'भारत4इंडिया'नं नाशिक जिल्ह्यातील घोटीजवळील (ता. इगतपुरी) खंबाळे इथं डांगी आणि खिल्लार या जातिवंत बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना खासदार भुजबळ यांच्या हस्ते बक्षिसं वितरित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. 29 आणि 30 मार्च असे दोन दिवस झालेल्या या स्पर्धेत डांगी विभागात अशोक तुपे (बेलू, ता. सिन्नर), तर खिल्लार विभागात नामदेव चव्हाण (माणिकखांब, ता. इगतपुरी) यांचे बैल 'टॉप ब्रीड' ठरले. याशिवाय दोन्ही विभागांत मिळून एकूण 30 बैलांवर 'टॉप ब्रीड'ची मोहोर उठली. सर्व विजेत्या 'टॉप ब्रीड'च्या मालकांना समीर भुजबळ यांच्या हस्ते ढाल, रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आलं.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवीनाना पगार, संपतराव काळे, निवृत्ती काळे, गोरख बोडके, सुनील वाजळे, भाऊसाहेब धोंगडे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सध्या भीषण दुष्काळ आहे. एवढा महाभयंकर दुष्काळ मी पहिल्यांदाच बघतोय. सर्वांना पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध करून देणं, हे मोठं आव्हान आहे. त्यामुळं सर्वांनी जपून पाणी वापरावं, तसंच आपल्याजवळील गरजेपेक्षा जादा पाणी इतरांची तहान भागवण्यासाठी उपलब्ध करून देणं, हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, असंही भुजबळ यांनी सांगितलं. भुजबळ फाऊंडेशनतर्फे नाशिकमध्ये दरवर्षी फेस्टिव्हल साजरा केला जातो. परंतु दुष्काळामुळं यंदा तो रद्द करून त्याचा निधी जिल्ह्यातील तलाव, बंधारे, कालवे यांतील गाळ काढून ते स्वच्छ करण्यासाठी वापरला जाणार आहे. जेणेकरून उपलब्ध पाणी जिल्ह्याला वर्षभर पुरलं पाहिजे, यादृष्टीनं भुजबळ फाऊंडेशनतर्फे काम केलं जाणार आहे, असंही खासदार भुजबळ यावेळी म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेला स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे...
डांगी
टॉप ब्रीड / डांगी – अशोक तुपे, बेलू, सिन्नर
अदात प्रथम- श्री. कचरू रामा घोडसरी, समशेरपूर
अदात व्दितीय - श्री. ज्ञानेश्वर कडू, खडकवाडी
अदात तृतीय - श्री. गोविंद पारधी, बोरली, इगतपुरी
दोन दात प्रथम- श्री. गणपत पिचड, डोंगरवाडी, इगतपुरी
दोन दात व्दितीय - श्री. पांडुरंग अहिलाजी जाखेरे, मोगरे, इगतपुरी
दोन दात तृतीय - श्री. विष्णू रामचंद्र खेगडे, पाडळी
चार दात प्रथम - श्री. बाळू हरी भवारी पिंपळगाव मोर, इगतपुरी
चार दात व्दितीय - श्री. मधुकर कदम, माणिकओझर, अकोले, नगर
चार दात तृतीय - श्री.मारूती आरशेंडे, बोरटेंभे, इगतपुरी
सहा दात प्रथम - श्री. अशोक तुपे, बेलू, सिन्नर
सहा दात व्दितीय - श्री. सागर गव्हाणे, कांचनगाव
सहा दात तृतीय - श्री. तुकाराम सोनवणे, खेड
जुळलेले दात प्रथम - श्री. सागर गव्हाणे, कांचनगाव
जुळलेले दात व्दितीय - श्री. भीमराव खंडू भांगरे, एकदरा, अकोले
जुळलेले दात तृतीय - श्री. राजाराम एखंडे, टाहकरी, अकोले
कालवड प्रथम - श्री.कचरू ठका डोन्नर, अधरवड
कालवड व्दितीय - श्री. रूंझा लक्ष्मण बऱ्हे, अधरवड
खिल्लार
टॉप ब्रीड / खिल्लार – श्री. नामदेव चव्हाण, माणिकखांब
अदात प्रथम - श्री. सुरेश म्हात्रे, बोरटेंभे
अदात व्दितीय - श्री. भगवान चव्हाण, माणिकखांब, इगतपुरी
अदात तृतीय - श्री. अशोक यादव, इगतपुरी
दोन दात प्रथम - श्री. नरेंद्र चांडक, घोटी
दोन दात व्दितीय - श्री. शिवाजी लक्ष्मण घारे, तळोघ, इगतपुरी
दोन दात तृतीय - श्री. हरिभाऊ निर्मळ, टाकेद, इगतपुरी
चार दात प्रथम - श्री. नामदेव चव्हाण, माणिकखांब
चार दात व्दितीय - श्री. नामदेव लंघडे, तळोघ, इगतपुरी
चार दात तृतीय - श्री. दीपक महादू लगड, टाकेद खुर्द, इगतपुरी
सहा दात प्रथम - श्री. अशोक बुधाजी कातोरे, सिन्नर
सहा दात व्दितीय - श्री. यशवंत कडू, अवचितवाडी, इगतपुरी
सहा दात तृतीय - श्री. शिवाजी घारे, तळोघ
जुळलेले दात प्रथम - श्री. निवृत्ती गतीर, मुंडेगाव
जुळलेले दात व्दितीय - श्री. राघाजी रोकडे, देवळे, इगतपुरी
जुळलेले दात तृतीय - श्री. गणेश आडोळे, टाकेघोटी, इगतपुरी
Comments (2)
-
-
its really a very good compitition and we the veterinarian always ready to do such type of work .