EasyBlog

This is some blog description about this site

गुराखी

नामशेष होत असलेली पशुजैवविविधता

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 3972
  • 2 Comments

    महाराष्ट्रातील पशुजैवविविधतेमध्ये गाय आणि म्हैस प्रामुख्यानं लोकोपयोगी समजल्या जातात. गाईमध्ये देवणी, खिल्लार, डांगी, लालकंधारी, गवळाऊ या तसंच म्हशींमध्ये पंढरपिरी, नागपुरी, अशा जातींचा समावेश केला जातो. एकुण पशुसंख्येमध्ये दुधाळ जातीचं प्रमाण खुप कमी आहे. तर गावठी गाई-मह्शींचं प्रमाण एकुण संख्येच्या ¾ आहे. दुधाळ पशुंमध्ये अशा गाई-म्हशींचा उपयोग दुधासाठी व्हावा असी धारणा असली तरीही शेतीपद्धतीमध्ये दुधाव्यतिरीक्त अनेक बऱ्याच गोष्टींकरीता त्यांचा उपयोग होत असतो. म्हणुन या जाती शतकानुशतके त्यांचा दुधाशिवाय इतर गोष्टींमध्ये उपयोग असल्यानं त्या टिकुन आहेत.

    गावठी जनावरांचे प्रमाण त्यांच्या उपयोगितेच्या दृष्टीने बारकाईनं अभ्यासणं गरजेचं आहे. पशुजातींच्या मुळस्थानाशिवाय राज्याच्या अन्य भागात शेतकरी गरजेप्रमाणे त्याला हव्या असलेल्या जनावरांचे गुण लक्षात घेऊन अशा गुणांना प्राधान्य असलेली जनावरे बाजारातुन विकत घेतो आणि नको असलेली बाजारात विकतो. पशु प्रजननाची आणि पशु निवडीच्या विशिष्ट पद्धतीच्या माहिताच्या अभावामुळं गावठी आणि संकरीत पशुंची संख्या जास्त होते.

    दुग्ध व्यवसायाचे सबलिकरण करण्यासाठी इतर राज्यातुन येणाऱ्या पशुंची आयात केल्यामुळं त्याचा दुरगामी परिणाम स्थानिक पशुपालन व्यवस्थेवर होऊ शकतो. वयोवृद्ध आणि परंपरागत पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करताना असं जाणवतं की, जुन्या काळी काही पशुंच्या जाती उपलब्ध होत्या, कालांतराने संकरीकरणामुळं ह्या जाती अतिशय कमी झाल्या. आणि आता त्यांची जात म्हणजे गावठी एवढीच ओळख त्यांना उरलीये.

    विदर्भातील जुन्या पशुपालकांच्या तसंच महाराष्ट्र सरकारच्या गॅझेटमधील संदर्भानुसार असं आढळतं की, अकोला ते चंद्रपुर या भागात 11 जाती होत्या, ज्यांचा आता नामोल्लेखही कुठं आढळत नाही. त्या जातींची नावं पुढीलप्रमाणं आहेत.

 

वर्धा – गवळाऊ , गोंडी, नागपुरी

यवतमाळ – घाटोडे

अमरावती – उमरडा, खामगावर, पहाडी

अकोला – बंजारा, शिंगाजी

चंद्रपुर – तेलंगपत्ती, माहिरपत्ती

     यापैकी प्रामुख्यानं गवळाऊ ही एकच जात भारतीय गोवंश जातीत समाविष्ट झालीये. इतर जातींबद्दल शेतकऱ्यांना किंवा किंवा सरकारला माहीतीही नाहीये. गवळाऊ सोडली तर कोणत्याही शेतकऱ्याकडे वरीलपैकी गोणत्याही जातीची गाय आढळत नाही.

 

    गडचिरोली, चंद्रपुर, गोंदीया या जिल्ह्यांमध्ये असलेल्या जंगलात पारंपारिक पद्धतीनं संगोपन न केल्यामुळं तसंच आदीवासी भागात दुग्धोत्पादन किंवा दुधाचा वापर अत्यल्प असल्यामुळं आणि दुधासाठी त्यांची निवड न झाल्यामुळं इतर भागात या जातींचा प्रसार झाला नसावा असा अंदाज व्यक्त केला जातो.

    ढोबळमानानं असं जाणवतं की प्रजननासाठी वळुंची निवड ही करताना कुठलेही विशिष्ट गुण लक्षात न घेता त्यांचा आकार आणि काटकपणा यावर भर दिला जातो. त्यात त्याची जात फार विचारात घेतली जात नाही आणि संकरीत जात तयार होते. इतर भारतीय गोवंश जातींप्रमाणे अशा जातींमध्ये रोगांचं प्रमाण अत्यल्प आहे. तसंच अत्यंत कठीण परिस्थितीत तग धरुन शेती आणि संबंधित काम करण्याची क्षमता आणि प्रजोत्पादन या जातींमध्ये दिसुन येते. अशा प्रकारच्या जनावरांची संख्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात आहे. पम विदर्भाची मुळ जात मात्र यामुळं नष्ट होत चालली आहे.

     गोवंश जातीच्या जैवविविधतेमध्ये संरक्षण आणि संगोपन करण्यच्या दृष्टीनं या जातींचे सखोल परिक्षण आणि अभ्यास करणे, तसंच देशस्तरावर याची नोंद घेणे आवश्यक आहे. राज्यातील शेतकी विद्यालयांतुन या जातींचा विविध अंगानं अभ्यास केल्यास त्यांची सध्यस्थिती आणि क्षमता यावर प्रकाश पडु शकेल. संवयंसेवी संस्थांच्या सहयोगानं आदिवासी भागात याविषयी जागृतीवर भर देऊन सध्याच्या माहितीस्तरामध्ये वाढ करुन प्रसार आणि उन्नतीकडे लक्ष दिले गेले पाहिजे. ‘राष्ट्रीय पशुअनुवंशकिय संस्थान, कर्नाल’ इथं या जातींचा राष्ट्रीय स्तरावर पंजीकरण करण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत. असं झालं तर महाराष्ट्रातील गोवंश अनुवंशतेबद्दल पशुजैवविविधतेबद्दल राज्याची मान उंचावेल.

 

  

People in this conversation

Comments (2)

  • The गोंड jat caste is still in the Gondia district but may not be having knowledge about the local strain of the cows or goats. it is a costly affair to identify and maintain the cattle types and that may be one of the reasons for negligence towards the local level maintenance of them. certainly the govt agencies has to take care but first the primary studies with confirm results should be in hand.

  • Excellent

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.
सजल कुलकर्णी has not set their biography yet