विदर्भातील शेती ही पावसाच्या भरवशावर पिकते. त्यामुळं कपाशी, सोयाबीनसारखी पारंपारिक पिकं घेण्यावरच इथल्या शेतकऱ्यांचा भर असतो. निसर्गानं साथ दिली तर ठीक नाहीतर वाजले बारा... अशा अनिश्चिततेची टांगती तलवार बळीराजाच्या मानेवर नेहमीच असते. त्यामुळंच चाकोरीबाहेर जाऊन वेगळी पिकं घेणारे शेतकरी हे इथल्या बळीराजाचे आयकॉ़न्स ठरतात. वाशीम जिल्ह्यातील पिंप्री इथले देवीदास राऊत-पाटील त्यापैकीच एक. ६५व्या वर्षी या बहाद्दरानं २५ एकर शेतीत पपईची लागवड केली आणि ५० लाखांचं उत्पन्न मिळवलं. त्यांचा हा नावीन्यपूर्ण प्रयोग पाहण्यासाठी एवढे शेतकरी येतायत की, त्यांची शेती म्हणजे आता पर्यटन स्थळच झालंय.
विदर्भातील गौळाऊ पशुधन
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमुळं विदर्भ जगात चर्चेत आला. इथल्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर इथलं मूळ पशुधन वाचवायला पाहिजे. याच उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आलेली ही गौळाऊ जित्राबं.


'कास'वरची फुलराणी
सातारा - कास पठारामुळं साताऱ्याचा लौकिक सर्वदूर झालाय. दरवर्षी पावसाळ्यात रंगिबेरंगी हजारो प्रकारच्या फुलांनी फुलणारं कास पठार हा एक निसर्गाचा चमत्कार आहे. वर्ल्ड हेरिटेज समितीनं मान्य केलेल्या पश्चिम घाटातील ३९ ठिकाणांपैकी कास पठार हे फुलांसाठी एकमेव व नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे. इथल्या मनोहारी फुलांचे फोटो पाठवलेत ठाण्याच्या शिवाजी कदम यांनी.


बाप्पा गेले गावाला....!
दहा दिवस गणपती बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पांना निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या भावमुद्रा आणि छायाचित्रे टिपलीयेत अनिकेत भोसले यांनी.

