''भारत4इंडिया'' तर्फे आयोजित करण्यात आलेल्या खिल्लार आणि डांगी या जातिवंत बैलांच्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच स्पर्धेला सुरुवात झाली. शेतकरी आपापल्या बैलांना तयार करून स्पर्धेसाठी मांडवात हजर झाले. तर या स्पर्धेची सुरुवात डांगी बैलांच्या स्पर्धेनं झाली. या बैलांच्या तपासणीसाठी 15 डॉक्टरांचं पथक हजर आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्पर्धेत चांगल्याप्रकारे सजवून धजवून उतरवले आहेत तर ही स्पर्धा पाहण्यासाठी आसपासच्या गावातील अनेक गावकऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावली आहे. त्याची ही काही क्षणचित्रं....
स्पर्धेत सहभागी बैलांसाठी चाऱ्याचीही सोय
बैलांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी केली
दिमाखदार पध्दतीनं बैलांचं मांडवात आगमन झालं
स्पर्धेसाठी बैलांना सजवून - धजवून आणण्यात आलं
विविध आभूषणांनी सजून बैल स्पर्धेसाठी सज्ज झालेत
15 डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी रिंगणात दाखल
डॉक्टरांकडून डांगी बैलांच्या विविध तपासण्या सुरू
विविध तपासण्यानंतर होणार ''टॉप ब्रीड'' बैलाची घोषणा
आपापल्या जनावरांसह स्पर्धेचा निकाल ऐकण्यासाठी प्रतीक्षेत उभे असलेले शेतकरी
Comments (3)
-
Its gr8 pleasure for me to have such a amazing experience working with bharat4india thanx
-
An excellent show! A really nice arrangement. Congrats to whole team of bharat4india!!
-