Hide Main content block
रोहिणी गोसावी,

        काय काळजी घ्यावी – सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकू नका- सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वस्तुला हात लावणे शक्यतो टाळा-  सार्वजनिक ठिकाणी फिरताना आपल्या तोंडाला, नाकाला किंवा डोळ्यांना हात लावणं टाळा- बाहेरुन आल्यावर आधी हात स्वच्छ धुवा-  शक्य होईल तेवढे आपले हात स्वच्छ धुवत जा– पूर्णपणे शिजवलेले अन्न खा– शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा– प्ल्युची लक्षणं दिसल्यास त्वरीत डॉक्टरकडे जा– खोकल्यावर, शिंकल्यानंतर, आजारी व्यक्तीची काळजी घेताना, स्वयंपाक करण्यापूर्वी, जेवण तयार करताना, स्वयंपाक झाल्यानंतर, जेवणापूर्वी, शौचानंतर आणि प्राण्याचा सांभाळ केल्यानंतर आणि त्यांची विष्ठा काढल्यानंतर साबणाने स्वच्छ

        काय काळजी घ्यावी – सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकू नका- सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वस्तुला हात लावणे शक्यतो टाळा-  सार्वजनिक ठिकाणी फिरताना आपल्या तोंडाला, नाकाला किंवा डोळ्यांना हात लावणं टाळा- बाहेरुन आल्यावर आधी हात स्वच्छ धुवा-  शक्य होईल तेवढे आपले हात स्वच्छ धुवत जा– पूर्णपणे शिजवलेले अन्न खा– शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा– प्ल्युची लक्षणं दिसल्यास त्वरीत डॉक्टरकडे जा– खोकल्यावर, शिंकल्यानंतर, आजारी व्यक्तीची काळजी घेताना, स्वयंपाक करण्यापूर्वी, जेवण तयार करताना, स्वयंपाक झाल्यानंतर, जेवणापूर्वी, शौचानंतर आणि प्राण्याचा सांभाळ केल्यानंतर आणि त्यांची विष्ठा काढल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुणे गरजेचे आहे.  
मंगळवारी (ता. ३) वांग्याची आवक २६४ क्विंटल झाली. त्यांना किमान ७०० ते २५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १४२८ रुपये होता. सोमवारी (ता. २) वांग्यांची आवक २६५ क्विंटल झाली. त्यास ६०० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० रुपये होता. रविवारी (ता. १) वांग्यांची आवक २६४ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० होता.
गेल्या पंधरा वर्षांचं आघाडीचं वर्चस्व झुगारुन महाराष्ट्राच्या जनतेनं अखेर परिवर्तन घडवलं. 16 व्या विधानसभा निवडणुकीचे निकाल मतदारांच्या अपेक्षेप्रमाणे लागले. गेली 15 वर्ष महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारुन जनतेनं भाजपला पहीली तर शिवसेनेला दुसरी पसंती दिली. भाजपला पुर्ण बहुमत मिळालं नसलं तरीही 122 जागा मिळवत भाजप नंबर 1 चा पक्ष ठरलाय. भ्रष्टाचार, स्त्रीयांवरील अत्याचार, घोटाळे यांना कंटाळलेल्या महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपवर विश्वास टाकून महाराष्ट्राच्या भवितव्याची धूरा सोपवलीये.
जनतेला 'अच्छे दिन' चं स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारनं त्यांच्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा विचार करुन रेल्वेतुन वाहतुक होणाऱ्या शेतीमालासाठी वातानुकुलित गोदामं बांधण्याचा मानस व्यक्त केलाय. तर शेती माल, दुध आणि फळांच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल प्रवासादरम्यान खराब होणार नाही, त्यामुळं शेतकऱ्यांसाठी हे बजेट काही प्रमाणात दिलासादायक असलं तरी एकंदरीत बजेटचा विचार केला तर मात्र बजेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानंच पुसल्याचं चित्र आहे.
 विठुचा गजर...हरिनामाचा झेंचा रोवला....विठ्ठल विठ्ठल जय हारी...असं आपल्या लाडक्या विठुरायाचं गुणगान करत हजारो भाविक पंढपुरकडं निघालेत. आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र तसंच अगदी भारतभरातुन वारकरी पंढरपुरला येत असतात. विठुनामाच्या गजरात ते चालत असतात, विठुरायाच्या भेटीची ओढ इतकी असते की त्यापुढे त्यांना थकवा जाणवत नाही. या वारीच्या संपुर्ण प्रवासात हरीनाम हा त्यांचा ऊर्जास्त्रोत असतो. हजारो वारकरी दर वर्षी न चुकता या वारीत सहभागी होत असतात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहुन निघालेले हे वारकरी 9 जुलैच्या आषाढी एकादशीला पंढरीला पोहोचतील आणि आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊन परत फिरतील.
thumbnail
  इतरांना आधार देणारी आजची स्त्री महिला हा शब्द उच्चारताच प्रेम, वात्सल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात. पण त्याचबरोबर शक्तिसंपन्न स्त्रीही समोर उभी राहते. कारण आता स्त्री ही
thumbnail
मुंबईत 1 मार्चला बहुभाषिक विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन झालं. वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये भाषावाद, प्रांतवाद सांस्कृतिकवाद यावर चर्चासत्रं पार पडली. तसंच शाहिरी जलसा ,बहुभाषिक कवी संमेलन चित्र प्रदर्शन लघुपट सादरीकरण आदी कार्यक्रमही झाले.
द्राक्ष म्हटलं की, बागायती पीक असाच आपला समज आहे. परंतु सर्वाधिक द्राक्ष पिकणाऱ्या युरोप खंडात पाण्याशिवाय भरघोस प्रमाणात द्राक्ष घेतली जातात. युरोपातील पाण्याशिवाय द्राक्ष पिकवण्याची ही ट्रिक समजून घेऊन नाशिक जवळच्या लासलगावच्या (ता. निफाड) किशोर होळकर या प्रगतशील शेतकऱ्यानं मोठ्या हिकमतीनं माळरानावर द्राक्ष पिकवली. अत्यल्प पाण्यात सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या या द्राक्षांची गुणवत्ता जिभेला लगेच जाणवते. मग गुणवत्ता असल्यावर दराला काय तोटा? बाजारपेठेत इतरांपेक्षा त्यांच्या द्राक्षांना जादा भाव मिळतोय. चव हेच आमचं मार्केटिंग, असं ते छातीठोकपणं सांगतात. एवढी त्यांना द्राक्षांच्या गुणवत्तेबद्दल खात्री आहे. आता बोला...!    
पुणे - भारतातील शेतकरी आणि इंडियातील नागरिक यांना जोडणारं नव्या युगाचं, नव्या दमाचं माध्यम,  अशी ओळख बनलेल्या 'भारत4इंडिया.कॉम'चा स्टॉल प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांच्या औत्सुक्याचा विषय झालाय. पहिल्याच दिवशी स्टॉलभोवती शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती.  माध्यमांकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसतं.
शेतीप्रधान महाराष्ट्रातील बळीराजाच्या गुराढोरांना पशुधन का म्हणतात, याची प्रचीती जनावरांच्या बाजारात येते. काही हजारांपासून लाखात किमती असलेली दावणीची जनावरं अडीनडीला विकताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. तर काही जणांनी पोटापाण्याची वाट याच बाजारातून तयार केलीय. दुष्काळामुळं शेतकऱ्यांवर काय आपत्ती ओढवू शकते, तसंच शेतीमध्ये कितीही यांत्रिकीकरण झालं तरी बैलांना आजही पर्याय नाही, याची प्रचीतीही इथंच येते. घोटीत भरणाऱ्या जनावरांच्या बाजाराचं महत्त्व लक्षात घेऊन 'भारत4इंडिया'नं घेतलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेत याचं चित्र लख्खपणं समोर आलं.
कृषिप्रधान महाराष्ट्राचं पशुधन हे वैभव असून ते जपण्याचं, तसंच त्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम या अभिनव 'टॉप ब्रीड' स्पर्धेतून होत आहे. जनावरं, त्यांची जात, ब्रीड, यांचं कुठंतरी प्रदर्शन व्हायला पाहिजे. बळीराजाकडून जित्राबांची कशी काळजी घेतली जाते ते समाजापुढं आलं पाहिजे. शेतकऱ्यांना स्फूर्ती मिळावी, त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं, यासाठी 'टॉप ब्रीड'सारखे उपक्रम खेडेगावांमध्ये झाले पाहिजेत, अशा शब्दात नाशिकचे तरुण खासदार समीर भुजबळ यांनी 'भारत4इंडिया'च्या 'टॉप ब्रीड' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं.
दुष्काळावर मात करण्यासाठी नाना प्रयत्न सुरू आहेत. पण या टंचाईवर मात करू शकणारं अफलातून उत्तर शोधलं गेलंय, सोलापुरातल्या अंकोलीच्या माळरानावर. इथं चक्क पाण्याची बँक उभी राहिलीय. या वॉटर बॅंकेचे निर्माते आहेत, प्रा. अरुण देशपांडे नावाचे शेती शास्त्रज्ञ. त्यांच्या या प्रयत्नाची दखल आता सरकारनंही दखल घेतलीय. माळावरच्या या वॉटर बँकेला पर्यटन केंद्राचा दर्जा मिळालाय.
thumbnail
मराठवाड्यासह सोलापूर, सांगली इथं काल अवकाळी पावसानं थैमान घातलं. या पावसात गारांचा खच रस्त्यावर पडला होता. अचानक झालेल्या निसर्गाच्या या अवकृपेनं शेतीचं प्रचंड नुकसान झालं. या पावसाचा व्हिडीओ पाठवलाय विजयकुमार बाबर यांनी.
thumbnail
ठाणे जिल्ह्यातील सोनेन गावातील 'क्वेस्ट'  या आदिवासी शाळेतील मुलांनी सादर केलेलं गीत.
thumbnail
'भारत4इंडिया' या मराठी आणि इंग्लिश वेबपोर्टल वर तुमचं मनापासून स्वागत. 'भारत4इंडिया' हे व्यासपीठ आपल्या देशातलं पहिलं ग्रामीण न्यूज नेटवर्क आहे.
thumbnail
नारळ विमा योजना या विषयी दापोलीचे तालुका कृषी अधिकारी व्ही. एम. कोथिंबिरे यांनी दिलेली माहिती.

images2

घाऊक बाजारातील चालू दरावरून किरकोळ दर काय असायला हवेत, हे इथं आम्ही दिलं आहे.