जागर पाण्याचा

सेवागिरी ट्रस्टचा जलसंधारणासाठी पुढाकार

शशिकांत कोरे, पुसेगाव,सातारा
दुष्काळी भागातील यात्रा म्हणजे पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव. इथल्या रथोत्सवात येणारे भाविक मोठ्या प्रमाणात दहा, शंभर, पाचशे रुपयांचे हार अर्पण करत असतात. लोकांनी सढळ हातानं दिलेल्या या पैशांचा काळजीपूर्वक वापर करून इथल्या देवस्थान ट्रस्टनं जलसंधारणाच्या विविध योजना राबवल्यात. याचा फायदा इथल्या भागातील लोकांना होतोय.
 

Pusegaon trust talav bharat4india.comसेवागिरी महाराजांनी जनतेला पशुधन आणि जलसंधारणाची कामं करा, अशी शिकवण दिली होती. या शिकवणीतले विचार जोपासण्याचं काम इथलं देवस्थान ट्रस्ट करतंय. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामं केली जातात. गावागावांतून येणाऱ्या शेतकरी वर्गास वृक्षारोपणासाठी हजारो रोपंही वाटण्यात आलीत. छोटे छोटे बंधारे बांधण्यात मदत केली गेलीय. याबाबत ट्रस्टी शिवराज जाधव यांनी देवस्थानच्या कार्याबाबत 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं, "98 सालापासून देवस्थान ट्रस्टनं पाणी साठवण्याची योजना राबवलीय. यासाठी सिमेंटचे आणि मातीचे बंधारे बांधले आहेत. याचा फायदा या भागातील लोकांना झालाय. जलसंधारणाबरोबरच देवस्थान समितीनं वृक्षलागवडही केलीय. जवळजवळ दहा हजार नारळाची झाडं लावण्यात आलीय.”

नेर तलावात खोदली विहीर

या देवस्थानचं काम म्हणजे राज्यातील अन्य देवस्थानांसाठी प्रेरणा देणारं ठरतंय. अशा प्रकारची कामं संपूर्ण महाराष्ट्रात केली गेली तर लोकांचा पाण्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटण्यास मदत होईल, असं मत इथं येणारे भाविक व्यक्त करताहेत. सरकारच्यावतीनं दिला जाणारा संस्था गटातील जलसंधारणाचा पुरस्कारही या देवस्थान ट्रस्टला मिळालाय. विशेष बाब म्हणजे या वर्षी दुष्काळाचं सावट असतानाही इथं येणाऱ्या भाविक आणि ग्रामस्थांना पाण्याची अडचण भासू नये यासाठी नेर तलावात विहीर खोदलीय. सुमारे 34 लाख रुपये खर्च केलेत. या विहिरीतील पाणी टॅंकरमार्फत इतर ठिकाणी पुरवलं जातं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.