो त्याहीपेक्षा पुरातन असला पाहिजे. सिंधू संस्कृतीत शेती अत्यंत भरभराटीला आली होती. नद्यांचे प्रवाह बांध घालून अडवणं, पाटांद्वारे शेतीला पाणी पुरवणं या कला सिंधु मानवानं साधल्या होत्या. त्यामुळंच वैभवशाली अशी ही संस्कृती नगररचना, उद्योग आणि व्यापारातही प्रगत झाली.
मी सोलापूर जिल्ह्यातला. आमच्या जिल्ह्यात दुष्काळ नेहमीच पाचवीला पुजलेला. 1972 साली दुष्काळ पडला, त्या दुष्काळात भयानक उपासमार झाली. लोकांनी बरबट्याच्या (जंगली झुडूप) भाकरी खालल्याचे जुनी माणसं सांगतात.